कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणाला मैदानात उतरवायचे हा मोठा प्रश्न सध्या इंडिया आघाडीला सतावत आहे. भाजपच्या शिंदे यांच्या विरोधातील नाराजीचा किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज सध्या उभय बाजूने घेण्यात येत आहे. डाॅ.श्रीकांत शिंदे यांना आव्हान देऊ शकेल असा कोणताही चेहरा सध्या तरी या मतदारसंघात नाही हे विरोधकही मान्य करतात. विरोधी पक्षांच्या या डाव्या बाजूचा अंदाज शिंदे पिता-पुत्रांनाही आहे. खासदार म्हणून गेल्या पाच वर्षात हजारो कोटी रुपयांचा विकास कामांसाठी निधी श्रीकांत शिंदे यांच्यामुळे उपलब्ध झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्रीपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्याने थोरल्या शिंदेनीही या मतदारसंघात भरभरुन निधीचे दान टाकले. त्याचा मोठा फायदा श्रीकांत यांना मिळाला खरा मात्र मित्रपक्ष भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान आमदार आणि स्वपक्षातील नाराजांची फौज उभी करत खासदारांनी स्वत:भोवती नाराजांचे एक मोठे वर्तुळ उभे केल्याचे चित्र मात्र या मतदारसंघात ठसठशीतपणे दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा