कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणाला मैदानात उतरवायचे हा मोठा प्रश्न सध्या इंडिया आघाडीला सतावत आहे. भाजपच्या शिंदे यांच्या विरोधातील नाराजीचा किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज सध्या उभय बाजूने घेण्यात येत आहे. डाॅ.श्रीकांत शिंदे यांना आव्हान देऊ शकेल असा कोणताही चेहरा सध्या तरी या मतदारसंघात नाही हे विरोधकही मान्य करतात. विरोधी पक्षांच्या या डाव्या बाजूचा अंदाज शिंदे पिता-पुत्रांनाही आहे. खासदार म्हणून गेल्या पाच वर्षात हजारो कोटी रुपयांचा विकास कामांसाठी निधी श्रीकांत शिंदे यांच्यामुळे उपलब्ध झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्रीपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्याने थोरल्या शिंदेनीही या मतदारसंघात भरभरुन निधीचे दान टाकले. त्याचा मोठा फायदा श्रीकांत यांना मिळाला खरा मात्र मित्रपक्ष भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान आमदार आणि स्वपक्षातील नाराजांची फौज उभी करत खासदारांनी स्वत:भोवती नाराजांचे एक मोठे वर्तुळ उभे केल्याचे चित्र मात्र या मतदारसंघात ठसठशीतपणे दिसत आहे.

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्याच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही पट्टयांमध्ये शिवसेनेचे विस्तीर्ण असे जाळे उभे केले. त्याचा मोठा फायदा आजही या पक्षाला जिल्ह्यात मिळत असतो. दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अशाचपद्धतीने संपूर्ण जिल्ह्यात स्वत:चा संपर्क कायम ठेवला. ठाण्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघातही त्यांनी स्वत:चा मोठा असा जनसंपर्क उभा केला आहे. या आधारेच राजकारणात नवख्या असलेले पुत्र श्रीकांत शिंदे यांना दोनदा या मतदारसंघातून निवडून आणण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची होती.

Udayanidhi Stalin become deputy chief minister
Udhaynidhi DCM : तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; उदयनिधी यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती, तर तुरुंगातून सुटून आलेल्या नेत्यालाही मंत्रीपदाची माळ!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
petitioner demand in bombay hc to file case against eknath shinde and nitesh rane over anti muslim remarks
मुस्लिमविरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप, मुख्यमंत्री शिंदे आणि नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करा, याचिकेद्वारे मागणी
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
minister abdul sattar supporters protest agains raosaheb danve for pakistan remark on sillod
मंत्री सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यातील वाद टोकाला
Eknath Shinde Buldhana, Congress leaders Buldhana,
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले
arvind kejriwal latest news (1)
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान?
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली

हेही वाचा : लोकसभा निवडणूक : भाजपची तीन जागा देण्याची तयारी जेडीएस मात्र पाच जागांवर ठाम, कर्नाटकमध्ये नेमकं काय घडतंय?

भाजपची कुरघोडी आणि श्रीकांत यांचा राजीनाम्याचा इशारा

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर शिंदे व भाजपमध्ये वादावर पडदा पडेल, असे वाटत होते. पण भाजपने कुरघोडीचे राजकारण सुरू ठेवले. कल्याण लोकसभा मतदारसंघ मिळाला पाहिजे, अशी मागणी रेटण्यात येऊ लागली. सुरुवातीला स्थानिक पातळीवरून ही मागणी होत असावी, असे चित्र होते. पण राज्यस्तरीय नेत्यांचा त्याला फूस असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. मग शिंदे गट आणि भाजपमधील अंतर वाढू लागले. हा वाद इतका टोकाला गेली की खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याचा इशारा देईपर्यंत मजल गेली. आपण निवडणूक लढणार नाही वगैरे श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले होते. भाजप आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद टोकाला गेला असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे कसे लोकप्रिय आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न झाल्याने भाजपचे नेते अधिकच बिथरले. शेवटी कल्याण लोकसभा हा शिंदे गटाकडे कायम राहिल, अशी ग्वाही फडण‌वीस यांनी दिली आणि वादावर पडदा पडला. पण भाजपच्या स्थानिक नेत्यांचा श्रीकांत शिंदे यांच्यावरील राग काही कमी झालेला नाही. त्याचे मतदानावर परिणाम होतो का, अशी चर्चा आहे.

हेही वाचा : ‘मोदी की गॅरंटी’ चा दहा वेळा उल्लेख करीत मोदी यांची मतदारांना सोलापूरमध्ये भावनिक साद

विकास कामांसाठी भरीव निधी

गेल्या दहा वर्षांच्या काळात खासदार शिंदे यांनी या मतदारसंघात विकासकामांचा पाउस पाडला आहे हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. विशेषत: मागील साडेचार वर्षात घडलेल्या घडामोडी त्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागासारखे महत्वाचे खाते आले. त्यानंतर ते थेट मुख्यमंत्री झाले. या दोन्ही खेपेला नगरविकास विभाग शिंदे यांच्याकडे असल्याने महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ यासारख्या मोठया संस्थांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची कामे मतदारसंघात सुरु करण्यात खासदार शिंदे यांना यश आले. मतदारसंघात रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, खाडी पूलाची कामांचा धडाका या काळात लावण्यात आला. अंबरनाथ परिसरात शिवमंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलताना खासदारांनी एरवी विकासापासून दूर असलेल्या या पट्टयातही कामांचा धडाका लावला. हवे ते अधिकारी आणि हवा तितका शासकीय निधी मिळाल्याने खासदार म्हणतील ती पुर्वदिशा असा कारभार या मतदारसंघात आहे. यामुळे प्रतिमा संवर्धनाला पुरेपूर वाव खासदारांना मिळाला आहे यात शंका नाही. एवढे सारे झाले तरी शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडीचा जाच नागरिकांना अद्याप तरी कमी झालेला नाही.

हेही वाचा : आत्रामांच्या दाव्यामुळे महायुतीत धूसफूस, भाजपमध्येही दुफळी ! महाविकासआघाडीचा उमेदवार जवळपास निश्चित

विरोधी उमेदवाराचा शोध

कल्याण मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, ग्रामीण, डोंबिवली, कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो .अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. उर्वरित मतदारसंघांमध्ये भाजप, मनसे, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. . आतापर्यंत डोंबिवली मतदार संघ युतीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळवून देतो. येथे भाजपला आणि विशेषत: नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी आग्रही भूमीका घेणारा एक मोठा मतदार आहे. कदाचित त्यामुळेच खासदार शिंदे येथील स्थानिक आमदार आणि राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना फारशी दाद देत नसल्याचे चित्र आहे. चव्हाणांची भूमीका काहीही असो नव राष्ट्रवादमय झालेला येथील मतदार महायुती म्हणून आपल्यालाच मतदान करेल याचा विश्वास खासदार शिंदे यांना आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक नगरसेवक, पदाधिकारीही देखील मंत्री चव्हाण यांना अंगावर घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. विरोधकांकडे सध्या तरी खासदार शिंदे यांच्याविरोधात उमेदवार नाही हे स्पष्ट चित्र आहे. या मतदारसंघात अधूनमधून सुभाष भोईर यांचे नाव शिंदे यांच्याविरोधात घेतले जाते मात्र स्वत: भोईर त्यासाठी फार इच्छुक नाहीत. त्यामुळे बाहेरुन एखादा उमेदवार येथे आयात करता येईल का याचा विचारही ठाकरे गटात सुरु आहे.

२०१९ चे मतदान

श्रीकांत शिंदे (शिवसेना) : ४, ५१, ३४६

बाबाजी पाटील (राष्ट्रवादी:) १, २४ ९२५