राजस्थानमध्ये चालू वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या येथे काँग्रेसची सत्ता असून विरोधी बाकावर भाजपा आहे. येथे भाजपाचे नेते गुलाबचंद कटारिया विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. मात्र त्यांची आता पंजाबच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. परिणामी राजस्थान विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिकामीच आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नावारुपाला येण्यासाठी येथील बड्या नेत्या वसुंधरा राजे यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजस्थानमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘आमदार, खासदार, मुख्यमंत्री झालो, मोदींचीच आशीर्वाद,’ बी एस येडियुरप्पांचे विधान

४ मार्च रोजी मोठे शक्तिप्रदर्शन

वसुंधरा राजे यांना राजस्थानच्या राजकारणामध्ये विशेष महत्त्व आहे. भाजपाला त्यांच्या राजकीय अस्तित्वाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आगामी निवडणुकीत भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाची संधी मिळवी म्हणून त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अगोदर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी त्या येत्या ४ मार्च रोजी छुरू येथील सालासर धाम येथे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. वसुंधरा राजे यांचा वाढदिवस ८ मार्च रोजी आहे. मात्र त्या दिवशी होळी असल्यामुळे चार दिवस अगोदर म्हणजेच ४ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस सालासर येथे साजरा केला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी राज्यभरातील समर्थकांना सालासर धाम येथे येण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>> “आपण कुठे राहतोय? भारत की उत्तर कोरिया?” प्रसार भारतीने हिंदुस्थान समाचारशी करार केल्यानंतर विरोधकांचा सवाल

वसुंधरा राजे दोन वेळा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी

वसुंधरा राजे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाल्यास पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी मिळेल, असे यांच्या समर्थकांचे मत आहे. वसुंधरा राजे यांनी दोन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांना स्थानिक नेतृत्वाने बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा >>>मनिष सिसोदियांच्या अटकेनंतर विरोधकांची एकजूट, काँग्रेस मात्र गप्प; जाणून घ्या कोणत्या पक्षाची काय भूमिका?

विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपात अंतर्गत स्पर्धा

सध्या राजस्थान भाजपाचे नेतृत्व सतीश पुनिया यांच्याकडे आहे. आगामी निवडणुकीत पुनिया हेदेखील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात, असे सांगितले जाते. त्यामुळे वसुंधरा राजे आणि पुनिया यांच्यात सुप्त स्पर्धा आहे. मागील तीन वर्षांपासून पुनिया राजस्थान भाजपाचे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. मात्र दुसऱ्या नेत्याची या पदावर नियुक्ती होईपर्यंत त्यांच्याकडेच भाजपा अध्यक्षपदाचा पदभार सोपवण्यात आलेला आहे. भाजपातील सूत्रांनुसार विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपामध्ये अनेक दावेदार आहे. यामध्ये वसुंधरा राजे यांच्यापुढे राजेंद्र राठोड, सतीश पुनिया, माजी शिक्षणमंत्री वासूदेव देवनानी आदी नेत्यांचे आव्हान असेल.

२००८ ते २००९ कालावधीत सांभाळले विरोधी पक्षनेतेपद

वसुंधरा राजे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव आहे. २००३-२००८ या काळात मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे २००८ ते २००९ अशा कालावधीसाठी विरोधी पक्षनेतेपद होते. मात्र पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांना विरोध करत विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यायला लावला होता.

हेही वाचा >>> सिसोदियांच्या अटेकमुळे केजरीवालांच्या महत्त्वाकांक्षांना खीळ

दरम्यान, २००३ आणि २०१३ साली त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते. या दोन्ही वेळा पक्षाने निडणूक जिंकली होती. त्यामुळे भाजपा त्यांचे महत्त्व आणि राजकारणातील ताकदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. याच कारणामुळे आगामी काळात वसुंधरा राजे यांच्या गळ्यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leader of opposition post vacant for rajasthan assembly vasundhara raje trying to get it prd