आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई आसाममधील जोरहाटमधून निवडणूक लढवणार आहेत. नकुल नाथ मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून निवडणूक लढवणार आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या राहुल कासवान यांना त्यांचा सध्याचा लोकसभा मतदारसंघ चुरू येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत जालोरमधून निवडणूक लढवणार आहे, असंही काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या यादीमध्ये आसाम (१४ पैकी ९ जागा), मध्य प्रदेश (२९ पैकी २८), राजस्थान (सर्व २५), गुजरात (सर्व २६), उत्तराखंड (सर्व ५) आणि दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशा (१ पैकी १)तील जागांचा समावेश आहे.

पहिल्या यादीत केरळमधील टी एन प्रतापन यांना तिकीट नाकारण्यात आलं, त्यानंतर खलेक हे दुसरे विद्यमान काँग्रेस खासदार आहेत, ज्यांना तिकीट दिलेलं नाही. खलेक धुबरी मतदारसंघातून तिकीट मागत होते, परंतु काँग्रेसने समगुरीचे आमदार रकीबुल हुसैन यांना त्या जागेवरून उमेदवारी दिली. उमेदवारांच्या पहिल्या यादीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, छत्तीसगडचे माजी गृहमंत्री ताम्रध्वज साहू आणि एआयसीसीचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांची नावे होती, त्यामुळेच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले होते.

Chembur Marwari Chawl, citizens vote vidhan sabha boycott, vote boycott, rehabilitation,
मुंबई : दीड हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Jayant Patil criticizes Mahayuti, corruption, Jayant Patil,
पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान
first phase of campaigning in Jharkhand, Jharkhand assembly seats, Jharkhand election, Jharkhand latest news,
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्याची प्रचार सांगता, विधानसभेच्या ४३ जागांसाठी उद्या मतदान

परंतु यंदा काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेतेच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास नाखुश असल्याचं समजतंय. काँग्रेसकडून हिंदीचा प्रभाव असलेल्या जागांवर वरिष्ठ नेत्यांना निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलेय, जेथे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनुसार भाजपा मजबूत स्थितीत आहे. उदाहरणार्थ, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी न देता पक्षाने त्यांचा मुलगा वैभव यांना पुन्हा उमेदवारी दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वैभवचा जोधपूरमधून केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडून पराभव झाला होता. मंगळवारी वैभवला पुन्हा रिंगणात उतरवण्यात आले. गेल्या चार निवडणुकीत भाजपाने ही जागा जिंकल्यामुळे काँग्रेससाठी ती जिंकणे कठीण आहे.

हेही वाचाः विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी सरकारला म्हणाले, निवडणूक आयुक्त निवड प्रक्रिया वेळेत करायची तर…

ज्येष्ठ नेते सचिन पायलट आणि भंवर जितेंद्र सिंहहेदेखील निवडणूक लढवण्याची शक्यता धूसर आहे, कारण ते राज्यांचे प्रभारी असून, काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली, गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष भरतसिंह सोलंकी आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी निवडणूक लढवण्यास अनिच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते निवडणूक लढवण्यास टाळाटाळ करीत आहेत. जर कार्यकर्त्यांनी त्यांना लढायला सांगितले तर ते लढू शकतात, असंही त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणालेत. “आम्ही मागे हटत आहोत हे चुकीचे आहे. मी ८३ वर्षांचा आहे, तुम्ही (पत्रकार) ६५ व्या वर्षी निवृत्त आहात, माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितले तर मी नक्कीच लढेन,” असेही मल्लिकार्जुन खरगे पत्रकारांना म्हणाले.

हेही वाचाः नंदुरबारमधील पदमाकर वळवी यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे नुकसान किती ?

घराणेशाहीवर भाजपा हल्ले करत असली तरी यादीत काँग्रेसचे किमान चार वंशज आहेत. वैभव व्यतिरिक्त गौरव गोगोई हे दोन वेळा खासदार राहिले आहेत. तसेच आसामचे दिवंगत काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे ते पुत्र आहेत; तर कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ आणि छिंदवाडामधील विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री योगेंद्र मकवाना यांचा मुलगा भरत मकवाना यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना अहमदाबाद पश्चिम (SC) मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे; तर काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते शिशराम ओला यांचे पुत्र ब्रिजेंद्र ओला हे झुंझुनूमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

वेणुगोपाल म्हणाले की, दुसऱ्या यादीत ओबीसी समुदायातील १३ उमेदवार आहेत, त्यात अनुसूचित जातीचे १०, अनुसूचित जमातीचे नऊ आणि मुस्लिम दोन उमेदवार आहेत. पक्षाने जाहीर केलेल्या ४३ जागांपैकी १८ SC/ST राखीव जागा आहेत. विशेष म्हणजे २५ उमेदवार हे २५ वर्षांखालील आहेत, आठ उमेदवार हे ५१ ते ६० या वयोगटातील आहेत. तसेच १० उमेदवार हे ६१ ते ७१ वयाचे आहेत. जाहीर केलेल्या ४३ उमेदवारांपैकी चार महिला आहेत, ज्यात आसाम महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मीरा बोरठाकूर यांचा समावेश आहे, ज्या गुवाहाटीमधून रिंगणात आहेत. इतर पक्षांतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना तिकीट मिळाले आहे. दोन वेळा माजी खासदार राहिलेल्या माधब राजबंशी यांनासुद्धा दररंग-उदलगुरीमधून रिंगणात उतरवले आहे. करीमगंजमधून रिंगणात उतरलेले हाफिज रशीद अहमद चौधरी यांनी गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते AIUDF चे संस्थापक कार्यकारी अध्यक्ष होते.

राजस्थानमध्ये पक्षाने राहुल कासवान यांना चुरू मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, जी जागा २०१९ मध्ये त्यांनी भाजपासाठी जिंकली होती. कासवान यांनी सोमवारीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे उदयपूरचे उमेदवार ताराचंद मीणा हे उच्चपदस्थ नोकरशहा आहेत, ज्यांनी अलीकडेच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ते गेहलोत यांच्या जवळचे असल्याचे बोलले जाते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले अनेक विद्यमान आमदार या यादीत आहेत. मध्य प्रदेशात भिंड (SC) मतदारसंघातील भांडेरचे आमदार फूलसिंग बरैया यांचा समावेश आहे; सतना मतदारसंघातून आमदार सिद्धार्थ कुशवाह आणि मांडला (ST) मतदारसंघातून दिंडोरीचे आमदार ओंकार सिंग मरकाम यांना उमेदवारी दिली आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसने बनासकांठा मतदारसंघातून वावच्या आमदार गेनीबेन ठाकोर आणि वलसाडमधून वांसदाचे आमदार अनंतभाई पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे. राजस्थानमध्ये त्यांनी मुंडावारचे आमदार ललित यादव यांना अलवर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या विरोधात आणि देवली-उनियाराचे आमदार हरिश चंद्र मीणा यांना टोंक-सवाई माधोपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका लढवलेल्या पण पराभूत झालेल्यांचाही यादीत समावेश आहे, ज्यात गुजरातमधील पोरबंदर मतदारसंघातून ललित वासोया, मध्य प्रदेशातील सिधी मतदारसंघातून काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य कमलेश्वर पटेल, राजस्थानचे माजी मंत्री गोविंद राम मेघवाल यांना बिकानेर आणि चित्तोडगड मतदारसंघातून उदयलाल अंजना यांना उमेदवारी दिली आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसने टिहरी गढवालमधून मसुरीचे दोन वेळा आमदार राहिलेले जोतसिंग गुन्सोला यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये याच जागेवरून भाजपाच्या अजय टमटा यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर अल्मोडा येथील माजी खासदार प्रदीप टमटा यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. गुजरातमधील काँग्रेसच्या यादीत रोहन गुप्ता यांचा समावेश आहे, ज्यांना जून २०२२ मध्ये सोशल मीडिया प्रमुखपदावरून हटवण्यात आले होते. आसाममध्ये काँग्रेसने आता लोकसभेच्या १४ पैकी १२ जागांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. दिब्रुगढ ही एकमेव अशी जागा आहे, जी आसाममधील काँग्रेसच्या आघाडीच्या मित्र पक्षांकडून लढवली जाणार आहे, ती आसाम राष्ट्रीय परिषदेच्या लुरिनज्योती गोगोई यांच्याकडे जाणार आहे, जरी काँग्रेस प्रादेशिक पक्षांसह १५ पक्षांच्या आघाडीत समावेश आहे. अब्दुल खलेक यांना वगळण्यात आले होते.