नाशिक : शेतीच्या प्रश्नांवर उलटसुलट चर्चा होत असली तरी दिंडोरी या कृषिप्रधान लोकसभा मतदार संघात भाजपने कौशल्यपूर्वक आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. बहुसंख्य शेतकरी मतदार असलेल्या दिंडोरीचे शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीसाठी ‘बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ’ असे वर्णन केले जात असे. परंतु, त्यांच्याच पक्षातील नेत्यांना बरोबर घेऊन भाजपकडून बेरजेचे राजकारण झाले. त्यामुळे राष्ट्रवादीला आजवर कधीही हा मतदारसंघ ताब्यात घेता आला नाही. मागील निवडणुकीत प्रथमच लोकसभेत पोहोचलेल्या डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्रिपद देत भाजपने बालेकिल्ल्यात पाळेमुळे घट्ट करण्याचे धोरण ठेवले. त्याला आता शिवसेना-राष्ट्रवादीतील दुफळीतून रसद मिळणार आहे. या दोन्ही पक्षांचे सर्वच आमदार सत्तेत सहभागी झाल्यामुळे महाविकास आघाडीची वाट खडतर झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजे विरोधकांना भाजपला तुल्यबळ लढत देईल, असा चेहरा शोधण्याची वेळ आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा