येत्या काही दिवसांमध्येच महाराष्ट्राबरोबरच हरियाणामध्येही विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील राजकारण आता तापल्याचे दिसून येत आहे. हरियाणामध्ये भाजपा हा सत्ताधारी पक्ष असून, विरोधात असणाऱ्या काँग्रेसमध्ये सगळेच आलबेल असल्याचे चित्र दिसत नाही. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) राष्ट्रीय सरचिटणीस व पक्षाच्या सिरसा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कुमारी शैलजा या जुलैअखेर स्वत:ची अशी एक वेगळी पदयात्रा काढून काँग्रेसच्या प्रचारास सुरुवात करणार आहेत. हरियाणाच्या शहरी भागामध्ये काँग्रेसची ताकद वाढवणे आणि ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करणे, हा त्यांच्या पदयात्रेचा उद्देश आहे. मात्र, पक्षाकडून ‘हरियाणा मांगे हिसाब’ नावाची पदयात्रा काढली जात असताना कुमारी शैलजा आपली स्वतंत्र पदयात्रा का काढत आहेत, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटी (HPCC) भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. रोहतकचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली १५ जुलैपासून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या करनाल मतदारसंघातून या यात्रेला सुरुवात झाली आहे. दीपेंद्र सिंह हे काँग्रेसचे हरियाणातील ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे सुपुत्र असून, सध्या हरियाणा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, कुमारी शैलजा यांचे भूपेंद्र हुड्डा यांच्याशी मतभेद आहेत. सध्या काँग्रेसमध्ये हुड्डा यांचे प्राबल्य आहे. त्यामुळेच त्यांनी वेगळ्या पदयात्रेचा मार्ग निवडला आहे. या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर दी इंडियन एक्स्प्रेसने कुमारी शैलजा यांची मुलाखत घेतली आहे. त्यांनी हरियाणा काँग्रेसच्या अवस्थेबाबत सविस्तर भाष्य केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा