संतोष प्रधान

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जसे दिव्यातून जावे लागले तशीच काहीशी अवस्था पुतण्याच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची झाली आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे अत्यंत जवळचे सहकारी आता शरद पवार यांना लक्ष्य करू लागले आहेत.

What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Sanjay Raut slams Raj Thackeray (2)
Sanjay Raut on Raj Thackeray: ‘ते ठाकरे असतील तर मी राऊत’, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
shetkari kamgar paksha campaign for Maharashtra Assembly Election 2024
पवार, ठाकरे नेमके कुणाचे? फूट पडूनही शेकापकडून प्रचार पत्रकांमध्ये नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा घणाघात, “छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या…”

राष्ट्रवादी काँग्रसच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यात परस्परांना लक्ष्य करण्यात आले. विशेष म्हणजे अजित पवार, छगन भुजबळ वा प्रफुल्ल पटेल या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीकाटिप्पणी केली. पटेल हे तर अगदी गेल्या आठवड्यापर्यंत पवारांची सावली सारखे वावरत होते. पटेल यांनीही पवारांनावर आखपाखड केली. ‘मी पुस्तक लिहिणार आहे. त्यातील तपशील वाचून अनेकांना धक्का बसेल’ हे पटेल यांचे विधान पवारांना उद्देशून होते. छगन भुजबळ यांनीही पवारांनी पक्षाच्या नेत्यांना तोंडघशी पाडल्याचा सूर लावला. भाजपबरोबर जाण्यात वावगे काय, असा सवालही केला. अजित पवार यांनी तर पवारांवर बोचरी टीका केली. निवृत्त व्हा, इथपर्यंत सल्ला दिला. अजित पवार यांनी केलेल्या टीकेमुळे शरद पवार यांना सहानुभूती मिळेल, अशी शक्यता त्यांच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा… नागपुरात मुळातच कमकुवत, त्यात विभाजनाचा राष्ट्रवादीला फटका

गेल्या वर्षी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या दिव्यातून गेले तोच प्रकार सध्या शरद पवार हे अनुभवत आहेत. पक्षाचे नाव आणि चिन्हावर अजित पवार यांनी दावा केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत असाच प्रकार घडला होता. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने अधिक आहेत त्याचा पक्षावर दावा या सूत्रानुसार एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले होते. राष्ट्रवादीच्या बाबतीच असाच वाद निर्माण झाल्यास अधिक खासदार-आमदार कोणत्या बाजूला अधिक त्याच्याकडे पक्षाची सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा… कोल्हापुरात भाजप- शिवसेनेत आधीच धुसफूस त्यात आता राष्ट्रवादीची भर

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या समान धागा असला तरी पवार हे लढण्याच्या भूमिकेत आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी कराडला जाऊन शक्तिप्रदर्शन केले. तसेच बंड करणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र पिंजून काढण्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. राष्ट्रवादीतील संघर्ष कोणत्या वळणावर जातो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.