कोल्हापूर : १५ वर्षांपूर्वी सदाशिवराव मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे पुत्र युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. आता छत्रपती शाहू महाराज व संजय मंडलिक यांच्यात लढत होत असताना पराभवाची परतफेड होणार की पराभवाची मालिका पुढे सुरू राहणार याची उत्सुकता चुरशीच्या लढतीने निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या गादीचा मुद्दा महायुतीकडून तापिवण्यात आल्याने मतदार गदीचा मान राखतात का, याची उत्सुकता आहे.

कोल्हापुरातील दुरंगी लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. उभय बाजूला तगड्या नेत्यांची फौज, कार्यकर्त्यांची मोठी कुमक, मजबूत रसद असल्याने दिवसेंदिवस निवडणुकीचे रंग गहिरे बनत चालले आहेत. काँग्रेसने शाहू छत्रपती यांची उमेदवारी असल्याने राज्याचे लक्ष वेधले आहे. पिता सदाशिवराव मंडलिक यांच्याप्रमाणेच संजय मंडलिक यांनी छत्रपती घराण्याला आव्हान द्यायला सुरू केले आहे.

latur district, Congress Deshmukh family, Nilangekar family
काँग्रेसमध्ये देशमुख यांना एक न्याय व निलंगेकरांना दुसरा याबद्दल असंतोष
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
Mahayuti Bhandara, Narendra Bhondekar,
भंडाऱ्यात महायुतीतील नाराजीच्या ठिणगीचे वणव्यात रुपांतर! नरेंद्र भोंडेकर यांच्याविरोधात इच्छुकांची अपक्ष लढण्याची तयारी
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
The position taken by the Court and Chief Justice Dhananjay Chandrachud
घ्यायला हवी तिथे कणखर भूमिका घेतली नाही, यासाठी सरन्यायाधीशांना लक्षात ठेवायचे का?
sc judge Sanjeev Khanna verdict on secularism
अन्वयार्थ : ‘सेक्युलर’विरोधात स्वामी, उपाध्याय…
banner for vote against the oppressors of the Halaba community
हलबा समाजाला डावलणाऱ्यांविरोधात मतदान, ‘या’ फलकाने वाढवले सर्व पक्षांचे टेन्शन…

हेही वाचा : रायबरेलीतूनही लढणे ही वायनाडची फसवणूक; डाव्या पक्षांकडून राहुल गांधींवर टीका

सदाशिवराव मंडलिक यांनी संभाजी राजे यांच्या विरोधात ‘पॅलेस पॉलिटिक्स ’ असा शब्दप्रयोग प्रचारात आणला वातावरण फिरवले होते. माझ्यासारखा सामान्य घरातील उमेदवार तुम्हाला सहज भेटू शकतो. ती उपलब्धता नव्या राजवाड्यात मिळणार आहे का, या त्यांच्या रोकडता प्रश्नाला मतदारानाचा प्रतिसाद मिळाला होता. अर्थात तेव्हा शरद पवार यांनी मंडलिक यांना डावलल्याची सहानुभूती मतदारांमध्ये होती. वडिलांचा तोच कित्ता संजय मंडलिक गिरवत आहेत. गादी, वारस हा वादळी – वादग्रस्त मुद्दा त्यांनी प्रचारात आणला आहे. शाहू छत्रपती यांच्यातील वैगुण्य हेरून त्यावर बोचरी टिपणी ते करीत आहेत. धुळ्याचे राजवर्धन कदमबांडे यांना खास विमानाने पाचारण करून याच मुद्द्याला राजघराण्यातून हवा दिली आहे. त्यावर शाहू छत्रपती यांना वारस इतिहास कथन करणे भाग पडले. मंडलिक यांच्यावरही टीकेचे प्रहार होत आहेत. खोके, गद्दार, बेन्टेक्स खासदार अशी टीका सेनेतून होत असताना उद्धव ठाकरे यांनी मागील वेळी निवडून दिलेले संजय मंडलिक, धैर्यशील माने यांना पराभव करून सूड उगवायचा आहे, अशी आक्रमक भाषा करीत मतदारांना सांगावा दिला. संपर्काचा अभाव, विकास कामांकडे दुर्लक्ष या मुद्द्यावरूनही संजय मंडलिक यांचे दोष चव्हाट्यावर आणण्यावर विरोधकांची भिस्त आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज यांनी साकारलेले विकासपर्व, सामाजिक सलोखा सर्वमान्य आहे. त्यातून उतराई म्हणून शाहू महाराज यांना मतदान करण्याची मानसिकता लाभार्थी वर्गामध्ये दिसून येते. राजर्षींनी केलेल्या कामाचे जरूर स्मरण आहे, पण श्रीमंत शाहू महाराज यांचे सामाजिक योगदान काय, असा परखड सवाल मंडलिक यांच्याकडून केला जात आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकरवी छत्रपती घराण्यावर राळ उठवली जात आहे. अर्थात हा मुद्दा सर्वांनाच पचनी पडणार नसल्याने मंडलिक यांच्यावर तो उलटूही शकतो. अशा उठाठेवीच्या मुद्द्यांमुळे मतदारसंघ, जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे मतदारांना शोधावे लागत आहेत.

हेही वाचा : १९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

मंडलिक यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक या प्रमुखांनी जोरदार प्रचार चालवला आहे. शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, अन्य चार आमदार अशा मातब्बरांची फौज प्रचारात उतरली आहे. शाहू महाराज हे उमेदवार असले तरी सतेज पाटील हेच विरोधकांच्या टीकेचे मुख्य लक्ष्य बनले आहे. टीकाकारांचा समाचार पाटील घेताना दिसत आहेत. त्यामुळे ही निवडणूक मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी होण्याबरोबरच ती मंडलिक विरुद्ध सतेज पाटील असाही रंग धारण करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा फायदा उठवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा खालीपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्याकडून मांडला गेलेला मुद्दा मतदारांच्या गळी उतरवण्यासाठी महाविकास आघाडीची यंत्रणा कार्यरत झाली आहे. मागासवर्गीय, मुस्लिम यांच्यात दिसणारा बदल निर्णायक ठरू शकतो. मतदारसंघाच्या उत्तर भागात शाहू महाराजांसाठी परिस्थिती अनुकूल दिसते. दक्षिणेत बड्या नेत्यांमुळे मंडलिक किती मताधिक्य घेतात यावर सारा निकाल अवलंबून असेल.