लातूर : लातूर हा काँग्रेसचा पारंपारिक गड भाजपने गेल्या दोन निवडणुकांमध्ये सर केला असला तरी यंदा जातीय समीकरणाची किनार लाभलेल्या या निवडणुकीत भाजपसाठी हा गड राखण्याचे मोठे आव्हान असतानाच काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी या निमित्ताने लागली आहे. जातीय मतपेढीचा परिणाम वाढवा, लिंगायत मतांचा जोर काँग्रेसच्या बाजूने व्हावा या काँग्रेसच्या व्यूहरचनेला भाजपची मंडळी प्रत्युत्तर देत आहेत. शिवराज पाटील चाकुरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांना भाजपने प्रवेश दिला. त्यामुळे जातीय मतपेढीचे गणित आम्हीही मांडू असे उत्तर देण्यात आले आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा गड माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे या मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आले आठव्यांदा त्यांचा रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून दारुण पराभव झाला. त्यानंतर २००९ साली हा मतदारसंघ राखीव झाला .विलासराव देशमुख यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत या मतदारसंघात कोल्हापूरचे जयवंतराव आवळे यांना उमेदवारी देत निवडून आणले त्यानंतर २०१४ व २०१९ अशा सलग दोन निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. २०२४ ला या पराभवाचा वचपा काढायचा या जिद्दीने आमदार अमित देशमुख व त्यांचे साथीदार कामाला लागले आहेत तर हा मतदारसंघ एकदा आपल्या ताब्यात आला आहे तो आपल्या ताब्यातून जाऊ द्यायचा नाही या जिद्दी जिद्दीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची मंडळी कामाला लागली आहेत.

BJP rebel Varun Patils decision to work for mahayuti in Kalyan
कल्याणमध्ये भाजप बंडखोर वरूण पाटील यांचा महायुतीचे काम करण्याचा निर्णय
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
Assembly Elections 2024 Vanchit Bahujan Alliance Buddhist candidate print politics news
‘वंचित’चे निम्मे उमेदवार बौद्ध; प्रकाश आंबेडकर यांचे या वेळी ‘बौद्ध-मुस्लीम-ओबीसी’ समीकरण
maharashtra assembly election 2024, gadchiroli vidhan sabha candidate, armori, bjp
भाजपपुढे लोकसभेतील पिछाडी दूर करण्याचे आव्हान, गडचिरोलीत उमेदवार बदलला, आरमोरीत अडचण
congress face challenge of maintaining vote share in amravati
अमरावती : काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकीतील मताधिक्‍य टिकविण्‍याचे आव्‍हान
Chandrapur district six constituencies, Chimur,
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत केवळ आठ महिला उमेदवार; चिमूर, ब्रम्हपुरीत एकही महिला रिंगणात नाही

हेही वाचा : “लोकसभा निवडणूक IPLसारखीच अन् काँग्रेसकडे कर्णधार नाही,” भाजपाचा हल्लाबोल

लातूर मतदारसंघात २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीचे सुधाकर शृंगारे व महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यात आहे .वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर हे नवखे आहेत दखल घ्यावी असे ते एकमेव उमेदवार स्पर्धेत आहेत. भाजपने २०१९ ला पावणेतीन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आलेले खासदार सुधाकर शृंगारे यांना रिंगणात उतरवले .काँग्रेसने यावेळी नवीन खेळी करत माला जंगम जमातीतील डॉक्टर शिवाजी काळगे या नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवले आहे.काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर अतिशय गतीने व आक्रमकपणे प्रचाराला सुरुवात केली. आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख असे सगळे कुटुंबच पायाला भिंगरी लावून फिरायला सुरुवात झाली आहे.आमचा उमेदवार उच्चशिक्षित आहे त्याला सामाजिक जाण आहे कमी शिकलेला ,विकासाची दृष्टी नसलेला, मतदारात संपर्क नसलेला असा विरोधी उमेदवार असल्याने जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन करत थेट गेल्या दहा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ कसा कुचकामी गेला, महागाई वाढली, शेतमालाचे भाव पडले ,हमीभाव नाही असे अनेक मुद्दे आक्रमकपणे प्रचारात मांडले जात आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने अतिशय मोठे शक्ती प्रदर्शन केले .बाळासाहेब थोरात यांनी बऱ्याच दिवसानंतर लातूरच्या काँग्रेसच्या मंडळींना सूर गवसला आहे व लातूरकरांची प्रचाराची गाडी चौथ्या गिअरवर आहे व हा वेग उमेदवाराला विजयी करेल असा दावा केला जात आहे.

महायुतीत तुलनेने प्रचाराची यंत्रणा उशिरा कार्यान्वित झाली. आमदार संभाजी पाटील निलंगेकर ,आमदार अभिमन्यू पवार ,आमदार रमेश कराड या भाजपा आमदारसह राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील, मंत्री संजय बनसोडे या सगळ्यांची मोट बांधण्यात प्रचाराला वेग घेण्यास उशीर झाला .भाजपनेही उमेदवारी अर्ज भरताना जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले . प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूरला काँग्रेस म्हणजेच देशमुख शाही असल्याचे आपल्या भाषणात ठासून सांगितले. निवडणुकीच्या काळात शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश घेतला .चाकुरकरांचे मानसपुत्र माजी मंत्री बसवराज पाटील चाकूरकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेत चाकूरकर यांचे आता छायाचित्र फक्त वापरले जाते ९० वर्षीय चाकूरकर निवडणूक यंत्रणेत सक्रिय नाहीत .

हेही वाचा : निवडणूक तोंडावर, सपाने बदलले १० जागांवरील उमेदवार; कारण काय?

भाजपने गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची जंत्री जनतेला सांगणे सुरू केले असून हर घर जल, शौचालय, गरिबाला घर,स्वच्छता ,रेल्वे बोगी फॅक्टरी दिव्यांगांच्या सर्वेक्षण करून त्यांना उपकरणे वितरीत करणे अशा विविध कामांची जंत्री जनतेला सांगणे सुरू ठेवले आहे .२७ एप्रिल रोजी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची मतदार संघात चाकूर येथे जाहीर सभा झाली तर लातूर येथे बुद्धिवंताच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. उदगीर येथे काँग्रेसच्या वतीने प्रियंका गांधी यांची जाहीर सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा लातूरात ३०एप्रिल रोजी होते आहे. नितीन गडकरी ,सुधीर मुनगंटीवार, योगी आदित्यनाथ आदींच्या सभा भाजपच्या वतीने पुढील आठवड्यात घेतल्या जाणार आहेत .काँग्रेसची यंत्रणा लातूर शहर व लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघात अतिशय गतिमान झाली आहे .अहमदपूर ,उदगीर ,निलंगा, लोहा या मतदारसंघात काँग्रेसची स्वतःची शक्ती नाही अथवा त्यांच्या सोबत असलेले ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांचीही शक्ती नाही .स्वतः अमित देशमुख या निवडणुकीत जीव ओतून कामाला लागले आहेत. माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडल्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघातील लोहा कंधार या मतदारसंघावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर व खासदार अशोक चव्हाण हे दोघेही लक्ष केंद्रित करतील. मागील लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघातून भाजपला मताधिक्य होते त्याचा लाभ भाजपाच्या उमेदवाराला होईल की आमचा उमेदवार नक्की विजयी होणार हा विश्वास जनतेला देत महाविकास आघाडीचा उमेदवार मताधिक्य घेईल हे सात मे रोजी होणाऱ्या मतदानानंतरच कळेल .

लिंगायत ,मराठा, मुस्लिम मतावर महाविकास आघाडीचा भर

काँग्रेसने आपला उमेदवार लिंगायत समाजातील पोटजात असलेल्या माला जंगम जमातीतील दिला आहे. जिल्ह्यात लिंगायत समाजाची मोठी संख्या आहे त्याचा लाभ होईल शिवाय मराठा समाजाची मते महायुतीच्या विरोधात राहतील त्याचा लाभ होईल , मुस्लिम मते १०० टक्के आपल्याला मिळतील असा होरा ठेवत महाविकास आघाडीच्या वतीने प्रचाराची यंत्रणा राबवली जात असून आर नाहीतर पार या जिद्दीने देशमुख कुटुंबीय सर्वांना सोबत घेऊन निकराची लढाई लढते आहे.

हेही वाचा :जातीय समीकरणं साधत काँग्रेसने हरयाणात जाहीर केले उमेदवार; भाजपाला रोखण्यासाठी विशेष डावपेच

लाभार्थीवर महायुतीचा भर

मतदार संघात केंद्र व राज्य सरकारच्या लाभार्थ्यांची संख्या अतिशय मोठी आहे .गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या कामगिरीच्या आधारे इतर मागासवर्गीय ,लिंगायत व मराठा समाजातील मते व शिवाय दलित समाजाची मतेही मिळतील अशी व्यूहरचना करत महायुतीची मंडळी करत आहेत.