जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांचे ‘ब चमू’ आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर, जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी, लिंगायत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

कर्नाटकमध्ये भाजप कुठल्याही परिस्थितीत लिंगायत मुख्यमंत्री होऊ देणार नाही. मी यापूर्वीही सांगितले होते की, भाजपमध्ये लिंगायत उमेदवाराला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले जाणार नाही. ब्राह्मण मुख्यमंत्री केला जाणार असून पडद्यामागून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असे कुमारस्वामी प्रचारसभेत म्हणाले.

Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Nitish Kumar On Manipur Politics
Manipur Politics : नितीश कुमार यांचा पक्ष मणिपूरमध्ये एनडीएमध्ये सहभागी असणार की नाही? संभ्रमाच्या परिस्थितीमुळे चर्चांना उधाण
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
loksatta readers response
लोकमानस : भारतालाही फटका बसण्याची शक्यता

हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या भाच्याची ‘जन संजोग यात्रा’, घेणार २५० सभा; पंचायत निवडणुकीसाठी तृणमूलने कसली कंबर

कुमारस्वामी यांच्या या विधानातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. कर्नाटकमध्ये तीन-साडेतीन टक्के ब्राह्मण असून महाराष्ट्राप्रमाणे इथेही ते निर्णायक मतदार नाहीत. तरीही भाजपमधील इतर नेत्यांच्या तुलनेत कमी जनाधार असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तसेच, कर्नाटकमध्येही ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ शकतो, असे कुमारस्वामी सूचित करत आहेत. अनेक राज्यांमध्ये भाजपने प्रभावी समाजातील मुख्यमंत्री न करता अन्य समाजातील नेत्याला सर्वोच्च स्थानवर बसवले आहे. हरियाणामध्ये जाट समाज अत्यंत प्रभावी असताना मनोहरलाल खट्टर या पंजाबी खात्री समाजातील नेत्याला मुख्यमंत्री केले गेले. उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी वा ब्राह्मण समाजातील नव्हे तर, ठाकूर समाजातील कुठलाही जनाधार नसलेले योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. त्यामुळे कर्नाटकमध्ये लिंगायत वा वोक्कलिग या दोन प्रभावी समाजातील नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा न देता ब्राह्मण नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे कुमारस्वामी सुचित करत आहेत.

भाजपने यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य चेहऱ्यावर चर्चा केलेली नाही. येडियुरप्पा हे लिंगायत समाजातील दिग्गज नेते असले तरी, त्यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला केले गेले. त्यांचे विश्वासू विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही लिंगायत असले तरी त्यांच्या सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. बोम्मई यांचा उमेदवारी अर्ज भरताना पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात, बोम्मई यांना वेळ कमी मिळाला. कर्नाटकमधील जनतेला विकास हवा असेल तर तो मार्ग बोम्मईंच्या नेतृत्वातून जातो, असे नड्डा म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षपणे बोम्मई यांना पाठिंबा दिला होता. हे पाहता, हरियाणातील समीकरण भाजप कर्नाटकमध्ये लागू करेल असे नव्हे. गुजरातमध्ये भाजपला भूपेश पटेल यांना मुख्यमंत्री करून प्रभावी पटेल समाजाला प्रतिनिधित्व द्यावे लागले. तसेच, कर्नाटकमध्येही भाजपला लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे. यावेळी वोक्कलिग मतदारांवर कब्जा करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. वोक्कलिग समाज जनता दलाचा प्रमुख मतदार राहिला आहे. भरवशाच्या मतदारांमध्ये फूट पडली तर दक्षिण कर्नाटकातील जनता दलाच्या वर्चस्वाला धक्का लागू शकतो, हे ओळखून कुमारस्वामी यांनी ब्राह्मण मुख्यमंत्र्याची भीती दाखवली आहे.

हेही वाचा – Karnataka : “असला नालायक मुलगा…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून खरगे पिता-पुत्रांची कोंडी

भाजपला ब्राह्मण समाजातील नेत्याला मुख्यमंत्री करायचे असेल तर राष्ट्रीय संघटना महासचिव बी. एल. संतोष यांचे नाव आघाडीवर असेल. यावेळी भाजपच्या उमेदवारांच्या निवडीमध्ये संतोष यांच्या प्रभावामुळे येडियुरप्पा नाराज झाल्याचे बोलले गेले होते. आत्ताच्या उमेदवारांच्या साह्याने भाजपला विधानसभा निवडणूक जिंकता येण्याची शक्यता नसल्याचे येडियुरप्पा यांचे मत असल्याचीही चर्चा होती. संतोष आणि येडियुरप्पा यांचे एकमेकांमध्ये अजिबात सख्य नाही. शिवाय, संतोष यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत.

तेजस्वी सूर्या, नवीन कटील यांच्यासारखे कट्टर हिंदुत्ववादी तरुण नेत्यांना संतोष यांच्यामुळे संधी मिळाली आहे. कर्नाटकमध्ये भाजपची धुरा नव्या पिढीकडे देण्याचा मनोदय मोदी-शहा-नड्डांनी बोलून दाखवला आहे. येडियुरप्पा यांच्यासारखे लोकप्रिय नेते आत्ताच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासारखे कट्टर हिंदुत्ववादी नाहीत. संतोष मात्र हिंदुत्वाच्या मुशीतून पुढे आले आहेत. कर्नाटकमध्ये नवा भाजप निर्माण करताना पक्ष अधिक हिंदुत्ववादी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवरही कुमारस्वामी यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

Story img Loader