भिवंडी : २००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात पूर्वापार काँग्रेसचे वर्चस्व होते. पण २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपवासी झालेल्या कपिल पाटील यांनी बाजी मारली. दहा वर्षे खासदारकी भूषवूनही पाटील मतदारसंघात फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. मोदी यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली पण त्याचाही लाभ उठवू शकले नाही. तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी पाटील सक्रिय झाले असले तरी यंदा त्यांचा दिल्लीतील मार्ग खडतर असल्याचे मानले जाते. पक्षांतर्गत वादाचाही त्यांना सामना करावा लागत आहे.

भिवंडी हा शहर, ग्रामीण आणि आदिवासी पट्ट्यात विखुरलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आगरी, कुणबी, मुस्लिम (अल्पसंख्यांंक) हा इतर मागास वर्ग (ओबीसी) समाज अधिक संख्येने आहे. आदिवासी भागात ठाकर समाजाची वस्ती आहे. या समाजावर भिवंडी लोकसभेच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते. भिवंडी शहरी भागात मुस्लिम समाजाचे वर्चस्व असले तरी ग्रामीण, आदिवासी पट्ट्यात कुणबी, आगरी समाज अधिक संख्येेने असल्याने प्रत्येक पक्ष भिवंडी लोकसभेत या समाजाचा उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो. या एकसंध समाजाच्या ताकदीने भिवंडी लोकसभेतील मुरबाड, शहापूर, भिवंंडी पूर्व, पश्चिम, शहर, ग्रामीण या सहा मतदारसंघात ओबीसी, भिवंडी शहर भागात मुस्लिम समाजाचे उमेदवार विधानसभेत नेतृत्व करतात. या सहा मतदार संघातील आमदारांच्या पक्षीय बळावर भिवंडी लोकसभेच्या खासदाराचे भवितव्य अवलंबून असते.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

हेही वाचा : झारखंड राज्यनिर्मिती चळवळीतील कार्यकर्ता ते मुख्यमंत्री; कोण आहेत चंपई सोरेन?

२००९ मध्ये भिवंडी मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा काँग्रेसचे सुरेश टावरे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. काँग्रेसची ठाणे जिल्ह्यातील पडझड़, मुस्लिम समाजाने काँँग्रेसची सोडलेली साथ, गटबाजी, टावरे यांच्या अकार्यक्षम कार्यपध्दतीमुळे काँग्रेसला हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले. मुस्लिम समाज, लगतच्या ओबीसी समाजाच्या बळावर काँग्रेसने या मतदारसंघावर पकड ठेवली होती. ती त्यांंना राखता आली नाही. पक्ष विस्ताराची गणिते आखणाऱ्या भाजपच्या आखणीकारांनी याच काँग्रेस मधील त्रृटींचा लाभ उठवला. तसेच, ठाणे जिल्ह्यातील शहर, ग्रामीण पट्ट्यातील आनंद दिघे यांनी घट्ट रोवलेल्या शिवसेनेला रोखायचे असेल तर येथल्या आगरी, कुणबी समाजाला एकसंध ठेवणे गरजेचे आहे. हा विचार करून कपील पाटील यांना राष्ट्रवादीमधून आयात करण्यात आले.

जिल्ह्यातील आगरी समाजाला चुचकारण्यासाठी पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली. विविध पक्षात विभाजित असलेला आगरी समाज भाजपच्या गोटात दाखल होईल. जिल्ह्यावर भाजपचा वरचष्मा राहील. या समाजाच्या पाठबळाने भाजपचा पाया जिल्ह्यात विस्तारेल हे त्यामागचे गणित होते.. भिवंडीत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर गोदामे उभी राहिली. मोठ्या कंपन्यांनी येथे जागा घेतली. कपिल पाटील यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांंनी भिवंडी परिसरात उभ्या राहत असलेल्या लाॅजिस्टिक पार्क, जमिनी खरेदी व्यवहार यामध्ये जी मागील काही वर्षापासून लुडबूड चालविली असल्याचा आरोप केला जातो. त्यातून न एक मोठा वर्ग पाटील यांच्या कार्यपध्दतीवर नाराज आहे.

हेही वाचा : “तामिळनाडूमध्ये सीएए कधीही लागू होऊ देणार नाही”, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे मोठे विधान

भाजप अंतर्गतच गटबाजी

मागील वर्षभराच्या काळात कपील पाटील यांना लोकसभेसाठी मुरबाड, शहापूर भागातून सहकार्य करणारे भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याशी पाटील दोन हात केले. यामुळे या दोन्ही तालुक्यांतील कथोरे यांना कुणबी समाज नाराज आहे. भिवंडी लोकसभेवर कथोरे दावा करतील अशी पाटील यांना भीती आहे. तसा मनोदय कथोरे यांनी व्यक्त केला होता. या कालावधीत पाटील यांनी कुणबी-आगरी असा वाद निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न अनेकांना आवडलेला नाही. भाजपचे, समर्थक आमदारांना विकास निधी देताना घेतलेला आखडता हात. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना डावलून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून इर्षेने कामे करण्याचा झालेला प्रयत्न. यामुळे पाटील यांनी आपल्याच पक्षात या भागात हितशत्रू निर्माण केले. हे शत्रू आता पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कपील पाटील यांच्या विषयी असलेली नाराजी ओळखून जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि बांधकाम विभागाचे मोठे कंत्राटदार नीलेश सांबरे सामाजिक कार्याच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. पालघर, भिवंडी पट्ट्यातील गावे, आदिवासी पाडे सामाजिक कार्याच्या माध्यमातून सांंबरे यांनी पिंजून काढले आहेत. भव्य मेळावे ते शहापूर, भिवंडी, मुरबाड पट्ट्यात घेत आहेत. गावागावांंमध्ये लोकसभा निवडणूक प्रचाराप्रमाणे सांबरे यांचे जिजाऊचे कार्यकर्ते प्रसिध्दी करत आहेत. उपक्रम राबवित आहेत. सांबरे अद्याप कोणत्या पक्षातून लढणार निश्चित नसले तरी, प्रसंगी अपक्ष म्हणून लढण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : विरोधकांकडूनही प्रशंसा केले जाणारे झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? समजून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

राष्ट्रवादीची खेळी

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी, काँग्रेसची भिवंडी लोकसभेत ताकद आहे. ही ताकद ओळखून शरद पवार यांनी भाजपला धडा शिकवण्यासाठी शिंदे गटातून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना फोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल करून घेतले. बाळ्या मामा हे दल बदलू असले तरी या भागातील मोठे प्रस्थ आहे. तेच पाटील यांना चांगला घाम फोडू शकतात, असा विचार महाविकास आघाडीने केला आहे. कपिल पाटील आणि बाळ्या मामा यांच्यातील लढत चुरशीची होऊ शकते.

२०१९च्या निवडणुकीतील मते :

कपील पाटील (भाजप) – ५,२३, ५८३

सुरेश टावरे (काँग्रेस) : ३,६७, २५४.

Story img Loader