भंडारा : भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुके या दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ असतानाच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ‘हेवीवेट’ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही ते निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने महायुतीत ही जागा भाजप स्वत:कडे ठेवणार की राष्ट्रवादीसाठी सोडणार याचीच उत्सुकता आहे.

या मतदारसंघाचा इतिहास पाहता २००४ पासून या मतदारसंघाने कुणालाही दुसऱ्यांदा संधी दिली नाही. त्यामुळे भाजप सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी देईल की नवा चेहरा देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडीने मात्र त्यांचा हुकुमी एक्का अजून जाहीर केलेला नाही. भंडारा मतदारसंघात १९५२ ते १९८९ या काळात या काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर १९९१ ते १९९९ या काळात झालेल्या लोकसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीत सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा गड म्हणून हा मतदारसंघ नावारुपास आला. मात्र १९९९ ते २००४ पर्यंत भाजपने या मतदारसंघात विजय प्राप्त केल्याने तो सध्या भाजपचा गढ म्हणून ओळखला जातो.

BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
congress mla vijay wadettiwar accused election commission of Acting on BJP s warnings
निवडणूक आयोग मनुवादी, भाजपच्या इशाऱ्यावर चालतो… वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे…
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Local Government Election Preparations BJP busy in front building but Congress is sluggish
भाजप मोर्चेबांधणीत व्यस्त, काँग्रेस सुस्तच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारी
bjp delhi marathi news
दिल्लीसाठी भाजप सज्ज; महाराष्ट्र, हरियाणाच्या धर्तीवर सूक्ष्म नियोजनावर भर
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”
Sharad Pawar Thackeray group former corporators keen to return home Discussion with Deputy Chief Minister Ajit Pawar Pune news
पिंपरी : शरद पवार, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना स्वगृही परतण्याचे वेध; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा

हेही वाचा – …जेव्हा जयललिता यांनी दागिने न घालण्याचा केला होता संकल्प; जे. जयललिता यांच्या दगिन्यांचा २५ वर्षांचा इतिहास

२००८ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे मिळून भंडारा-गोंदिया हा एक लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २०१४ मध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा दारुण पराभव केला होता. मात्र, नंतर पंतप्रधान मोदी यांच्याशी मतभेद झाल्याने पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने येथे पोटनिवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने भंडाऱ्याचे नगराध्यक्ष असलेले सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. त्यांनी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला होता. यावेळी पुन्हा मेंढे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त लाभलेले परिणय फुके यांनी आधीच फडणवीसांकडे लोकसभेसाठी मोर्चेबांधणी केली. त्यामुळे तिकीट द्यायचे कुणाला याबाबत भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे. राज्यात तिकीट वाटपात फडणवीस यांची भूमिका निर्णायक असल्याने फुके यांची दावेदारी प्रबळ मानली जाते. पण देवेंद्र फडणवीस हे फुकेंचे तिकीट कापून मेंढेना पुन्हा संधी देतील का? हा प्रश्न आहे. विद्यमान खासदार सुनील मेंढे यांची भिस्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आहे. त्यांनी तयारी सुरू केली आहे. राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर मेंढे यांनी काढलेली रथयात्रा हा त्याचाच एक भाग मानला जातो. यात्रेची दिल्ली दरबारी दखल घेतली गेल्याने ही बाब त्यांच्यासाठी हुकुमी एक्का ठरू शकते.

महायुतीतून ही जागा आपल्याला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रयत्न सुरू आहेत. या गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही येथून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असे असले तरी भाजप त्यांची इच्छापूर्ती करण्याची शक्यता कमीच आहे. भाजपचा पारंपरिक मतदार पटेलांना मतदान करणार नाही. पटेल यांना उमेदवारी द्यायची असेल तर त्यांना भाजपकडून निवडणूक लढवावी लागेल. भाजपकडून हेमंत पटले, विजय शिवणकर हे देखील स्पर्धेत आहेत. सध्या महायुतीतील इच्छुक उमेदवारांनी वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली असून एकमेकांवर कुरघोडी करीत ‘बॅनरवॉर’ सुरू झाले आहे.

दुसरीकडे महायुतीला टक्कर देण्यासाठी महविकास आघाडीनेही दंड थोपटले आहे. काँग्रेस गनिमी काव्याने चाल करीत आहे. इच्छुकांचे अर्ज मागवणे सुरू आहे. मात्र भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची पाहिजे त्या प्रमाणात ताकद नाही. तुलनेने काँग्रेसचा मतदार या क्षेत्रात मोठा असल्याने ही जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. वेळ पडल्यास पटोले यांना पक्ष रिंगणात उतरवू शकतो. मात्र अशी शक्यता कमी असल्याचे जाणकार सांगतात. पटोले यांचा या मतदारसंघावर पूर्वीइतका प्रभाव राहिला नाही. याशिवाय काँग्रेसकडून मोहन पंचभाई, डॉ. निंबार्ते, सेवक वाघाये यांच्यासह जयश्री बोरकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. या मतदारसंघातून आजवर एकही महिला खासदार नसल्याने काँग्रेसने महिला उमेदवारास संधी दिल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.

जातीय समीकरणे –

भंडारा गोंदिया मतदारसंघात कायमच भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात थेट लढत होत आली. येथे निवडणूक नेहमीच जातीय समीकरणावर लढवली जाते. या मतदारसंघात कुणबी समाजाचे सर्वाधिक मतदार असून त्या पाठोपाठ तेली, पोवार आणि अनुसूचित जातीचे प्राबल्य आहे. येथे पोवार विरुद्ध कुणबी असा सामना रंगतो. फक्त २०१९ मध्ये कुणबी विरुद्ध कुणबी अशी लढत झाली. भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने कुणबी तर गोंदियात पोवार समाज मोठा आहे. त्यामुळे मतदानावर याचा प्रभाव पडतो, किंबहुना राजकारणाचे गणितच जातीवर अवलंबून आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजप कुणबी उमेदवारच देतील, हे निश्चित आहे. तर काँग्रेस कुणबी किंवा तेली उमेदवार देईल. त्यामुळे यावेळी कुणबी विरुद्ध कुणबी किंवा कुणबी विरुद्ध तेली असा सामना रंगू शकतो.

हेही वाचा – नितीश कुमार यांना भाजपाचा पाठिंबा, राज्यपालांकडे पत्र सादर, जाणून घ्या सत्तास्थापनेचं गणित!

दिग्गजांना पराभवाचा फटका

‘दिग्गजांना पराभूत करणारा’ मतदारसंघ अशी भंडारा- गोंदिया मतदारसंघाची ओळख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्रीकांत जिचकार आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या दिग्गज नेत्यांना याच मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता.

विधानसभानिहाय सद्यस्थिती

या मतदारसंघात भंडारा, साकोली, तुमसर, गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. सद्यस्थितीत सहापैकी पाच जागा भाजपकडे तर गोंदियात अपक्ष आमदार आहे.

२०१९ : उमेदवारांना मिळालेली मते

सुनील बाबुराव मेंढे (भाजप) – ६,५०,२४३

नाना जयराम पंचबुधे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ४,५२,८४९

Story img Loader