महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर वरचष्मा असणाऱ्या नेत्यांनाच सर्वपक्षीयांनी उमेदवारीमध्ये वरचे स्थान दिले आहे. प्रचार मुद्द्यांपेक्षा जात आणि आरक्षण आणि अभुतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत ‘साखरमाया’ घेऊन उतरणारे २४ नेते आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते अमित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, तानाजी सावंत, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह २४ साखर कारखांनदारांसह अनेकांनी त्यांच्या मुलांनाही मैदानात उतरवले आहे.

सहकारी साखर कारखाने खासगी करताना आणि त्यांच्या विक्रीतील घोटाळ्यांमुळे गेल्या दशकभराच्या राजकारणावर ‘साखर गोडी’तून पकड मिळावी म्हणून सत्ताधारी भाजपने बरेच प्रयत्न केले. उमेदवारीच्या पहिल्या यादीमध्ये ‘साखरसम्राटां’चा जोर आहे.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

हवामान बदलात आणि अवर्षणप्रवण क्षेत्रात ‘साखरमाया’ जमविणारे वरच्या स्थानावर नेते म्हणजे अमित देशमुख. लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी घोषित झालेल्या अमित देशमुख २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. ते खासगी व सहकारी मिळून १६ ते १८ कारखाने चालवतात. या यादीमध्ये जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, तानाजी सावंत, रत्नाकर गुट्टे यांचीही नावे आहेत. राजेश टोपे सहा वेळेस निवडून आले आहेत, तर रत्नाकर गुट्टे यांच्यावर अनेक अरोप असताना व ते करागृहात असतानाही गंगाखेड मतदारसंघातून २०१९ मध्ये निवडून आले होते.

वडिलांची कृपा म्हणून राजकारणात आलेले अमित देशमुख आणि राजेश टोपे आपापल्या मतदारसंघात स्थिरावले आहेत. तीन वेळा निवडून येणाऱ्या अमित देशमुख यांच्या देखरेखीखाली जवळपास १८ साखर कारखाने सुरू आहेत. राजेश टोपे ह समर्थ आणि सागर हे दोन कारखाने चालवतात. साखर कारखान्यातून होणाऱ्या राजकीय संबंधाचा अभ्यास असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील म्हणाले, ‘‘पाच हजार गाळप क्षमतेचा मतदारसंघातील एक कारखाना म्हणजे १५ ते २० हजार कुटुंबातील संपर्काचे केंद्र असते. प्रत्येकाच्या घरातील तीन किंवा चार मतदार म्हणजे ६० ते ६५ हजार सभासदांचा मतदारसंघ बांधलेला असतो. या प्रत्येकाच्या घरातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमाची निमंत्रणे शेतकरी त्यांच्या नेत्यांकडे आवर्जून पाठवतात. केंद्रामध्ये स्वतंत्र ‘सहकार’ करणे या मतदारसंघावरची पकड निर्माण करण्याचा एक भाग आहे.’’

हेही वाचा >>> शिवडीतील सुधीर साळवींची समजूत; उद्धव ठाकरेंशी चर्चा, अजय चौधरींना सहकार्य करण्याचे आश्वासन

महाराष्ट्राच्या राजकारणावर वचक निर्माण करण्यासाठी भाजपने या क्षेत्राचा पुरेपूर उपयोग केला असे साखर कारखाना विक्रीतील घोटाळ्यांवर याचिका दाखल करणाऱ्या माणिक जाधव यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी उतविण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तरी बहुतांश साखर कारखांनदारांची नावे पुढे येतात. अजित पवार यांचे भाजपबरोबरचे नवे मैत्र, हे याच कारणातून निर्माण झाले.’

साखरमायाएवढी महत्त्वाची का?

राज्याच्या राजकारणातील अंमलबजावणी संचालनालयाकडे देण्यात आलेली बहुतांश प्रकरणे साखर कारखाना विक्रीतील आहेत. याबाबतची पहिली तक्रार अण्णा हजारे आणि कॉ. माणिक जाधव यांनी रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात केली होती. राज्य बँकच्या लेखा परीक्षणात, सहकार खात्यांच्या ८८ कलमान्वये केलेल्या चौकशीमध्ये पुढे राज्य बँकेवर प्रशासक नेमताना साखर कारखान्यांना दिलेली कर्ज आणि त्यातून नियमबाह्य झालेल्या बाबींवर बोट ठेवत मोठा गहजब करण्यात आला. अनेकांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. पुढे अजित पवार यांच्या विरोधात अनेक आरोप झाले. आरोपाने ज्या भाजपने राष्ट्रवादीतील नेत्यांना घेरले होते. ते अजित पवार भाजपच्या बरोबर आले. त्यानंतर भाजप नेत्यांनी साखर कारखान्यातील गैरव्यवहारावर बोलणेच सोडून दिले. आजही या प्रकरणात तक्रार अॅड्. सतीश तळेकर यांच्या तक्रारदारांनी जिवंत ठेवलेली आहे. साखर कारखान्यातील गैरव्यवहारवर कारवाईचा केवळ दिखावा करून महाराष्ट्रात पद्धतशीरपणे राजकारण केले गेले. त्यातून अनेक पक्षांतरे झाली, असे या प्रकरणाची वकिली करणारे अॅड्. सतीश तळेकर यांचे मत आहे.

कोणाला उमेदवारी?

बारामती-अजित पवार, जामखेड- रोहीत पवार, शिर्डी- राधाकृष्ण विखे , कोपरगाव- आशितोष काळे, दिलीप वळसे पाटील- आंबेगाव, कागल- हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे- परळी, प्रकाश सोळंके- माजलगाव, बाबासाहेब पाटील- अहमदपूर, शंकरराव गडाख- नेवासा, सांगोला- दिलीप आबा पाटील, राधानगरी- के. पी. पाटील, इस्लामपूर- जयंत पाटील, घनसांगवी- राजेश टोपे, वसमत- जयप्रकाश दांडेगावकर, इंदापूर- हर्षवर्धन पाटील, राहुरी- प्राजक्त तनपुरे, शिराळा- मानसिंग नाईक, संगमनेर- बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत- परंडा, औसा-अभिमन्यू पवार, निलंगा- संभाजी पाटील, तुळजापूर -राणा जगजीतसिंह, सोलापूर- सुभाष देशमुख

Story img Loader