गडचिरोली : शहरात नुकत्याच पार पडलेल्या महायुतीतील घटक पक्षाच्या महामेळाव्यात नेत्यांनी ”हम सब एक है” चा नारा देत महायुतीकडून जो उमेदवार घोषित होईल, त्याच्यासाठी सर्व मिळून काम करणार असे जाहीर केले. पण याच मेळाव्यात सहभागी पक्षातील कार्यकर्त्यांमधील अंतर्गत धूसफूस उघडपणे दिसून येते होती. आपलाच नेता कसा उमेदवारासाठी योग्य आहे. याची चर्चा सभागृहात ऐकू येत होती. अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी वर्षभरापूर्वीच आपण लोकसभा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. वेळोवेळी ते तसा दावा जाहीरपणे करत आहेत. त्यामुळे विद्यमान भाजप खासदार अशोक नेते यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. तर गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ. देवराव होळी देखील पक्षशीस्त मोडून आपणच भावी खासदार असल्याचे सभांमधून उघडपणे बोलू लागले आहे. दुसरीकडे महविकास आघाडीकडून गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढणारे काँग्रेसचे नेते डॉ. नामदेव किरसान यांचा नावावर सर्व नेत्याचे एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण हीच चर्चा लोकसभा क्षेत्रात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा