वर्धा : गांधी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा वर्धा हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला ओखळला जायचा. पण कालांतराने काँग्रेस संघटन कमकुवत होत गेली आणि पक्षाकडे आता प्रभावी उमेदवाराची वानवा आहे. याउलट भाजपने जिल्ह्यावरील पकड अधिक घट्ट केली आहे. तेली – कुणबी जातीय धुव्रीकरणाने या मतदारसंघातील समीकरणे बदलतात. ओबीसी घटक यंदा मतदारसंघात प्रभावी ठरण्याची चि्न्हे आहेत.

२०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे रामदास तडस विक्रमी मतांनी विजयी झाले होते. पहिल्यांदा दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे तर दुसऱ्यावेळी प्रभाताई राव यांच्या कन्या चारुलता टोकस हे दिग्गज पराभूत झाल्याने भाजपचे कायमस्वरूपी अस्तित्व मान्य व्हायला सुरुवात झाली. कधीकाळी या मतदारसंघात काँग्रेसचे नानाजी कदम हे देशात दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले होते. मात्र नंतर मतांना ओहोटी सुरू झाली. तत्कालीन केंद्रीय मंत्री राहिलेले वसंत साठे यांना दोनदा पराभव चाखावा लागला. प्रथम भाजपचे विजय मुडे व नंतर माकपचे रामचंद्र घंगारे यांनी साठेंचा व काही प्रमाणात काँग्रेसचा वरचष्मा संपुष्टात आणला. पुढे भाजपचे सुरेश वाघमारे निवडून आले होते. मात्र नंतर भाजपला विजयासाठी माेदी लाटेची वाट बघावी लागली. ही लाट काँग्रेसची धूळधाण करणारी ठरली. कारण लोकसभेतच नव्हे तर विधानसभा, जिल्हा परिषद, नगर परिषद अशा सर्व सत्तास्थानांवर ‘कमळ’ फुलले. जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होते की काय, इथपर्यंत चर्चेचे पेव फुटले. काँग्रेस नेते दत्ता मेघेंसह अनेक नेते भाजपगृही गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राखणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही भाजपची वाट धरली. निवडणुकीच्या ध्रुवीकरणात काँग्रेसचा अभेद्य गढ असणारा वर्धा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला. याच पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्याची चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसजन अस्वस्थ झाले आहेत.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sakoli, Nana Patole, Somdutt Karanjkar, teli vote,
साकोलीत पटोले, करंजेकर व ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत, तेली, कुणबींच्या मतांवर विजय अवलंबून
north nagpur
ध्रुवीकरणाशिवाय उत्तर नागपुरात भाजपला यश मिळवणे अशक्य? मतविभाजन काँग्रेसला रोखणार का?
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
nana patole latest marathi news
“‘शेटजी-भटजी’च्या पक्षाला ओबीसी नेत्यांनी मोठे केले”, पटोले म्हणतात, “बावनकुळेंनी अपमान सहन करण्यापेक्षा…”
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत

हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या दहा जागांसाठी चुरस, ११ उमेदवार रिंगणात; कोण मारणार बाजी?

२०१९ च्या निवडणुकीतसुद्धा हा मतदारसंघ काँग्रेस आघाडीतील राजू शेट्टी गटाला सोडण्याची जोरदार चर्चा झाली होती. मात्र काँग्रेसनेत्यांनी ही बाब प्रतिष्ठेची केल्याने चारुलता टाेकस यांना उमेदवारी मिळाली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा मतदारसंघ स्वत:च्या गटासाठी मागितला असल्याची बातमी धडकली. त्यामुळे चकित झालेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी थेट पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ई-मेल करीत भावना मांडल्या. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने ऐतिहासिक ठरलेला हा जिल्हा आहे. काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमाची सुरुवात सेवाग्रामातून झाली आहे. काँग्रेसचे नाक असलेला हा मतदारसंघ काँग्रेसने इतरांसाठी सोडण्याचा विचार पण करू नये, अशी कळकळ चांदुरकर यांनी त्यात व्यक्त केली. काँग्रेसची खस्ता परिस्थिती पाहून काँग्रेसजवळ उमेदवार तरी कुठे आहे, अशी खिल्ली मित्रपक्षच उडवतात. त्याचे उत्तर सुनील केदार यांचे नाव घेत दिले जाते. केदार यांच्यावरील मळभ दूर होईल व ते निवडणुकीस पात्र ठरतील, अशी आशा काँग्रेस नेते ठेवून आहेत. हा जर तरचा प्रश्न असल्याने काँग्रेस गोटात सध्या शांतता आहे. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांची उमेदवारी पक्की मानली जाते. मात्र भाकर परतवण्याचा भाजपचा कल राहिल्यास आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे नाव पुढे केले जाते.

हेही वाचा : शेतकरी आंदोलनावर पंजाबमधील भाजपा नेत्यांचे मौन का?

हा मतदारसंघ तेली-कुणबी अशा जातीय ध्रुवीकरणाने नेहमीच चर्चेत असतो. तडस यांच्या विरोधात काँग्रेसने दाेन्ही वेळा कुणबी समाजातील उमेदवार दिले होते. मात्र मोदी लाटेत या पैलूची साधी चर्चाही झाली नाही. २०२४ च्या निवडणुकीत भाजपशी कोण टक्कर देणार, हाच प्रश्न आता चर्चेत आहे. वर्धा मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा क्षेत्रात भाजपचे तर एका क्षेत्रात काँग्रेस तर अन्य एका विधानसभा क्षेत्रात अपक्ष आमदार आहे.

२०१९ च्या निवडणुकीतील उमेदवारांनी मिळालेली मते :

रामदास तडस (भाजप) ५ लाख ७८ हजार
चारुलता टोकस (काँग्रेस) ३ लाख ९१ हजार