प्रदीप नणंदकर

लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघात पारंपरिक बाबासाहेब पाटील व विनायकराव पाटील यांच्यातील लढत रंगते. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपात झालेल्या बंडखोरीचा विनायकराव पाटलांना फटका बसला व बाबासाहेब पाटील यांचा विजय सोपा झाला. आगामी निवडणुकीसाठी पुन्हा जोरबैठका काढणे सुरू झाले आहे. भाजपात बंडखोरीची शक्यता असल्याने तीरोखण्यासाठी नेतेही सरसावले आहेत.

बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली
ajit pawar
उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?
Dhananjay Munde
“पहाटेची शपथ घेऊ नका असं सांगितलेलं तरी…”, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

आमदार बाबासाहेब पाटील हे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचे पुतणे. बाळासाहेबांचे राजकारण थांबल्यानंतर बाबासाहेबांचा प्रवेश झाला व ते अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी उभे राहू लागले. त्यांचे पारंपरिक विरोधक विनायकराव पाटील हे विलासराव देशमुख यांचे पट्ट शिष्य. काँग्रेसमधून तिकीट मिळण्यात अडचण आली, जागा राष्ट्रवादीला सोडली तर विनायकराव हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत. अपक्ष उभे राहून ते निवडूनही आले आणि मंत्रीपदही मिळवले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपची हवा होती, त्यामुळे विनायकराव पाटलांनी भाजपात प्रवेश घेतला व विधानसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळावे असा शब्द श्रेष्ठीकडून घेऊनच त्यांनी पक्ष प्रवेश केला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी अहमदपूरमधील जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, मात्र विनायकराव पाटलांना नको, अशी भूमिका घेतली. पक्षश्रेष्ठींनी त्यांना शब्द दिलेला असल्यामुळे उमेदवारी विनायकराव पाटील यांना दिली. त्यातून अधिकृतपणे भाजपचे दिलीपराव देशमुख व पंचायत समितीच्या सभापती आयोध्या केंद्रे या दोघांनी बंडखोरी करत विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे विनायकराव पाटील यांचा पराभव झाला व राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील हे सहजपणे विजयी झाले.

हेही वाचा… नागपूर शिक्षकमध्ये सर्वच उमेदवारांची मदार दुस-या पसंतीच्या मतांवर

हेही वाचा… ‘लहान भाऊ ’ उद्धव ठाकरे ठरले आता विकास प्रकल्प रोखणारे ‘खलनायक’

भाजपात झालेली ही बंडखोरी पुन्हा भाजपाच्या श्रेष्ठींनी प्रयत्न करून दिलीपराव देशमुख व अयोध्या केंद्रे यांना पक्षात घेतले. पक्ष कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठीचे प्रयत्न अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये केले जात आहेत. मागील वेळी विनायकराव पाटलांना उमेदवारी दिली होती. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ती त्यांनाच दिली जाणार का की दिलीपराव देशमुख,अयोध्या केंद्रे किंवा आणखीन कोणी पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी देणार, हा प्रश्न आहे. जर नव्या कार्यकर्त्याला संधी दिली तर कदाचित विनायकराव पाटील बंडाचा झेंडा उभारू शकतात आणि त्यांनी जर बंडाचा झेंडा उभा केला तर आमदार बाबासाहेब पाटील यांना २०२४ ची निवडणूक सोपी जाऊ शकते .काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये अहमदपूरचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीची युती टिकली तर अहमदपूरची जागा ही राष्ट्रवादीसाठीच असणार आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते हे अतिशय कमी संख्येने आहेत व अहमदपूरमधील काँग्रेस दुबळी असल्याने सतत राष्ट्रवादीला संधी मिळते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले व भाजपात बंडखोरी झाली तर राष्ट्रवादीचा मार्ग सुकर होणार आहे. भाजपात बंडखोरी होऊ नये यासाठी आतापासून प्रयत्न केले जात असले तरी त्याला किती यश मिळेल, हे आगामी काळच ठरवेल.

Story img Loader