राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. एनडीएमधील भाजपाच्या मित्रपक्षांनी नरेंद्र मोदींना त्यांचा नेता म्हणून निवडले आहे. नरेंद्र मोदी रविवारी (९ जून) संध्याकाळी ६ वाजता तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभेवर निवडून आलेल्या सात अपक्ष खासदारांनीही एनडीएला पाठिंबा दिल्याचे आणि एनडीएचा आकडा ३०३ वर पोहोचल्याची माहिती आहे. पण यात किती सत्य आहे? कोण आहेत हे अपक्ष खासदार? जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विशाल पाटील
माजी काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीचे पाचवेळा लोकसभा खासदार राहिलेल्या प्रकाशबापू पाटील यांचे पुत्र आहेत आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. त्यांनी सांगलीतून लोकसभा निवडणूक जिंकली. महाराष्ट्र विकास आघाडीत युतीमध्ये जागावाटप करारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील उमेदवाराला तिकीट दिल्यानंतर त्यांनी सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नसले तरी त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय काँग्रेसला दिले आहे आणि आपला पाठींबाही काँग्रेस पक्षाला दिला आहे.
हेही वाचा : स्मृती इराणी, कन्हैया कुमार ते ओमर अब्दुल्ला: लोकसभेत ‘या’ दिग्गज नेत्यांना बसला धक्का
“काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणे शक्य झाले नाही, पण काँग्रेसची विचारधारा लक्षात घेऊन लोकांनी मला मतदान केले आहे. मी हे विसरू शकत नाही. त्यामुळे निवडून आल्यानंतर मी काँग्रेसला पाठिंबा दिला. आज मी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंब्याचे पत्र पाठवले आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. आम्ही एकत्र काम करू,” असे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
एआयसीसीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, सांगलीत काँग्रेसची मुळे खोलवर रूजली आहेत आणि याच भावनेने पाटील यांनी पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. “काँग्रेसचे दिग्गज वसंतदादा पाटील जी यांचा वारसा पुढे नेणारे ते योग्य दावेदार आहेत,” असे वेणुगोपाल म्हणाले. विशाल पाटील यांच्या पाठिंब्याने लोकसभेत काँग्रेसचे संख्याबळ १०० वर गेले आहे, असे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.
अमृतपाल सिंग
‘वारीस पंजाब डे’चे प्रमुख अमृतपाल सिंग सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात आहेत. सिंग पंजाबमधील खडूर साहिब मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे कुलबीर सिंग झिरा यांचा १,९७,१२० मतांनी पराभव केला. खलिस्तानी अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी सिंग यांचा महिनाभर शोध घेतला. अखेर गेल्या वर्षी २३ एप्रिल रोजी त्याला अटक करण्यात आली. सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हिंसा भडकावणे, हत्येचा प्रयत्न, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि सार्वजनिक सेवकांच्या कर्तव्य बजावण्यात अडथळे निर्माण करणे, अशा अनेक फौजदारी खटल्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे वडील तरसेम सिंग यांनी मंगळवारी देवाचे आभार मानले आणि ‘संगत’ (समुदाय) बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्यांनी पीटीआयला सांगितले की, “संगत समुदायानेच ही लढाई लढली.” सिंग यांच्या वडिलांनी पूर्वी सांगितले होते की त्यांचा मुलगा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही परंतु संगत समुदायाच्या सांगण्यावरून त्याने आपला विचार बदलला. सिंह एनडीएमध्ये जाण्याची शक्यता नाही. शिरोमणी अकाली दल (एसएडी) (अमृतसर) प्रमुख आणि खलिस्तानचे सहानुभूतीदार सिमरनजीत सिंग मान यांनी त्यांच्या पक्षाचा सिंग यांना पाठिंबा दिला होता आणि खडूर साहिब जागेवरून कोणताही उमेदवार उभा केला नाही.
शेख अब्दुल राशीद
‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार शेख अब्दुल राशीद सध्या तिहार तुरुंगात आहेत. खोऱ्यात फुटीरतावादी कारवाया घडवून आणल्याबद्दल आणि टेरर फंडिंगशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात कायद्याच्या विविध कलमांखाली राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करून बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. राशीद यांना ४७०,००० मते मिळाली, तर अब्दुल्ला यांना २,६८,००० मते मिळाली. राशीद पहिल्यांदा २००८ मध्ये लांगेट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आले. राशीदही एनडीएमध्ये जाण्याची शक्यता नाही.
राजेश रंजन
राजेश रंजन यांना पप्पू यादव म्हणूनही ओळखले जाते. ते बिहारच्या पूर्णिया मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी २३ हजारांपेक्षा पेक्षा जास्त मतांच्या फरकाने ही जागा जिंकली. लोकसभा निवडणुकीपूर्वी यादव यांनी त्यांच्या जन अधिकार पक्षाचे (जेएपी) काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. परंतु, यादव यांनी अपक्ष म्हणून जागा लढवण्याचा निर्णय घेतला. ‘एनडीटीव्ही’नुसार यादव काँग्रेसला पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे.
मोहम्मद हनीफा
मोहम्मद हनीफा लडाख मतदारसंघाचे खासदार आहेत. ते नॅशनल कॉन्फरन्सचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, लडाखमधून विजयी होणारे ते चौथे अपक्ष उमेदवार आहेत. ही जागा यापूर्वी १९८९, २००४ आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्षांनी जिंकली होती. हनीफा यांनी लडाखमध्ये काँग्रेसच्या सेरिंग नामग्याल यांचा पराभव केला. हनीफा यांना ६५,३०३ मते मिळाली तर नामग्याल यांना ३७, ३९७ मते मिळाली. त्यांच्यात २७,९०६ मतांचे अंतर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाच्या ताशी ग्याल्सन यांना ३१,९५६ मते मिळाली. सूत्रांनी ‘फर्स्टपोस्ट’ला सांगितले की, हनीफा एनडीएमध्ये सामील होणार नाही. परंतु, ते इंडिया आघाडीत सामील होतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.
सरबजीत सिंग खालसा
सरबजीत सिंग खालसा हे बेअंत सिंग यांचे पुत्र आहेत. बेअंत सिंग इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांपैकी एक होते. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, खालसा यांचे आजोबा बाबा सुचा सिंग हे भटिंडा खालसाचे लोकसभेचे खासदार होते. सरबजीत यांनी फरीदकोट लोकसभा मतदारसंघात आपच्या करमजीत सिंग अनमोल यांचा ७०,०५३ मतांनी पराभव केला.
मतदानाच्या प्रचारादरम्यान, त्यांनी मोहाली येथे २०१५च्या शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबच्या विटंबनेचा मुद्दा उपस्थित केला. याविरोधातील आंदोलनादरम्यान दोन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. तसेच खालसा यांनी अंमली पदार्थांचा धोका, नदीचे पाणी, किमान आधारभूत किमतीपर्यंत कायदेशीर हमी देण्याची शेतकऱ्यांची मागणी, हे मुद्देही मांडले. सरबजीत सिंग खालसा निवडणूक लढण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी २००४ ची लोकसभा निवडणूक भटिंडा मतदारसंघातून एसएडी (अमृतसर) च्या तिकीटावर लढवली होती. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २००७ ची पंजाब विधानसभा निवडणूकही त्यांनी बर्नाला येथील भदौर मतदारसंघातून लढवली होती. परंतु, या निवडणुकीतही त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
खालसा यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपच्या तिकीटावर फतेहगढ साहिब मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावले होते, परंतु त्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांच्या आई बिमल कौर १९८९ मध्ये रोपर मतदारसंघातून खासदार होत्या. खालसा कोणाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट नाही.
हेही वाचा : निवडणुकीतील अपयशानंतर पश्चिम बंगाल भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कारण काय?
पटेल उमेशभाई बाबूभाई
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार बाबूभाई हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी दिव आणि दमणमधून लोकसभेची जागा जिंकली. भाजपाचे हेवीवेट लालू पटेल यांचा पराभव करून बाबूभाईंनी सर्वांना आश्चर्यचकीत केले. बाबूभाई हे केंद्रशासित प्रदेशातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. बाबूभाई यांना ४२,५२३ मते मिळाली, तर पटेल यांना ३६,२९८ मते मिळाली. त्यांच्यात ६,२२५ मतांचे अंतर आहे. ‘न्यू इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, बाबूभाईंनी प्रचारादरम्यान दादरा व नगर हवेली आणि दमण व दीवचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार टीका केली. बाबूभाई कोणाला पाठिंबा देतील हेदेखील अस्पष्ट आहे.