येत्या काही दिवसांमध्येच महाराष्ट्राबरोबरच हरियाणामध्येही विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील राजकारण आता तापल्याचे दिसून येत आहे. हरियाणामध्ये भाजपा हा सत्ताधारी पक्ष असून, विरोधात असणाऱ्या काँग्रेसमध्ये सगळेच आलबेल असल्याचे चित्र दिसत नाही. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) राष्ट्रीय सरचिटणीस व पक्षाच्या सिरसा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कुमारी शैलजा या जुलैअखेर स्वत:ची अशी एक वेगळी पदयात्रा काढून काँग्रेसच्या प्रचारास सुरुवात करणार आहेत. हरियाणाच्या शहरी भागामध्ये काँग्रेसची ताकद वाढवणे आणि ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करणे, हा त्यांच्या पदयात्रेचा उद्देश आहे. मात्र, पक्षाकडून ‘हरियाणा मांगे हिसाब’ नावाची पदयात्रा काढली जात असताना कुमारी शैलजा आपली स्वतंत्र पदयात्रा का काढत आहेत, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटी (HPCC) भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. रोहतकचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली १५ जुलैपासून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या करनाल मतदारसंघातून या यात्रेला सुरुवात झाली आहे. दीपेंद्र सिंह हे काँग्रेसचे हरियाणातील ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे सुपुत्र असून, सध्या हरियाणा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, कुमारी शैलजा यांचे भूपेंद्र हुड्डा यांच्याशी मतभेद आहेत. सध्या काँग्रेसमध्ये हुड्डा यांचे प्राबल्य आहे. त्यामुळेच त्यांनी वेगळ्या पदयात्रेचा मार्ग निवडला आहे. या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर दी इंडियन एक्स्प्रेसने कुमारी शैलजा यांची मुलाखत घेतली आहे. त्यांनी हरियाणा काँग्रेसच्या अवस्थेबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

हेही वाचा : पंतप्रधानांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात; प्रियंका गांधी वढेरा यांची मागणी

cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…

प्रश्न : हरियाणामध्ये तुम्ही वेगळी पदयात्रा का काढत आहात?

पदयात्रेची अंतिम रूपरेषा आखली जात आहे. सगळी तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत पदयात्रेस सुरुवात होईल, असे मला वाटते. हरियाणामधील शहरी मतदारसंघांवर अधिक लक्ष देत ही पदयात्रा मार्गक्रमण करील.

प्रश्न : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे तुम्हाला का वाटते?

लोकसभा निवडणुकीतील निकालातून हे स्पष्ट झाले आहे की, भाजपा शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीवर आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला बरेच काम करण्याची गरज आहे. देशभरात परिस्थिती बदलत आहे. त्याशिवाय, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये ज्या प्रकारे भाजपाला फटका बसला आहे, ते पाहता आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीवरही त्याचा नक्कीच परिणाम पाहायला मिळेल. ग्रामीण असो वा शहरी, लोकांच्या मानसिकतेत आधीच बदल घडल्याचे दिसत आहे. भाजपाची सत्ता त्यांना नकोशी झाली असून, त्यांना नक्कीच बदल हवा आहे.

प्रश्न : हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीने अशीच एक पदयात्रा गेल्या आठवड्यात दीपेंद्र हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली काढली आहे. तुमची पदयात्रा अशीच असणार आहे का?

प्रदेश काँग्रेस कमिटी अथवा कुणी काय करते आहे, याबाबत मला काही कल्पना नाही. मी तिथे उपस्थित नव्हते. ते (हुड्डा गट) नेमके काय करीत आहेत, याची मला काहीही कल्पना नाही.

हेही वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती भोवली”; संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकाने भाजपाला विचारले बोचरे प्रश्न

प्रश्न : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने १० पैकी पाच जागा जिंकल्या आहेत. पक्षाला अधिक चांगली कामगिरी करता आली असती, असे तुम्हाला वाटते का?

निश्चितपणे वाटते. जर जागावाटप अधिक चांगल्या प्रकारे पार पडले असते, तर आम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. पक्षाच्या हायकमांडला योग्य अभिप्राय दिला गेला असता, तर आज परिस्थिती वेगळी असती. सेंट्रल इलेक्शन कमिटी ऑफ द एआयसीसीच्या पहिल्या बैठकीमध्ये मी आणि रणदीप सुरजेवाला (काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस) यांना निमंत्रण होते. आम्ही आमची मते मांडली होती. अर्थातच काही उमेदवारांची नावे तिथे सांगितली गेली नाहीत, जी आधीच ठरवली गेली होती; परंतु आम्ही इतर काही उमेदवारांबद्दल आग्रही होतो. नंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष उदय भान (हुड्डा यांच्याशी एकनिष्ठ मानले जातात), काँग्रेसचे विधfमंडळ पक्षनेते दीपेंद्र हुड्डा आणि हरियाणा काँग्रेस पक्षाचे प्रभारी (दीपक बाबरिया) यांच्याशीही चर्चा झाली होती.

प्रश्न : पक्षाच्या कामकाजाबाबत तुम्ही सातत्याने आवाज उठवत आहात. तुमचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे, असे तुम्हाला वाटते का?

काँग्रेस हायकमांडने याआधीच बैठकीमध्ये स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, प्रत्येकाने एकत्र येऊन काम करायचे आहे. मात्र, हे पक्षाचे प्रभारी अथवा पक्षाच्या महत्त्वाच्या अशा कुणाही नेत्याकडूनही घडताना दिसत आहे, असे मला वाटत नाही.

Story img Loader