छत्रपती संभाजीनगर : महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांनी दाखल केलेल्या त्यांच्या दुसऱ्या शपथपत्रात पत्नीच्या नावे जालना व जळगाव येथे देशी व विदेशी मद्यविक्रीचे परवाने असल्याची नवीन माहिती शपथपत्रात दिली आहे. स्वत:च्या उत्पन्नाचा स्तोत्र शेती, मानधन आणि भाडे असे दर्शविले असून पत्नीच्या उत्पन्नाचे स्तोर शेती आणि मद्यविक्री व्यवसाय असा नमूद करण्यात आला आहे. दुसऱ्या शपथपत्रातील या माहितीमुळे मद्य परवान्यांच्या चर्चेला राजकीय पटलावर नवीन फोडणी मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच दिवशी संदीपान भूमरे यांनी एक अर्ज दाखल केला होता. त्यासोबत दिलेल्या शपथपत्रात मद्यविक्री परवान्याबाबतची देण्यात आली नव्हती. नव्याने दिलेल्या शपथपत्रात जालना येथे एफ.एल.(फॉरेन लिकर ७) नंतर फॉरेन लिकर, कंट्री लिकर-३ हे परवाने जालन्यासाठी तर जळगावसाठीही याच पद्धतीचे दोन परवाने पत्नीच्या नावावर असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. भूमरे यांनी संपत्तीच्या विवरणपत्रात त्यांची जंगम मालमत्ता दोन कोटी ३७ लाख ४३ हजार ४०४, तर पत्नीच्या नावे एक कोटी १५ लाख ५४ हजार २१६ रुपये असल्याचे नमूद केले होते. विविध ठिकाणच्या जमिनीत निवासी बांधकामे, बिगरशेती जमीन याचे बाजारमूल्य पाच कोटी १२ लाख पाच हजार ७९० रुपये एवढे दाखवले असून पत्नीच्या नावे एक कोटी ६५ लाख ६८ हजार १५६ रुपये एवढी संपत्ती असल्याचे नमूद केलेले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liquor license in the name of wife of sandipan bhumre print politics news asj