नंदुरबार : मतदारसंघात भाजपमधील वजनदार नेत्यांचा विरोध, सहयोगी शिवसेना शिंदे गटाची नाराजी, अशा प्रतिकूल गोष्टी असतानाही भाजपच्या खासदार डाॅ. हिना गावित यांच्याविरोधात विरोधकांना पाच वर्षात सक्षम उमेदवार तयार करण्यात अपयश आल्यामुळे नंदुरबारमध्ये गावित कुटूंबियांचे निभावले जात असल्याचे चित्र आहे. भाजपपेक्षाही गावित कुटूंबाची जिल्ह्यात पकड मजबूत होत असल्याने थेट हिना गावित यांच्या उमेदवारीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण भाजपकडेही गावित यांच्याशिवाय पर्याय नाही. यामुळेच हिना गावित या खासदारकीची हॅटट्रिक पूर्ण करतात का, याचीच चर्चा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नंदुरबार हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला. १९६२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून येत असे. पण २०१४ मध्ये आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांची कन्या हिना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. विजयकुमार गावित यांच्या मनमानीच्या विरोधात सर्व पक्षीय एकटावले आहेत. यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत गावित विरुद्ध सारे, असाच सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक, संयोजकपदी नेत्याची निवड होणार? तृणमूल मात्र नाराज?
कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मागील दशकात बदललेले चित्र काँग्रेससाठी निराशाजनक आणि त्याहून आत्मचिंतन करणारे आहे. मतदारसंघातून सलग आठ वेळा काँग्रेसकडून निवडून जाण्याचा विक्रम दिवंगत माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या नावे आहे. परंतु, त्यांच्या पराभवानंतर जिल्ह्यात होत असलेली पिछेहाट थांबवण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. जिल्ह्यात काँग्रेसमधील अंतर्गत गटातटाचे राजकारण भाजपच्या पथ्यावर पडले. त्यामुळेच आज भाजपने मतदारसंघात तळागाळात पाळेमुळे भक्कम केली आहेत. एकिकडे गावितांच्या रुपाने भाजप जिल्ह्यात आपली पकड मजबूत करत असतानाही भाजपपेक्षाही गावित घराण्याचे प्राबल्य अधिक वाढत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थताही आहे.
आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार, खासदार डाॅ. हिना गावीत आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डाॅ. सुप्रिया गावित अशी तीन विकासात्मक पदे गावित यांच्या घरातच असल्याने हा परिवार सध्या जिल्ह्यातील सत्ताकेंद्र झाला आहे. त्यामुळेच कोणतेही उदघाटन असो वा निधी वाटप. यात भाजपचे अन्य पदाधिकारी थेट डावलले जात असल्याने गावित गट वगळता लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. यातूनच नंदुरबार मतदारसंघातील अनेक बड्या नेत्यांनी थेट पक्षश्रेष्ठींना गाठून व्यथा मांडत लोकसभेचा उमेदवार बदलण्याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे शिंदे गट आणि गावित परिवार यांच्यातील वाद सर्वश्रृत असून त्यांनी देखील सर्वांना घेवून चालणाऱ्यांना लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. गावित परिवाराच्या कार्यकर्त्यांची फळी पाहता त्यांना वगळून नंदुरबार लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास पराभवाची भीती भाजपला असल्याने तिकीट वाटप करतांना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे.
हेही वाचा : जमीन सुधारणा विधेयकावरून केरळ सरकार अन् राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात खडाजंगी, नेमका वाद काय?
आदिवासी आरक्षणाचा प्रश्न, मित्रपक्ष आणि स्वपक्षीयांची नाराजी, यासह अनेक मुद्दे गाजत असताना पाच वर्षात डॉ. हिना गावितांसमोर लोकसभेसाठी विरोधी उमेदवार तयार करण्यात काँग्रेससह विरोधक सपेशल अपयशी ठरले आहेत. मागील निवडणुकीत ॲड. के. सी. पाडवी यांच्या पराभवानंतर विरोधकांनी याबाबत गांभिर्याने विचार केलाच नाही. दुसरीकडे, लोकसभा मतदारसंघात विविध कामांच्या माध्यमातून डॉ. हिना गावित यांनी मतदारांशी नाळ जोडून ठेवली आहे. भाजपमधूनही डॉ. गावित परिवाराने लोकसभेसाठीचा दुसरा चेहरा पुढे येवूच दिला नाही. त्यामुळे डॉ. हिना गावित यांना उमेदवारी न देता भाजप इतर कोणाचा विचार करेल काय, हा प्रश्नच आहे. एकिकडे राज्यातील बड्या नेत्यांचा गावीत परिवाराला विरोध असताना त्यांना दिल्लीवरुन असणारे पाठबळ, या नेत्यांचा उपद्रव कमी करत असल्याचे गावित गटातील अनेकांचे खासगीतील म्हणणे आहे. अशातच अलिकडे स्थापन झालेल्या नंदुरबार जिल्हा विकास मंचच्या माध्यमातून गावितांविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी दाखवलेली एकजूट त्यांच्यासाठी गावित परिवारासाठी डोकेदुखी ठरणार आहे. विशेष म्हणजे, या मंचमध्ये डाॅ. विजयकुमार गावित यांचे बंधूही सामील असल्याने विरोधकांसाठी ती जमेची बाजू मानली जात आहे.
हेही वाचा : राम मंदिराच्या उद्घाटनानंतरही संघ परिवार घडवणार अयोध्येची वारी, नेमकी योजना काय?
नंदुरबारमधील चार विधानसभा मतदारसंघासह धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आहे. आदिवासी राखीव या मतदारसंघातील राजकारण आता चांगलेच तापले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीआधी उमेदवारी मिळवण्याची ही लढाई अधिक रंगतदार होणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या अक्कलकुवा-अक्राणीत ॲड. के. सी. पाडवी (काँग्रेस), शहादा-तळोद्यात राजेश पाडवी (भाजप), नंदुरबारमध्ये डॉ. विजयकुमार गावित (भाजप), नवापूरमध्ये शिरीष नाईक (काँग्रेस), शिरपूरमध्ये काशिराम पावरा (भाजप) आणि साक्रीत मंजुळाताई गावित (अपक्ष, संलग्न शिंदे गट) असे बलाबल आहे.
२०१९ मध्ये प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
डॉ. हिना गावित (भाजप) – ६३९१३६
ॲड. के. सी. पाडवी (काँग्रेस) – ५४३५०७