छत्रपती संभाजीनगर : समाज माध्यमातून ‘बटेंगे तो कटेंगे’ ही महायुती समर्थकांची मांडणी शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षातून पदमुक्त करण्यात आलेल्या किशनचंद तनवाणी यांनी पुढे नेली. त्यामुळे अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा तनवाणी यांच्या निर्णयाचा ‘बोलविता धनी’ कोणी तरी वेगळाच असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीमध्ये तनवाणी यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षाची पंचाईत केल्याने पक्ष बांधणीमध्ये ‘मातोश्री’ आणि स्थानिक नेत्यांच्या मर्यादाही स्पष्टपणे समोर आल्या आहेत.
किशनचंद तनवाणी यांना औरंगाबाद शहरातील ‘महापालिके’चा कारभार चालवता येतो, हे माहीत असणाऱ्या भाजप नेत्यांनी त्यांना आवर्जून प्रवेश दिला होता. रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष असताना किशनचंद तनवाणी हे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा तनवाणी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकतो का, याची चाचपणी करायला सुरुवात केली होती. त्यांना पुन्हा ‘शिवबंधन’ बांधण्यात आले. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर तनवाणी यांच्या भूमिकेवरुन शहरभर पोस्टर झळकले होते. तेव्हा तनवाणी यांनी ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. ऐन निवडणुकीमध्ये निवडणुकीतून माघार घेतल्याने ठाकरे गटाची पंचाईत करणारे तनवाणी यांचा राजकीय प्रवास शिवसेना – भाजप असा राहिलेला आहे. आता त्यांनी पुन्हा ‘महायुती’ ची भूमिका मांडलेली असल्याने भाजप समर्थकांनी तनवाणी यांच्या ‘हिंदुत्वा’च्या भूमिकेचे समाज माध्यमातून स्वागत करायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा – Sangli Assembly Constituency : सांगलीत अजून एका घराण्यात दुहीची बिजे
हेही वाचा – रायगडमध्ये भाजपच्या बंडखोरांचे शिवसेना शिंदे गटाला आव्हान
दरम्यान शिवसेना ठाकरे गटातील काही माजी नगरसेवकांच्या चकरा शहरातील ‘सावरकर चौक’ येथे वाढल्या असल्याचे तनवाणी समर्थक आवर्जून सांगत आहेत. सावरकर चौकात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचे विधानसभा निवडणुकीचे कार्यालय आहे. या आरोपांमुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ठाकरे गटातील दोन प्रमूख नेते येणाऱ्या – जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसमोर आपसातील मतभेद सहजपणे व्यक्त करत असतात. त्यामुळे ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये ‘आलबेल’ नाही, याची चर्चा राजकीय गोटात नेहमी असे. ती आता सर्वसामांन्यांपर्यंत गेली आहे. तनवाणी यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयाचा परिणाम औरंगाबाद पूर्व मतदारसंघात प्रामुख्याने होईल, असाही दावा केला जातो. या मतदारसंघात भाजप विरुद्ध एमआयएम अशी लढत होणार असून काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलल्याने महायुतीच्या गोटातील अस्वस्थता कमी झाली आहे.