कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आखाडा तयार आहे पण प्रतिस्पर्धी मल्ल कोण याचाच पत्ता नसल्याने अंदाजाचा धुरळा जोरदारपणे उधळत आहे. शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी केली असली तरी या जागेवर भाजपचेही लक्ष आहे. मंडलिक धनुष्यबाण चिन्हावर राहणार की कमळ असाही गुंता आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे सेना, राष्ट्रवादी की काँग्रेस अशा कोणत्या पक्षाला जाणार यावर एकमत नाही.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी मात्र आश्चर्यकारक चेहरा असेल असे म्हटले असताना याचवेळी छत्रपती घराण्यातील श्रीमंत शाहू महाराज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती या दोघांचीही नावे पुढे येऊ लागल्याने संभ्रमात भर पडली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. उदयसिंगराव गायकवाड यांनी पाचवेळा तर त्यांच्यानंतर सदाशिवराव मंडलिक यांनी चारवेळा येथे झेंडा रोवला आहे.

pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Details of election expenses of candidates in Nagpur
उमेदवारांचा खर्च : काहींची काटकसर, काहींचा मोकळा हात
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा : AIADMK, DMK च्या माजी आमदारांचा भाजपात प्रवेश, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बळ वाढणार!

शिंदे सेना की भाजप ?

राज्यातील बदलत्या घडामोडीनुसार महायुती आकाराला आली असून शिंदे सेनेचे संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळणार असे संकेत आहे. दुसऱ्यांदा संसदेत जाण्यासाठी तयारी करताना मंडलिक यांनी संपर्क बैठकांमधून विकासकामे, संसदेतील कामाचा आढावा घेत उमेदवारीची प्रतिमा उजळण्याच्या प्रयत्न चालवला आहे. त्यांचा घटलेला लोकसंपर्क, अपुरी विकास कामे, मतदारसंघातील नाराजी या बाबी अडचणीच्या ठरत आहेत. ही संधी साधूनच भाजपने हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी केली आहे. यातूनच राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे अशी नावे पुढे येत आहेत. महाडिक कुटुंबीयांनी पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे वारंवार सांगण्यास सुरुवात असल्याने मंडलिक यांच्यासमोरील पेच वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेही नाव चर्चेत आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘मविआ’त गोंधळ

महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीची लांबलचक यादी पाहायला मिळत आहे. पूर्वी चर्चेत असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील ही नावे मागे पडली आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी फलकबाजी चालवली आहे. गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी ‘मविआ’तील कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी कंबर कसली असून संपर्कफेरी पूर्ण केली आहे. ठाकरे सेनेकडून सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार, माजी आमदार संजय घाटगे ही नावे पक्षाकडे पाठवण्यात आली आहेत. शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उद्योजक व्ही. बी. पाटील यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. ‘मविआ’च्या जागा वाटपामध्ये कोल्हापूर मतदारसंघ आपल्याकडेच मिळेल असा दावा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून केला जात असल्याने मतदारसंघ नेमका कोणाला याबाबत संभ्रम आहे.

हेही वाचा : “मला कोणतेही आरक्षण आवडत नाही”; पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचलेल्या नेहरूंच्या ‘त्या’ पत्रात काय लिहिले आहे?

संभाजीराजे छत्रपतींचे प्रयत्न?

मागील पराभव मागील पराभवाची सल विसरलो नाही, असे विधान स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अलीकडेच बोलून दाखवत पुन्हा कोल्हापूरच्या आखाड्यात उतरण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यासाठी रविवारी स्वराज्य केसरीचे मैदान भरवले आहे. याआधी ते २००९ सालच्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले होते. संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्षाकडून लढणार असा इरादा व्यक्त केला आहे. यावर ‘मविआ’कडून डावपेच सुरू झाले असून श्रीमंत शाहू महाराज यांना लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. हा संभाजी राजे यांना शह असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे छत्रपती घराण्यात उमेदवारी मिळणार का, मिळाली तर कोणाला याचाही गुंता वाढीस लागला आहे. अशातच विधान परिषदेचे काँग्रेसचे गट नेते सतेज पाटील यांनी आश्चर्यकारक चेहरा निवडणुकीत असेल असे विधान केले असल्याने रहस्य अधिकच वाढले आहे. दोन्हीकडून आम्हीच जिंकू असा दावा केला जात असल्याने कोल्हापूरचा आखाडा आतापासूनच चुरशीचा होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे.

हेही वाचा : केंद्राकडून निधीवाटपात भेदभाव? मोदी सरकारला जाब विचारण्यासाठी दक्षिणेतील राज्यांची आघाडी? नेमकं काय घडतंय

२०१९ चे चित्र (मिळालेली मतं)

संजय मंडलिक – शिवसेना – ७,४९,०८५
धनंजय महाडिक – राष्ट्रवादी – ४,७८,५१७