लातूर : लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत यापूर्वी सलग तीन वेळा त्यांनी निवडणूक जिंकली आहे. या वेळी भाजपतर्फे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील भाजपच्या वतीने रिंगणात असल्याने लातूरमध्ये देशमुख व चाकूरकर घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमित देशमुख यांच्यापूर्वी त्यांचे वडील व राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे लातूर विधानसभा मतदारसंघाचे १९८० पासून प्रतिनिधित्व करत होते. त्यांचा वारसा अमित देशमुख यांनी २००९ पासून चालवण्यास सुरुवात केली. सलग तीन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे फारसे आव्हान यापूर्वी नव्हते. भाजपकडून सतत देशमुख यांच्या सोयीचे उमेदवार उभा केला जातो, अशीच समजूत मतदारसंघातील मतदारांची होती. त्यामुळे देशमुख यांचा विजय दरवेळी अतिशय सोपा असे.

हेही वाचा >>>नवाब मलिक वि. अबू आझमी: मानखूर्दमध्ये दोन मुस्लीम नेत्यांच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाला लाभ मिळणार?

यंदा भाजपने लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपात प्रवेश केलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. अमित देशमुख हे गेल्या पाच वर्षांत २४०० कोटी रुपये विकासकामावर मतदारसंघात खर्च केल्याचे सांगतात. मात्र लातूर शहरात जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी तीन कोटी रुपये निधी दिला गेला नाही म्हणून काम खोळंबले आहे. देशमुख हे नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी उपलब्ध नसतात तसेच समस्याच ऐकून न घेतल्यामुळे त्या सोडवल्या जात नाहीत, अशी त्यांच्याबद्दलची तक्रार आहे.

भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हत्या. मात्र शिवराज पाटील यांच्या सून असल्याने त्यांना राजकारण जवळून माहीत आहे. घराण्याचा वारसा म्हणून त्यांना सहानुभूती मिळेल, शिवाय भाजपच्या पारंपरिक मतांबरोबर महिला म्हणून त्यांना चांगली मते मिळतील असा अंदाज आहे.