दयानंद लिपारे

राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा जिंकण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये जोरदार चुरस असली तरी या निकालाचे राजकीय परिणाम कोल्हापूरच्या राजकारणावर उमटणार आहेत. यामुळेच कोणता कोल्हापूरकर मल्ल ही लढाई जिंकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Screening of Marathi films in theatres Municipal administration responds positively to artists demand Pune news
नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटांचे प्रदर्शन; कलाकारांच्या मागणीला महापालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार तर भाजपचे धनंजय महाडिक हे सहाव्या जागेसाठी नशीब आजमवीत आहेत. दोघेही कोल्हापूरकर. कोण बाजी मारतो यावर कोल्हापूरच्या भविष्यातील राजकारणाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. त्याचे पडसाद लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांवरही होणार आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभेनंतर राज्यसभेची निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाचा अचानक केंद्रबिंदू बनली आहे.

राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याचे नाव तसे फारसे कधी येत नसे. राज्यसभेचे दिवंगत खासदार आबासाहेब खेबुडकर कुलकर्णी सांगलीचे असले तरी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव राहिला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे खासदार झाल्याने त्यांची चर्चा झाली. आता राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यावर संभाजीराजे हे कोल्हापुरातून राज्यसभेसाठी आलेले पहिले नाव बाजूला पडले. दुसरीच दोन नावे पुढे आली. शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या या राजकीय चालीला प्रत्युत्तर देत भाजपनेही कोल्हापूरचेच धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेचा मुकाबला हा प्रामुख्याने संजय पवार – धनंजय महाडिक या कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये होणार आहे. दोघांपैकी कोणीही कोणीही बाजी मारली तरी त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम संभवत आहे.

गुजरातमध्ये भाजपा नेत्याची दारूबंदी उठवण्याची मागणी, पक्ष प्रवेशाच्याच दिवशी दारुबंदीची मागणी करत निर्माण केला वाद

भाजपपुढे आव्हान

अलीकडेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. त्यावेळीही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यावर जिल्ह्यात आघाडीचा प्रभाव अधोरेखित झाला. भाजपचा पराभव झाला असला तरी मतांची वाढलेली संख्या लक्षणीय होती. विधानसभा निवडणुकीतील पोटनिवडणुकीच्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी भाजपला राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेली आहे. महाडिक यांना निवडून आणण्यासाठी भाजपच्या केंद्रीय व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी जोरदार हालचाली चालवल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपचे खासदार व्हावा यासाठी कंबर कसली आहे. शिवाय महाडिक गट सक्रीय झाला असून त्यांच्या समर्थकांची एक फळीही अपक्ष आमदारांच्या संपर्कात राहिली आहे. महाडिक निवडून आले तर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा प्रभाव वाढीस लागण्याची चिन्हे आहेत. यातून ते महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका त्याचबरोबर लोकसभा-विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कडवे आव्हान देऊ शकतात.

या निवडणुकीत संजय पवार यांच्या बाजूने विजयाचे फासे पडले तर त्याचा फायदा शिवसेनेसह महाविकासआघाडीला होणार आहे. यातून जिल्ह्यातील भाजपचे अस्तित्व आणखी निस्तेज होवून मविआ मजबूत होणार आहे. हा संभाव्य अंदाज लक्षात घेवून जिल्ह्यातील महा विकास आघाडीचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आघाडीचे आमदार – दोन्ही खासदार यांनी पवार यांच्या पाठीमागे राजकीय ताकद उभी केली आहे.

पाटील – महाडिक संघर्षाची किनार

कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दशके पाटील – महाडिक परिवारातील राजकीय सामना उत्तरोत्तर रंगत चालला आहे. या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यास या गटाचा प्रभाव वाढून महाडिक गटाचे प्रमुख विरोधक सतेज पाटील यांना आव्हान मिळणार आहे. त्यामुळे सतेज पाटील यांनी या निवडणुकीसाठी आपल्या हालचाली अधिक गतिमान केल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी पाटील यांनी ‘ आमचं ठरलंय ‘ हे घोषवाक्य घेऊन वातावरण निर्मिती केली होती. महाडिक गटाला रोखण्यासाठी शिवसेनेचे संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. यातून पाटील – महाडिक हा जिल्ह्यातील पूर्वापार राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

Story img Loader