कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा उमेदवार विजयी तर करायचा आहे पण याच वेळी आपल्या आगामी विधानसभा निवडणुकीची मशागत करून घेण्याकडे लक्ष दिले जात आहे. ध्येय लोकसभेचे असले तरी प्रचाराचे लक्ष्य विधानसभा निवडणुकीकडे असा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा उद्योग आरंभला असल्याचे नेत्यांच्या प्रचाराच्या रागरंगातून दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडे हा प्रकार दिसत आहे. लोकसभेसाठी एकजूट केलेली नेते मंडळी उद्या एकमेकांविरोधात शड्डू ठोकणार आहेत. याची कल्पना असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्याचा दिलदारपणा दाखवला जात आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूरचे संजय मंडलिक व हातकणंगलेचे धैर्यशील माने या उमेदवारांनी केलेले शक्तिप्रदर्शन प्रचाराची दिशा, गती कशी असेल हे अधोरेखित करणारे होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही बैलगाडीतून अर्ज भरून लक्ष वेधले. महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील श्रीमंत शाहू महाराज व हातकणंगलेतील सत्यजित पाटील सरूडकर यांचा अर्जही तितक्याच ताकदीने भरण्याच्या हालचाली सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकत्रित प्रचार करीत आहेत. याचवेळी नेत्यांचा ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ असल्याचे काही लपून राहिले नाही. निवडणूक लोकसभेची आणि डोळा विधानसभेकडे असे तंत्र नेत्यांनी चांगलेच अवगत केले आहे.

ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
murbad constituency kisan kathore subhash pawar, agri and kunbi
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

हेही वाचा – १७ जागा, एकाच जातीचे उमेदवार विजयी; दशकभराहून अधिक काळ प्रचलित जातीय गणित आहे तरी काय?

कागलमध्ये तयारीला जोर

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेची सर्वात लक्षवेधी निवडणूक ठरणार आहे ती कागल मतदारसंघात. येथील आमदार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा संघर्ष विधानसभेसाठी पुन्हा एकदा भाजपचे माजी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याशी होणार आहे. मुश्रीफ यांचे महायुतीत येणे घाटगे यांना आवडलेले नव्हते. तरीही आता हे दोघेही संजय मंडलिक यांच्या प्रचारात एकत्र राहत आहेत. याचवेळी मुश्रीफ – घाटगे या दोघांनीही विधानसभा निवडणुकीची पायाभरणी याच प्रचारातून सुरू केली आहे. एकमेकांच्या हालचाली परस्परांनी हेरल्या आहेत. त्यातूनच मुश्रीफ यांनी एका मेळाव्यात समरजित घाटगे ही विधानसभा लढवणार आहेत. त्यांनी त्याची घोषणा केली आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा, असे वक्तव्य जाहीरपणे केले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी चंदगड, राधानगरी – भुदरगड या विधानसभा मतदारसंघात कागल सारखीच राजकीय परिस्थिती असल्याचे नमूद केले आहे. यातून नेत्यांची विधानसभेची तयारी कशी सुरु आहे हे अधोरेखित झाले.

चंदगड मतदारसंघात अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील त्यांच्याकडून गतवेळी थोडक्यात पराभूत झालेले भाजपचे शिवाजी पाटील तसेच संग्रामसिंह कुपेकर हे तिघेही मंडलिक यांच्या प्रचारात असले तरी त्यांच्यात विधानसभेची लढाई होणार असल्याने त्याची तयारी त्यांनी याच मैदानातून आरंभली आहे. राधानगरी – भुदरगड मतदारसंघात शिंदे सेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा तिसऱ्यांदा मुकाबला अजितदादा गटाचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्याशी होणार हे कधीचेच स्पष्ट झाले आहे. या दोघांनीही मंडलिक यांचा प्रचार करताना नजर विधानसभेवर ठेवून रणनीती सुरु केली आहे.

हेही वाचा – काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान; आजवर का होती याची आवश्यकता?

मविआमध्ये संघर्ष

महायुतीमध्ये दिसणारा विधानसभा लढाईच्या तयारीचा भाग महाविकास आघाडीमध्येही ठळकपणे दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजू आवळे, ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव आवळे हे एकत्र आहेत. या तिघांनाही विधानसभा खुणावत असल्याने त्यांनी लोकसभामार्गे विधानसभा तयारीला हात घातला आहे. शिरोळ तालुक्यामध्ये ठाकरे सेनेचे माजी आमदार उल्हास पाटील आणि दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील हे एकत्र असले तरी त्यांच्यातही विधानसभा निवडणुकीची तयारी जाणवत आहे. याच तालुक्यात महायुतीसोबत असलेले शिंदेसेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे या साखर कारखान्यांच्या अध्यक्षांमध्ये विधानसभेचा सामना होण्याची शक्यता गृहीत धरून लोकसभा निवडणुकीचा प्रचार त्या दृष्टीने गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली आहे.