मुंबई : एकीकडे उच्चभ्रू वस्ती, दुसरीकडे मोडकळीस आलेल्या इमारती व चाळी, झोपडपट्टी अशी रचना असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये कडवी लढत होईल अशी चिन्हे आहेत. मुंबईतील ताब्यात असलेला एकमेव मतदारसंघ कायम राखण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची कसोटी लागली असतानाच, ठाकरे गटाला मुंबईत धडा शिकविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा कायम राखण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि खासदार अरविंद सावंत यांच्या समोर मोठे आव्हान असेल. त्यातच महाविकास आघाडीत काँग्रेसने मिलिंद देवरा यांच्यासाठी या जागेवर दावा केल्याने विरोधी आघाडीत एकवाक्यता दिसत नाही. दुसरीकडे, भाजपमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही लोकसभेचे वेध लागल्याने भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे.

Kalyan Dombivli hawker removal chief suspended
कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांची, पाठराखण करणारा पथक प्रमुख निलंबित
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Dombivli West, illegal building, land mafias, demolition notice, municipality, Prakash Gothe, Shankar Thakur, encroachment control,
जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून उभारलेल्या बेकायदा इमारतीला नोटीस, इमारतीत प्रवेशासाठी रस्ता नसल्याने गाळ्यामधून प्रवेशव्दार
kdmc issue notice to illegal building
जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून उभारलेल्या बेकायदा इमारतीला नोटीस; इमारतीत प्रवेशासाठी रस्ता नसल्याने गाळ्यामधून प्रवेशव्दार
nagpur, Dharampeth, pub license, drug abuse, noise disturbance, Nagpur pub, residential area, Shankarnagar, Ramnagar, political influence, police action, Nagpur news,
नागपूर : धरमपेठ ‘रस्त्या’वरील वादग्रस्त पबचा परवाना रद्द करा, त्रस्त नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव
Nagpur, pub, Shankarnagar to Dharampeth, drugs, ganja, police inaction, political leader, youth, nightlife, complaints, loud DJ, drug trafficking,
नागपूर : गांजा-ड्रग्जच्या नशेत तरुण-तरुणी धुंद! ‘त्या’ पबला राजकीय वरदहस्त
minorities targeted in bjp ruled states deeply troubling congress slams bulldozer action in mp
बुलडोझर न्याय अमान्य! अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे व्यथित करणारे; घरे पाडणे थांबवण्याची काँग्रेसची मागणी
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा ? अपात्रतेवर या आठवड्यात निकाल

कुलाबा आणि मलबार हिलमधील उच्चभ्रू वस्ती, मुंबादेवी, भायखळामधील मिश्र वस्ती, वरळी, शिवडी अशी मराठी वस्ती असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात भारताचे प्रतिबिंब उमटते. अठरा पगड जाती-जमाती, धर्माचे नागरिक या मतदारसंघात आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघ हा साधारणपणे निवडून येणाऱया सत्ताधारी पक्षाच्या पाठीशी राहतो, असा अनुभव आहे. जनता पक्षाच्या लाटेत १९७७ मध्ये जनता पक्षाचे रतनसिंह राजदा, काँग्रॅेसची सत्ता आली तेव्हा मुरली देवरा, भाजप सत्तेत असताना जयवंतीबेन मेहता निवडून येत असत. २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. मोदी – २ मंत्रिमंडळात काही काळ त्यांनी अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपदही भूषविले. शिवसेनेने महाविकास आघाडीत प्रवेश करताच सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

आगामी निवडणुकीत चित्र कसे असेल याची साऱयांनाच उत्सुकता आहे. शिवसेनेत फूट पडल्यावर मुंबईतील शिवसेनेच्या तीनपैकी दोन खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साथ दिली. अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. इंडिया किंवा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचा दावा विद्यमान खासदार त्या पक्षाला जागा या सूत्रानुसार जागा मिळणे क्रमप्राप्त आहे. पण महाविकास आघाडीत काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. २००४ आणि २००९ मध्ये या मतदारसंघातून निवडून आलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबई मतदारसंघाचे वेध लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे मतदारसंघात दर्शन होऊ लागले. यावरून देवरा यांना निवडणूक लढवायची आहे, असा अर्थ काढला जाऊ लागला. अन्यथा देवरा यांचे मतदारसंघात दर्शन दुर्मिळ असते. सावंत यांनी अन्य मतदारसंघातून लढावे आणि देवरा यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडावे, अशी देवरा समर्थकांची भूमिका आहे. सध्या जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटेल असेच एकूण चित्र आहे.

हेही वाचा : फुटीनंतर निष्ठावानांना सक्रिय करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न, रोहित पवारांबद्दल मतभेद उघड

दक्षिण मुंबईत यंदा विजय मिळेल, असा भाजपला ठाम विश्वास आहे. यामुळेच भाजपमध्ये इच्छूकांची संख्याही मोठी आहे. मराठी, गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय या मतांच्या आधारे विजयाचे गणित जुळेल, असा भाजप नेत्यांना विश्वास वाटतो. विधानसभा अध्यक्ष व कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर, पालकमंत्री व मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा हे भाजपमध्ये प्रमुख दावेदार आहेत. याशिवाय अन्य काही जण उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. विधानसभेत उमेदवारी नाकारल्याने लोकसभेला पक्षाने विचार करावा, असा राज पुरोहित यांचा प्रयत्न आहे. भाजपला वातावारण अनुकूल असल्याने इच्छुकांची संख्याही अधिक आहे.

भेंडी बाजार, उमरखडी, नागपाडा भागांतील मुस्लीम मतेही या मतदारसंघात लक्षणिय आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मुस्लीम समाजात ठाकरे यांची प्रतिमा उंचावली आहे. यामुळे या परिसरातील एकगट्टा मतदान इंडिया आघाडीच्या उमेदवाराला व्हावे, असा प्रयत्न असेल. एमआयएमचा उमेदवार रिंगणात राहिल्यास काही प्रमाणात मुस्लीम मतांचे विभाजन होऊ शकते. गिरगाव, मलबार हिल, वरळी भाागातील गुजराती मतदारांवर भाजपची मदार आहे.

हेही वाचा : मराठवाड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासमोर आव्हान

दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटापुढे जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल. मुंबईतील सध्याची एकमेव जागा पक्षाकडे उरली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी दक्षिण मुंबईतील विजय महत्त्वाचा आहे. दक्षिण मुंबईत विजय मिळाल्यास भाजपचे नाक कापले जाईल, असे शिवसेना नेत्यांना वाटते. खासदार अरविंद सावंत यांचा मतदारसंघात संपर्क चांगला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडून सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिले. शिवसेनेची ताकद, मु्स्लीम मतदारांचा पाठिंबा या आधारे जागा कायम राखण्याचा सावंत यांचा प्रयत्न आहे.

दक्षिण मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून नवीन घरांचे आश्वासन दिले जाते. मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाचा मुद्दा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो.

२०१९च्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते :

अरविंद सावंत (शिवसेना) – ४,२१,९३७
मिलिंद देवरा (काँग्रेस) -३,२१,८७०