लातूर : दोन माजी मुख्यमंत्री व एक माजी केंद्रीय गृहमंत्री ज्या जिल्ह्याने दिला त्या जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेस मजबूत होती. मात्र, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव होत असल्याने यावेळी तरी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत सूर गवसेल का असा प्रश्न पडला आहे. त्याच बरोबर भाजपकडून उमेदवार बदलण्याची परंपरा कायम राहणार की विद्यमान खासदार सुधाकर श्रृगांरे यांनाच पुन्हा उमेदवारी देणार याचीही उत्सुकता आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे १९७७ साली विभाजन होऊन लातूर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. लातूर जिल्ह्यातील उदगीर ,हेर, लातूर, औसा ,निलंगा व उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा या विधानसभा मतदारसंघाचा स्वतंत्र लातूर लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. तो २००४ पर्यंत सर्वसाधारण मतदारसंघ होता मात्र २००८पुनर्रचनेत लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाला व २००९ साली लातूर ग्रामीण, लातूर शहर ,अहमदपूर ,उदगीर ,निलंगा व नांदेड जिल्ह्यातील लोहा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश लातूर लोकसभा मतदारसंघात करण्यात आला. १९७७ ची लोकसभा निवडणुक आणीबाणी उठल्यानंतर ची पहिली निवडणूक होती. त्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पी जे पाटील यांचा ८०,५०० मताने पराभव केला .त्यानंतर १९८०ते १९९९ अशा सलग सात लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर हे सलग विजयी झाले .२००४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर यांचा भाजपच्या नवख्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी आश्चर्यकारकरीत्या तीस हजारापेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला . २००९ च्या नवीन रचनेतील राखीव मतदार संघातील निवडणुकीत विलासराव देशमुख यांनी तेव्हाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष जयवंत आवळे यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात भाजपने डॉक्टर सुनील गायकवाड यांना उमेदवारी दिली व या लढतीत जयवंत आवळे हे सहा हजार मतांनी विजयी झाले.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

हेही वाचा : बंगालनंतर पंजाबमध्येही काँग्रेसला मोठा झटका; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती नसल्याचे केले स्पष्ट

२०१४ च्या निवडणुकीत भाजपचे सुनील गायकवाड तर त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते .सुनील गायकवाड यांनी दोन लाख ५६ हजार मताने दत्तात्रय बनसोडे यांचा पराभव केला .२०१९ च्या निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलत जिल्हा परिषद सदस्य सुधाकर तुकाराम शृंगारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर काँग्रेसनेही उमेदवार बदलून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली .या निवडणुकीत दोन लाख ८९ हजार १११ मतांनी शृंगारे यांनी मच्छिंद्र कामत यांचा पराभव केला.

हेही वाचा : “ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीची कल्पना करूच शकत नाही. कारण…”; ममतांच्या भूमिकेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

भाजपचा उमेदवार कोण ?

भाजप विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार की इच्छुक असणारे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव ,माजी खासदार सुनील गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अनिल गायकवाड यांना निवडणुकीत उतरवणार का ,अशी चर्चा सुरू आहे .काँग्रेस पक्षातर्फे यावेळी पुन्हा उमेदवार बदलला जाण्याची चिन्हे आहेत .काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा आहे .गेल्या तीन निवडणुकीपासून लातूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा असणारे लातूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भा.ई.नागराळे हे यावेळीही इच्छुक आहेत .याशिवाय काँग्रेसकडेही इच्छुकांची संख्या असली तरी मातब्बर उमेदवार काँग्रेसकडे अद्याप नाही. काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. २०१९च्या वेळी काँग्रेसच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले आहे. जिल्ह्यातील उदगीर व अहमदपूर येथील दोन्ही आमदार अजित दादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल आहेत. राज्यात ते कॅबिनेट मंत्री आहेत. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांचीही चांगली ताकद आहे. आता हे दोन्ही आमदार भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार आहेत . लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे हे शेकापचे आहेत. मात्र, या मतदारसंघात भाजपाला मताधिक्य मिळते. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील व विधान परिषद सदस्य आमदार रमेश कराड ही भाजपची ताकद आहे. काँग्रेस पक्षाकडे लातूर शहर व ग्रामीण या दोन मतदारसंघातील आमदार विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र हेच पाठीशी आहेत. उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भाजपच्या पाठीशी आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला सहापैकी एकाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले नव्हते .काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूर शहर व ग्रामीण मतदार संघातूनही भाजपच्याच उमेदवाराला आघाडी होती.

हेही वाचा : इंडिया आघाडीच्या ऐक्याला तडा

काँग्रेसची पकड असलेला मतदारसंघ आता भाजपची पकड असलेला मतदारसंघ झाला आहे. यावेळी तरी काँग्रेसच्या उमेदवाराला सक्षम मते मिळवण्यासाठी काँग्रेस कोणती रणनीती आखणार याकडे लक्ष लागले आहे.

२०१९ च्या निवडणुकीत उमेदवारांनी मिळालेली मते :

सुधाकर तुकाराम शृंगारे (भाजप) : ६ लाख ६१ हजार ४९५

मच्छिंद्र कामत (काँग्रेस) : ३ लाख ७२ हजार ३८४

Story img Loader