राज्यसभा निवडणुकीतील विजयामुळे धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपत उत्साहाचे वारे संचारले आहे. याचवेळी त्यांना भाजपचा पक्ष विस्तार करतानाच आगामी निवडणुकांसाठी प्रभावी उमेदवार उभे करणे आणि त्यांना निवडून आणण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. एका विजयाने भाजप समोर आव्हानांची मालिकाही उभी राहणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे आहेत. तरीही कोल्हापूर जिल्ह्यात भाजप फारसा रुजलेला नाही. कोल्हापूर शहरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत नेहमी निवडक कार्यकर्ते असतात. तेच ते चेहरे वगळता अन्यत्र पक्ष विस्तार त्यांना करता आला नाही. हेच चित्र ग्रामीण भागातही आहे. खेडोपाडी भाजप दिसतो तो पक्षात प्रवेश केलेल्या आयारामांमुळे. पक्षाची सदस्य संख्या वाढल्याचा दावा भाजप करून केला जात असला तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सक्षम चेहऱ्यांची भाजपकडे वानवा आहे. हे खडतर आव्हान पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढताना भाजपला दहा मतदारसंघात निवडून येण्यायोग्य उमेदवार कोण? या प्रश्नाचा खोलवर विचार करावा लागणार आहे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
belapur assembly constituency sandeep naik vs manda mhatre maharashtra vidhan sabha election
लक्षवेधी लढत: भाजपच्या आमदार पुत्राचेच पक्षाला आव्हान
thane city BJP president JP Nadda, walk out of the Gurdwara
Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला
Shekhar Shende filed complaint against Dr Pankaj Bhoyer for giving sarees and utensils to women
सरकारी सेवेतील लाडक्या बहिणींना साडी-भांडी; तक्रार होताच आमदार म्हणतात…

मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, ‘बंदी सिंग’चं राजकारण आणि लोकसभा पोटनिवडणूक; संगरूरमध्ये राजकीय चढाओढ!

राज्यसभेची सहाव्या जागेची निवडणूक अचानक वेगळ्या वळणावर पोहोचली आणि या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पराभव करुन धनंजय महाडिक विजयी झाले. खरे तर महाडिक हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत होते. ते राज्यसभेत पोहचल्याने लोकसभेचा भाजपचा उमेदवार कोण? याची चर्चा आहे. लोकसभेला अजून दोन वर्षाचा अवधी आहे. या काळामध्ये केंद्र शासनाकडून भरपूर निधी आणून मोठ्या विकास कामाद्वारे आपण प्रभावी लोकप्रतिनिधी आहे हे महाडिक दाखवून देण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभेल. त्यातूनच त्यांना लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी संधी दिली जाऊ शकते. अथवा दुसरा प्रभावी उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांनाही पक्ष रिंगणात उतरवण्याची शक्‍यता आहे.

तडजोडीच्या राजकारणावरुन भाजप आक्रमकतेकडे

कमळ फुलवण्याचे आव्हान

महाडिक यांना कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा वाढविण्याचे काम करावे लागणार आहे. चंद्रकांत पाटील हे राज्याच्या राजकारणात व्यग्र असल्याने भाजपची खालची फळी मजबूत करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. सध्या भाजपचा जिल्ह्यात एकही आमदार नाही. जनसुराज्यचे विनय कोरे व ताराराणी आघाडीचे प्रकाश आवाडे या दोन माजी मंत्र्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांची सोबत घेऊन धनंजय महाडिक यांना भाजपचा लोकसभा-विधानसभेचा किल्ला लढवावा लागेल. खेरीज, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका येथेही भाजपचा विस्तार करून आगामी विधानपरिषदेवर ही त्यांना आतापासूनच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.