जळगाव : राज्यातील महायुतीच्या सरकारमधील तीनही पक्षांनी एकेक मंत्रीपद देत जळगाव जिल्हा त्यांच्यासाठी किती महत्वपूर्ण आहे, हे अधोरेखीत केले असताना लोकसभा निवडणुकीसाठी मात्र सत्तेतील तीनही पक्षांसह विरोधी महाविकास आघाडीत मतदारसंघावरील हक्कावरुन रस्सीखेच सुरु आहे. अनेक वर्षांपासून भाजपला साथ देणाऱ्या जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर समीकरणे बदलल्याने विरोधकांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पहिल्या लोकसभेपासून अर्थात १९५२ पासून काँग्रेसचा गड राहिलेला एरंडोल अर्थात आताचा जळगाव मतदारसंघ तीन ते साडेतीन दशकांत १९९१ पासून अपवाद वगळता भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. हा मतदारसंघ मराठाबहुल असून, २००९ पासून मराठा समाजानेच नेतृत्व केले आहे. सत्ताधारी आणि विरोधक उमेदवार निवडताना या मतदारसंघात जात हा निकष त्यामुळेच महत्वाचा मानतात.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह
Campaigning of NCP Sharad Pawar party candidate Subhash Pawar by Shiv Sena local office bearers
शिवसैनिकांकडून विरोधी उमेदवाराचा प्रचार; महिला कार्यकर्त्यांच्या चित्रफिती प्रसारीत, महायुतीत एकवाक्यता नाहीच
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….

हेही वाचा : नाशिक जिल्हा बँकेच्या मतदारांना आपलेसे करण्याची अजित पवारांची रणनीती

जळगावमध्ये भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी उमेदवारी गृहित धरुन तयारीही सुरु केली आहे. मागील दोन निवडणुकीत सुमारे चार लाख मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला असल्याने काँग्रेसने मतदारसंघ आपल्यासाठी सोडण्यात यावा म्हणून जोर लावला आहे. सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणे, अजित पवारांनी भाजपशी संधान साधल्यामुळे राष्ट्रवादीचे बळ कमी होणे, अशी कारणे काँग्रेसकडून जळगाववर दावा करताना दिली जात आहेत.

जळगाव मतदारसंघाचा दोन दशकांचा इतिहास पाहता, १९९९ पासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अपवाद वगळता भाजपचा विजय झाला आहे. २००४ मध्ये भाजपचे खासदार अण्णासाहेब पाटील लाच प्रकरणात अडकल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ॲड. वसंतराव मोरे विजयी झाले होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नाव पूर्वी एरंडोल मतदारसंघ असे होते. एरंडोल लोकसभा मतदारसंघात एरंडोल, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर आणि चोपडा असे सहा विधानसभा मतदारसंघ होते. २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होऊन मतदारसंघांत काही बदल झाले. या बदलाचे परिणाम अनेकांच्या राजकीय कारकिर्दीवर झाले. २००९ च्या म्हणजे १५ व्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी पुनर्रचित मतदारसंघांच्या रचनेनुसार निवडणुका झाल्या. पुनर्रचनेनंतर एरंडोल लोकसभा मतदारसंघाचे नाव जळगाव लोकसभा मतदारसंघ असे झाले. या मतदारसंघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, पारोळा-एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा-भडगाव या विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाला. या मतदारसंघातील पूर्वाच्या पारोळा-भडगाव मतदारसंघातील भडगाव तालुका हा पाचोरा तालुक्याला जोडला गेला, तर या तालुक्यातील आमडदे-गिरड जिल्हा परिषद गट हा एरंडोल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला.

हेही वाचा : बच्‍चू कडू, रवी राणांमध्‍ये वाद; अमरावतीत सत्‍तारूढ आघाडीतील मित्र पक्षांमध्येच सुंदोपसुंदी!

भाजपने २००९ पासून पुन्हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेतला. २०१९ मध्ये विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी न देता स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, नंतर त्यांची उमेदवारी रद्द करुन चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना ऐनवेळी देण्यात आली. त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गुलाबराव देवकर हे रिंगणात होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांचे पाटील हे निकटवर्तीय होते. तेव्हापासून आतापर्यंत हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीचा परिणामही जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर झाला आहे.

हेही वाचा : सोलापूरमध्ये सत्ताकेंद्र कायम ठेवून भाजपचे दोन आमदारांना पाठबळ

जळगाव लोकसभा मतदारसंघातील सध्याची स्थिती पाहता विधानसभेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजप, ग्रामीणमध्ये शिंदे गट, अमळनेरमध्ये अजित पवार गट, एरंडोल-पारोळ्यात शिंदे गट, चाळीसगावमध्ये भाजप आणि पाचोरा-भडगावमध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत. अर्थात, जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही. परंतु, विद्यमान आमदारांच्या विजयात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही वाटा होता. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत महायुतीची ताकद खरोखरीच दिसेल काय, हा खरा प्रश्न आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील मागील दोन निवडणुकांची स्थिती

२०१४- ए. टी. नाना पाटील (भाजप, मते ६, ४७, ७७३) विरुध्द डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी, मते- २, ६४, २४८)

२०१९- उन्मेष पाटील (भाजप, मते ७, १३, ८७४) विरुध्द गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी, मते – ३,,०२, २५७)