परभणी : शिवसेनेतील फुटीनंतर बंडाची फारशी लागण झाली नाही असा परभणी जिल्हा लोकसभा निवडणुकीतही नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांना साथ देणार का, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची निर्विवाद सत्ता असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात या सेनेला शह देण्यासाठी कोण मैदानात उतरणार याबाबत सध्या मोठे औत्सुक्य आहे. महायुतीत हा मतदारसंघ भाजप की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळणार याचा तिढा अजून सुटलेला नाही. गेल्या निवडणुकीवेळी ‘महायुती’चे असलेले खासदार संजय जाधव यावेळी ‘महाविकास आघाडी’त आहेत. शिवसेनेच्या फाटाफुटीत हा मतदार संघ अभेद्य राहिल्याने भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि सेनेचाच एकनाथ शिंदे गट या विद्यमान महायुतीकडून ‘उबाठा’ सेनेला ‘लक्ष्य’ केले जाईल.

१९८९ मध्ये पहिल्यांदा अशोक देशमुख हे शिवसेनेचे खासदार झाले तेव्हापासून १९९८चा अपगाद वगळता परभणीमध्ये कायमच शिवसेनेनेच निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्वच खासदारांनी आजवर पक्षद्रोह करण्याची परंपरा असली तरी. याला अपवाद अर्थातच विद्यमान खासदार संजय जाधव हे आहेत. दोन वेळा आमदारकी आणि दोन वेळा खासदारकी मिळवलेले खासदार जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. विद्यमान खासदार जाधव हे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने कडवे निष्ठावंत म्हणून त्यांना पक्षात मोठे स्थान आहे. काही महिन्यापूर्वीच सेनेत त्यांची उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. खासदार जाधव यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना पराभूत केले तर २०१९ च्या निवडणुकीत राजेश विटेकर यांना पराभूत केले. येणाऱ्या निवडणुकीत हॅट्रिक साधण्यासाठी ते सज्ज आहेत.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Aditya Thackeray eknath shinde
Aditya Thackeray : “शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण…”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी ‘मातोश्री’वर काय घडलं
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…

हेही वाचा : झारखंडमध्ये राजकारण तापलं! ईडीची कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा हेमंत सोरेन यांचा आरोप; भाजपानेही दिले प्रत्युत्तर, म्हणाले…

खासदार जाधव यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण राहील याची चाचणी महायुतीकडून केली जात आहे. मराठवाड्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात कुठेही दोन पाऊल मागे येता येणार नाही पण परभणीत अजित पवार गटासाठी जागा सोडता येईल असा विचार भाजपचे नेतृत्व करत आहे. त्यातूनच राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांच्या नावाची चर्चा केल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. विटेकरांनी त्या दृष्टीने दौरे चालवले आहेत. महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांची एक संयुक्त बैठक मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पार पडली. यावेळी परस्परांना तिळगुळ भरऊन येणाऱ्या निवडणुकीत एकसंध राहण्याची ग्वाही यावेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली. यातल्या अनेकांचे परस्परांशी मतभेद असले तरी या कार्यक्रमात मात्र सर्वांनी एकत्र राहून महायुतीच्या विजयाच्या आणाभाका घेतल्या.

संभाव्य उमेदवारांमध्ये राजेश विटेकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर या नावांबरोबरच गेल्या काही दिवसात डॉ. केदार खटिंग हे नवे नाव पुढे आले आहे. रा. स्व. संघाचे जिल्हा समन्वयक म्हणून राजीनामा देऊन गेल्या आठवड्यात डॉ. खटिंग यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकसभेसाठी सहसमन्वयक म्हणून पक्षाने त्यांची नियुक्ती केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घडामोडी घडतच आहेत. महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणूक लढणार कोण याबाबतची स्पष्टता अजून तरी झालेली नाही.

हेही वाचा : ‘भारत जोडो न्याय यात्रा’ राज्यात दाखल होण्यापूर्वी ममता बॅनर्जींची काँग्रेसवर टीका; पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राजकारण तापणार?

खासदार जाधव हे महाविकास आघाडीचा भाग असले तरी मतदारसंघात हिंदुत्ववादी अशीच त्यांची प्रतिमा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सोबत असल्याचा त्यांना जरूर फायदा झाला. तथापि केवळ महायुतीच्या मतावरच त्यांची भिस्त नव्हती. राजेश विटेकर यांच्या राजकीय विरोधकांची मदत घेण्यात ते यशस्वी झाले. दोन्ही काँग्रेसमध्ये फूट पाडून त्यांनी पडद्याआड जी राजकीय खेळी यशस्वीरित्या खेळली त्याचा त्यांना राजकीय लाभ झाला. अर्थात केवळ महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्या लढतीवरच विजयाचे गणित अवलंबून नाही. तिसरा उमेदवार कोण हेही लोकसभेसाठी महत्त्वाचे ठरते. गेल्या निवडणुकीत थेट लढतीत खासदार जाधव यांना निवडणूक जड गेली असती पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे अस्तित्व त्यावेळी निर्णायक ठरले. या उमेदवाराने दीड लाख मते घेतल्याने विटेकरांना मोठाच धक्का बसला. आपापल्या परंपरागत मतपेढीबरोबरच पडद्याआडून विरोधी पक्षातील राजकीय मित्रांची होणारी मदत ही बाबही तेवढीच महत्त्वाची ठरते. शिवसेनेच्या या मतदारसंघातल्या आजवरच्या विजयाचे ते ही एक महत्त्वाचे कारण आहे. आजच्या स्थितीत लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या तर तीन महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत.

हेही वाचा : कल्पना सोरेन कोण आहेत? झारखंडच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा का?

परभणी, पाथरी, घनसावंगी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार जाधव यांच्या मित्रपक्षांचे आमदार आहेत. अर्थात परभणी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला कायम शिवसेना पिछाडीवर असते. ही घट भरून काढणारा गंगाखेड हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला लोकसभेसाठी मोठी मतांची रसद मिळते. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार जाधव यांना चार विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. गेल्या निवडणुकीत बोर्डीकर, लोणीकर यांची मदत झाली होती. ती यावेळी होणार नाही. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी एकसंधपणे खासदार जाधव यांच्या विरोधात होती. यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली आहे. बरेच संदर्भ बदलले आहेत.

गेल्या निवडणुकीतील चित्र:

संजय जाधव (शिवसेना ) : ५,३८,९४१
राजेश विटेकर (राष्ट्रवादी) : ४,९६,७४२
वंचित आघाडी : १ लाख ४९ हजार