सांगली : राज्याचे नेते म्हणून उल्लेख केला जात असलेले आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदच्रंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यातील तरूण तुर्क अर्थातच यंग ब्रिगेडने कंबर कसली असल्याचे विधानसभा निवडणुकीत सुरू असलेल्या मोर्चेबांधणीवरून दिसत आहेत. यंग ब्रिगेडने पक्षभेद बाजूला ठेवत एकमेकांना उघड नसली तरी पदद्याआडची मदत करण्याचे मनसुबे रचले असून आमदार पाटील यांच्या पाठीशी राज्य नेतृत्वाच्या स्पर्धेत जिल्हा राहणार का नाही, हा प्रश्‍न पटलावर येत आहे.

हेही वाचा >>> ‘राज्य वक्फ बोर्डा’ने सुधारणा विधेयकाला विरोध करावा!

maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम

आमदार पाटील यांचे राजकारण खुर्ची नजरेसमोर ठेवूनच चालत आल्याचे दिसत असले तरी जिल्ह्याच्या वर्चस्ववादाची अनेक जणांना झळ बसली आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व.आर. आर. आबा पाटील यांनाही ही झळ सोसावी लागली होती. आबांचा कल वसंतदादा घराण्याकडे असल्याने दोघेही नेते राष्ट्रवादीमध्ये असतानाही त्यांच्यात सुप्त संघर्ष जिल्ह्यात पाहण्यास मिळाला होता. दोघामधील टोकाचा संघर्ष निर्माण झाला असताना रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीमध्ये एकमेकांना खजूर चारून हे मतभेद संपल्याचे जाहीर करण्याइतपत सुप्त संघर्ष संपल्याचे जाहीर करावे लागले होते. मात्र, ही कटुता संपली असल्याचे कुणीही मानले नाही. आबांच्या पश्‍चात तासगावमध्ये आबा गटाला ताकद देण्याचे दूरच राहिले, मात्र विरोधकांना म्हणजेच भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला झुकते माप देण्याचे प्रयोजन काय होते हे उघड गुपीत होते.

हेही वाचा >>> कारण राजकारण: पंढरपूर मंगळवेढ्याचे निवडणूक रिंगण खुले

लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळ अखेरपर्यंत निस्तारता आला नाही. राज्याचे प्रमुख नेते म्हणून आमदार पाटील यांनी हस्तक्षेप करून काँग्रेसला अनुकूल भूमिका घेतली असती तर निश्‍चितच याचे सकारात्मक परिणाम जिल्ह्याच्या विकासावर झालेले पाहण्यास मिळाले असते. क्रिया विरूध्द प्रतिक्रिया या नैसर्गिक न्यायातून येत्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीकडे पाहावे लागेल.लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मैदानात उतरूनही वसंतदादा घराण्यातील तिसरी पिढी राजकीय पटलावर दिमाखाने उदयास आली. याला कारणीभूत ठरली ती गटबाजीचा संघर्ष असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांचा महामार्ग पाहणी दौरा रायगडमधूनच आटोपता

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार पाटील विरोधातील शक्ती लोकसभेच्या निमित्ताने एकवटली आहे. काँग्रेसचे चिन्ह नसतानाही या शक्तीला सांगली, मिरजेसह तासगाव, खानापूर आणि पलूस-कडेगाव या पाच मतदार संघामध्ये खा. विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले. जतमध्ये भाजपपेक्षा कमी मते मिळाली असली तरी या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्याकडे आमदारकी आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सोबत घेउन यंग ब्रिगेडची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न माजी राज्यमंत्री आमदार डॉ.विश्‍वजित कदम यांचा दिसत आहे. यासाठी तासगावमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील, खानापूरमधून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांना सोबत घेण्याचे डाचपेच आखले जाण्याची शक्यता दिसते. यातूनच अपक्ष असल्याचे सांगत खासदार विशाल पाटील आभार दौर्‍यांच्या निमित्ताने मोर्चेबांधणी करत असल्याचे दिसून आले. आटपाडीमध्ये बाजार समितीच्या कार्यक्रमात खासदार पाटील यांनी सुहास बाबर यांच्याबद्दल बोलताना सांगितले, ज्यांनी आम्हाला प्रेम दिले, त्यांना आम्ही प्रेम देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे सहयोगी सदस्य असतानाही त्यांनी विरोधी पक्षातील संभाव्य उमेदवाराबाबत व्यक्त केलेली आपुलकी महत्वाची ठरणारी आहे. यातून आमदार जयंत पाटील यांनी ज्यांना ज्यांना राजकीय त्रास दिला अशी शक्ती एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचे पडसाद केवळ विधानसभा निवडणुकीतच नव्हे तर आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.