Khokya Bhosle बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अजूनही ताजं आहे. या प्रकरणात अखेर ४ मार्च रोजी धनंजय मुंडे यांनाही राजीनामा द्यावा लागला. दरम्यान बीडमधला खोक्या भोसले याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याने मारहाण करतानाचा हा व्हिडीओ होता. या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. कोण आहे हा खोक्या? त्याचं सुरेश धस यांच्याशी काय कनेक्शन आहे आपण जाणून घेऊ.

खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक

खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्या अर्थात सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याने जी मारहाण केली होती त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात आता खोक्याला अर्थात सतीश भोसलेला अटक करण्यात आली आहे. खोक्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. त्याला अटक झाल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिली.

सुरेश धस यांनी काय म्हटलं आहे?

खोक्या भोसलेला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जी चूक केली आहे त्यामुळेच त्याला अटक झाली. कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांचाच निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून खोक्या उर्फ सतीश भोसले ओळखला जातो.

कोण आहे खोक्या भोसले?

खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे.

गोल्डमॅन म्हणूनही सतीश भोसलेची स्थानिक पातळीवर ओळख आहे. शिरुर कासार परिसात खोक्याची दहशत आहे. तिथे त्याला खोक्या पार्टी असं म्हटलं जातं.

व्हिआयपी कल्चर, व्हिआयपी कार, हातात सोन्याचे ब्रेस आणि कडे, तसंच गळ्यात सोन्याची माळ असल्याने त्याला गोल्डमॅन म्हटलं जातं.

सतीश भोसले हा उंची आणि लॅव्हिश आयुष्य जगतो. त्याचा हेलिकॉप्टरमधून उतरत असतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. तसंच दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले हा कारमधून पैसे उधळताना दिसतो आहे. सतीश अर्थात खोक्या भोसलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे असंही दिसतं आहे.

मागच्या सहा ते सात वर्षांपासून खोक्या भोसले राजकारणात सक्रीय आहे. सतीश भोसले हा बीडच्या शिरुर शहराजवळ पारधी वस्तीत राहतो.

सतीश अर्था खोक्या भोसलेल्या भोवती अनेकदा लोकांचा गराडा असतो. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत.

खोक्या भोसले चर्चेत कसा आला?

भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला सतीश भोसलेचे नवनवे कारनामे आता समोर येत आहे. एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्याचा हेलिकॉप्टरने एन्ट्री केल्याचा तसेच नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकतानाचेही व्हिडिओ समोर आलेत.

अंजली दमानियांचा आरोप काय?

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थाटात मिरवणारा, हॅलिकॉप्टरने एन्ट्री घेणारा तसेच नोटांचे बंडल उधळणारा हा तरुण आहे कोण? त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल उपस्थित होत असून यावरुनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader