कोल्हापूर : Congress Withdrawals from Kolhapur Assembly Election 2024 कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विजयाचा भरवसा ठेवून उमेदवारी बदलली गेली. त्याच उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने कॉंग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील एकंदरीत भूमिकेच्या अपकीर्तीची जोरदार चर्चा रंगली. यामागे नेमके कारण तरी काय याची शोधयात्रा करवीर नगरीत सुरु झाली. नगरसेवाकातील बेदिली, बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश लाटकर हे रिंगणात राहिल्याने निवडणूक जड जाण्याची शक्यता, खासदार शाहू महाराज यांना कराव्या लागणाऱ्या विनवण्या अशा अनेक कारणांचा परिपाक यामागे असल्याचे बोलले जात आहे.

या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीची रस्सीखेच अखेरच्या क्षणापर्यंत रंगली होती. कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाणार असे संकेत नेत्यांनी दिल्याने त्यांचा हुरूप वाढला होता .महापालिकेच्या कामकाजात कारभारी म्हणून ओळखले जाणारे शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राजेश लाटकर यांच्याबरोबरच मराठा महासंघाचे वसंतराव मुलीक ही नावे चर्चेत होती. यापैकीच लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली खरी, पण महापालिका अंतर्गत नगरसेवकांच्या राजकारणाचा फटका बसून त्यांची उमेदवारी बदलण्यात आळी.

Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
thane assembly constituency sanjay kelkars strength with candidature of ubt rajan vichare for maharashtra vidhan sabha election 2024
Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा >>> संविधानामुळेच अदानींना रोखण्यात यश; ‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप

काही नगरसेवकांनी राजवाड्यात जाऊन मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनी उमेदवारी घ्यावी असा आग्रह धरला. काही नगरसेवक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे दमदार उमेदवार देण्यासाठी दबाब वाढवत राहिले. परिणामी रातोरात उमेदवारी बदलली गेली. कार्यकर्त्यांना उमेदवारी या सूत्रामुळे संयम राखून असलेल्या आमदार जयश्री जाधव यांनी छत्रपती घराण्यामध्ये उमेदवारी गेल्यावर काँग्रेसला रामराम ठोकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून आक्रमक पवित्रा दाखवून दिला. काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. त्यातून काँग्रेस सावरते न सावरते तोच मधुरिमाराजे यांनी अवघी काही मिनिटे उरले असताना उमेदवारी अर्ज मागे घेतला.

हेही वाचा >>> ‘भारत जोडो’तून अराजक पसरवण्याचे काम; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका

छत्रपती घराण्यात उमेदवारी असल्याने विजयाची समीकरणे काँग्रेसकडून मांडली जात होती. भरवशाचा मोहरा अचानक गायब झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते सैरभर झाले. जिल्ह्यात काँग्रेसच्या अधिकाधिक जागा जिंकून शासन आल्यानंतर चांगले खाते मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सतेज पाटील यांच्या दृष्टीने हा तर राजकीय धरणीकंप ठरला. त्यांचा पारा इतका चढला की खासदार शाहू महाराज, छत्रपती घराणे समर्थक यांना त्यांनी अद्वातद्वा बोलून घेतले. त्यातून शाहू महाराज – आमदार पाटील यांच्यात बिनसल्याच्या चर्चेने जोर धरला. त्यावर या दोघांनीही माध्यमांशी बोलताना आमच्यात कसलाही वाद नसल्याचे सांगत पडदा टाकला खरा. तरीही प्रश्न उभा राहिला तो अचानक अर्ज मागे का घेतला याचा. त्याची अनेक कारणांचे पदर चर्चेतून समोर येत गेले.

लोकसभेपाठोपाठ विधानसभा ही छत्रपती घराण्यात गेल्याने काही नगरसेवकांमध्ये नाराजी होती. लाटकर यांची समजूत काढण्यासाठी शाहू महाराज, मालोजीराजे घरी गेले होते. अनेक मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. तरीही प्रतिसाद नसल्याने छत्रपती घराणे समर्थकांमध्ये हा संयत शाहू महाराजांचा अधिक्षेप होत असल्याची भावना व्यक्त होवू लागली. खेरीज, लाटकर यांनी बंडखोरी केल्याने मतात फूट होवून निकालाचे समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे सावध पवित्रा घेत उमेदवारी मागे घेतली गेली. तथापि, सामान्य कार्यकर्त्यासाठी उमेदवारी नाकारली असे शाहू महाराज हे म्हणत असले तरी आधीच लाटकर सारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असताना अर्ज घेतला का, तो शक्तीप्रदर्शन करीत भरला का, अखेरच्या क्षणापर्यंत थांबण्याची वेळ का आली? या प्रश्नांची चर्चा करवीरनगरीत रंगली आहे.

Story img Loader