तेलंगणामध्ये लोकसभेच्या १७ जागा आहेत. त्यापैकी बहुतांश जागांवर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच सामना आहे. भाजपाला तेलंगणात केवळ काँग्रेसकडूनच नव्हे तर भारत राष्ट्र समिती (BRS) कडूनही कठीण आव्हान आहे. भाजपा आपल्या गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यातील भाजपाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, करीमनगरचे खासदार बंदी संजय कुमार यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली असून, अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरे दिली आहेत. तेलंगणात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीतील पराभवातून भाजपा सावरला आहे का?

राज्यातील निवडणुका वेगळ्या असून, त्या स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जातात. BRS उमेदवार करीमनगर विधानसभा जागा जिंकला, कारण सर्व मुस्लिम मतदारांनी त्यांना मतदान केले. तरीही माझा फक्त ३ हजार मतांनी पराभव झाला.

अनेक कल्याणकारी योजना सादर करूनही बीआरएसला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आता भाजपा कल्याणकारी योजनांबद्दल बोलत आहे.

माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे केंद्रातील मोदी सरकारने पाठवलेला पैसा त्यांच्या (KCR च्या) नावाने योजना राबवण्यासाठी वापरत होते. जेव्हा निर्मला सीतारमण यांनी तेलंगणाला भेट दिली आणि प्रचार सामग्रीमधून पंतप्रधान मोदींचा फोटो गायब असल्याचे पाहिले तेव्हा त्या संतापल्या.

काँग्रेस अनेक कल्याणकारी योजनांचे आश्वासनही देत आहे.

या निवडणुकीचा विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच महत्त्वाचे आहेत, दुसरे कोणीही नाही. ही निवडणूक मोदींची आहे.

हेही वाचाः दिंडोरीत महायुती, मविआ अंतर्गत मतभेदांमुळे त्रस्त

बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिल्याने भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

भाजपा हा एक राजकीय पक्ष आहे. तो मजबूत करण्यासाठी आपल्याला लोकांना आणावे लागेल. केडर मोदींबरोबर आहे. ही निवडणूक आयपीएल म्हणजेच इंडियन पॉलिटिकल लीग सारखी आहे आणि काँग्रेसला कर्णधार नाही, इंडिया आघाडीचीही तीच अवस्था आहे. भाजपाचे कॅप्टन पीएम मोदी आहेत. त्यांचा कर्णधार कोण? इथल्या लोकांना माहीत आहे की मोदींनी मोफत रेशन आणि पीएम आवास योजना यांसारखे कार्यक्रम सुरू केले आहेत. या सर्व कार्यक्रमांना कोण निधी देत आहे हे त्यांना माहीत आहे.

तुमच्यासमोर कोणती आव्हाने आहेत?

भाजपाने केलेल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. मोदींनी सुरू केलेल्या सर्व योजनांबद्दल आपण बोलत आहोत. उदाहरणार्थ, माझ्या करीमनगर मतदारसंघात ५७०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. केसीआर यांनी पंचायतींना एक रुपयाही दिला नाही. त्यांनी निवडून आलेल्या सरपंचांना ५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले, पण काहीही दिले नाही. त्यामुळे अनेक जण त्याच्या विरोधात गेले आहेत. काँग्रेसही योजना राबवण्याच्या किंवा गावाच्या विकासासाठी पैसा देण्याच्या स्थितीत नाही. लोकांना माहिती आहे की, त्यांना निधीसाठी मोदींवर अवलंबून राहावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी फी पूर्तीचे आश्वासन पूर्ण करण्यातही BRS अपयशी ठरले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हॉलतिकीट नाकारण्यात आले. भाजपाने खूप दबाव आणल्यानंतरच त्यांना परवानगी देण्यात आली.

सत्तेत राहिल्याने काँग्रेसला फायदा होतो का?

काँग्रेसमध्ये बरीच सत्ताकेंद्रे आहे, त्यामुळेच काँग्रेसची सत्ता येत नाही

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेने काही बदल झाला आहे का?

राम मंदिराच्या कार्यक्रमाभोवती मोदींच्या समर्थनाची रणधुमाळी सुरू होती. खरं तर आम्ही माझ्या मतदारसंघातील सर्व सहा लाख कुटुंबांना मंदिराचे फ्रेम केलेले फोटो वितरीत करीत आहोत आणि ते याबद्दल खूप उत्साही आहेत.