दयानंद लिपारे

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांसह, माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मताची विभागणीत दोन्हीपैकी एकाच विजय होतो की या परिस्थितीचा फायदा मिळून खासदार धैर्यशील माने पुन्हा संसदेत पोहचतात याला महत्त्व आले आहे. वंचितचे डी. सी. पाटील यांच्या उमेदवारीमुळे कोण घायाळ होणार याचे कुतूहल असणार आहे.

nitin Gadkari constitution of India
Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही – नितीन गडकरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
eknath shinde slams maha vikas aghadi government in kalyan
विकास विरोधी, शिवसेनेचा विचार काँग्रेसच्या दावणीला बांधलेले सरकार उलथवून टाकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
maharashtra assembly election 2024 cm eknath shinde slams opposition in campaign rally in thane
आम्ही पैसे लाटणारे नाही, तर जनतेचे पैसे जनतेला वाटणारे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

हातकणंगले मध्ये उमेदवारी कोणाला मिळणार हे दिवसेंदिवस जटिल बनत चालले होते. अखेर काल उद्धव ठाकरे यांनी पक्ष चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला. आता ही लढत प्रामुख्याने चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांच्यात रंगणार आहे. सर्व उमेदवार तुल्यबळ असल्याने मतदारांचाही गोंधळ उडवा अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा >>> तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…

धैर्यशील माने यांनी सर्वाधिक निधी मिळवल्याचा दावा केला आहे. त्यांच्या बाजूने महायुतीची ताकद आहे. तुलनेने या मतदारसंघात शिंदे सेना आणि अजितदादा राष्ट्रवादी यांची ताकद तितकी प्रभावी नाही. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा पुढे करून हिंदुत्ववादी मतदारांना साद घालावी लागणार आहेत. भाजपची प्रभावी यंत्रणा किती कार्यक्षमपणे कार्यरत राहते यावर मतदानाचा आलेख उंचावणार आहे. उमेदवारीच्या स्पर्धेतून नाराज झालेले आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळ भाजपचे संजय पाटील,गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे या प्रमुख नेत्यांची नाराजी दूर करून प्रचारात आणण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहे.

हेही वाचा >>> काँग्रेसला ‘ठोसा’ देत ऑलिम्पिक पदकविजेत्या बॉक्सरचा भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या ‘रिंग’मध्ये प्रवेश; कारण काय?

राजू शेट्टी यांनी मातोश्री कडे पाठिंबा मिळण्यासाठी दोन वेळा फेरी मारूनही त्याचा फायदा झाला नाही. शेट्टी आता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. शेतकरी विशेषतः ऊस उत्पादक यांच्या मतावर त्यांची भिस्त राहणार आहे. ग्रामीण भागात त्यांना सुरुवातीपासून चांगला मिळत आला आहे हि जमेची बाजू. यंदाच्या हंगामात अतिरिक्त ऊस दराचे आंदोलन करून त्यांनी शेतकऱ्यांची माने जिंकली असली तरी हि रक्कम अजून न मिळाल्याने त्याच्या नाराजीला तोंड देत अक्षरशः एकाला चालो रे वाटचाल करावी लागणार आहे.

सत्यजित पाटील सरुडकर यांचे त्यांच्या स्वतःच्या पन्हाळा – शाहूवाडी मतदारसंघात हक्काचे चांगले मतदान आहे. शिवाय, शिवसैनिकांची फौज, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नियोजन, त्यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर हे विश्वास कारखान्यात उपाध्यक्ष असल्याने तेथील अध्यक्ष आमदार मानसिंग नाईक यांची कुमक, अन्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पाठबळ हे त्यांचे बलस्थान ठरणार आहे. राजू शेट्टी यांच्यावर साखर कारखानदारांचा रोष आहे. त्यातून मतदारसंघातील साखर कारखानदारांची लॉबी साखर कार्खादारांचे प्रतिनिधी म्या नात्याने त्यांना पडद्याआडून मदत करण्याची शक्यताही आहे. मतदारसंघातील पूर्व भागाकडे त्यांचा संपर्क कमी असल्याने येथे त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

वंचित मुळे कोण वंचित ? बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराने गेल्या वेळी सव्वालाख मते घेऊन राजू शेट्टी यांचा डाव मोडला होता. याच आघाडीने यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शासकीय कामाचे मोठे कंत्राटदार असलेले पाटील हे जैन समाजाचे आहेत. परिणामी पाटील यांची उमेदवारी कोणाला तारक नि कोणाला मारक ठरणार याचे गणित घातले जात आहे.