प्रदीप नणंदकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लातूर : लातूरची ओळख काँग्रेस विचारांचा जिल्हा अशी कायम ठेवण्यात दिवंगत नेते विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाप्रमुखपद सांभाळणे मानाचे. भारत जोडो यात्रेत १५ हजारांहून अधिक तरुणांनी यावे यासाठी काम करणारा नेता अशी श्रीशैल्य उटगे यांची ओळख आहे. औसा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणात सुरुवात केली. वाणिज्य शाखेचे पदवीधर असणारे ५४ वर्षांचे उटगे यांनी नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या राजकारणात आपला असा ठसा उमटवला. तत्पूर्वी १९९५ ते २००२ या काळात जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले.

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापर्यंत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द फुलवली. १९९७ ते २००२ या कालावधीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. त्यामुळे सहकारातून समृद्धी हा त्यांचा राजकारणाचा बाज! श्री साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, सिद्धिविनायक नागरी पतसंस्था, स्नेहश्री फाउंडेशन अशा वित्तीय संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही ते काम करतात. विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे २०१४ पासून ते उपाध्यक्ष आहेत. मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुंडचे ते संचालक आहेत. सतत लोकांमध्ये राहणारा म्हणून त्यांची प्रतिमा आहे. औसा नगर परिषदेत ते नियोजन समितीचे सभापती राहिले. त्यानंतर जनतेतून नगराध्यक्षपदाची संधी होती.

हेही वाचा: अभिजीत फाळके : विधायक कामातून राजकारणात

मात्र त्या वेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याचे ठरवले व ते विजयी झाले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले, त्यांच्याकडे शिक्षण व अर्थ असे दोन विभाग होते. शिक्षण विभागात त्यांनी अनेक उपक्रम राबवले. चावडी वाचनाचा गाजलेला उपक्रम त्यांच्या कालावधीत सुरू झाला, तो राज्यभर राबवला गेला. शाळांमध्ये सांस्कृतिक उपक्रम हे केवळ खासगी शाळेत होत असत तो जिल्हा परिषदेच्या शालेय स्तरावरून ते तालुका व जिल्हा पातळीपर्यंत घेतला जावा असेही त्यांनी प्रयत्न केले.

हेही वाचा: समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता

सर्व शिक्षा अभियानात डोम पद्धतीने शाळांचे बांधकाम हे त्यांच्या कालावधीत सुरू झाले. अर्थ खात्याचे सभापती म्हणून होते, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सत्कार करून त्यांच्या हातात सेवानिवृत्तीची कागदपत्रे सुपूर्द करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. त्याचे सर्वत्र कौतुकही होते. सहकार, ग्रामीण भागातील राजकारणाचे बारकाईने माहीत असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur congress young politician srishailya utge voice of rural people zp bharat jodo yatra print politics news tmb 01