२०२५ या वर्षातला पहिला कुंभमेळा अयोध्येतल्या कुर्मी या ठिकाणी होणार आहे. या दरम्यान कुर्मी हा समाज बहुसंख्य असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. कुर्मी समाजाने एकत्र येत या कुर्मी महाकुंभाचं आयोजन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुर्मी समाजाच्या कुंभमेळ्यासाठी जमताना काँग्रेस, भाजपा आणि इतर पक्षांच्या सीमारेषा धुसर होतात. हे सगळे एकत्र येत या कुंभमेळ्यात सहभागी होतात. कुर्मी हा ओबीसी समाज आहे. मात्र या समाजाचा एकही खासदार किंवा आमदार अद्याप नाही. मागच्या वीस वर्षात या समाजाचा खासदार संसदेत किंवा आमदार विधानसभेत बसू शकलेला नाही. १९९९ हे वर्ष असं होतं जेव्हा कुर्मी समाजाचा खासदार लोकसभेत गेला होता. त्यानंतर या समाजाला संधी मिळालेली नाही.

कुर्मी कुंभमेळा आणि पोटनिवडणूक

कुर्मी समाजाचा कुंभमेळा येत असतानाच मिल्किपूर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडते आहे. त्यामुळे या ठिकाणचं वातावरण तापलं आहे. जून महिन्यात सपाचे अवधेश प्रसाद हे अयोध्येतून खासदार झाले आहेत. आता या पोटनिवडणुकीत सपाला यश मिळवायचं आहे. त्यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. महाकुंभ मेळा ज्यांनी आयोजित केला आहे त्यांनी मात्र पोटनिवडणूक आणि महाकुंभ मेळा यांचा काही संबंध नाही असं म्हटलं आहे. दुसरीकडे काँग्रेसचं म्हणणं वेगळं आहे.

काँग्रेसने काय म्हटलं आहे?

काँग्रेसचे सचिव जय करण वर्मा म्हणाले, “कुर्मी महाकुंभ मेळ्यात आपली ताकद दाखवण्याची संधी मिळणार आहे. फैजाबाद या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत जे कुर्मी आहेत. फैजाबादमध्ये जी १८ लाख मतं आहेत, त्यातली २.३८ लाख मतं कुर्मी समाजाची आहेत जी विसरता येणार नाहीत असं म्हटलं आहे.”

कुर्मी महाकुंभमेळ्याचं आयोजन कुठे करण्यात आलं आहे?

कुर्मी महाकुंभाचं आयोजन लखनऊ फैजाबाद या महामार्गावर असलेल्या पुरे काशीनाथ गावात करण्यात आलं आहे. सकाळी ११ वाजता हा महाकुंभ सुरु होईल आणि दुपारी ४.३० पर्यंत असेल. या वर्षातला हा पहिला महाकुंभ असेल. या ठिकाणी ५० हजार साधूसंत आणि महंत तसंच नागरिक येण्याची शक्यता आहे.

भाजपाचे नेते अवधेश वर्मांनी काय म्हटलंय?

अवधेश वर्मा हे भाजपाचे सदस्य आहेत त्यांनी हे म्हटलं आहे की कुर्मी महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभ मेळ्यात कुर्मी समाजाकडे दुर्लक्ष केलं जातं त्यावर भर दिला जाईल. हा समाज दुर्लक्षित कसा राहणार नाही याकडे आम्ही लक्ष देऊ. जर कुर्मी समाजाच्या एखाद्या व्यक्तीला तिकिट मिळालं तर त्याचा फायदा होईल. विनय कटियार यांच्यानंतर अद्याप कुणीही लोकसभेत जाऊ शकलेलं नाही. तसंच उत्तर प्रदेश विधानसभेतही कुणालाही संधी मिळालेली नाही. त्यामुळे महाकुंभाचं राजकारण कुर्मी समाजाभोवती कसं फिरतंय हे स्पष्ट होतं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kurmi mahakumbh in ayodhya despite numbers community overlooked scj