महाविद्यालयीन जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष केलेल्या जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ यांचा सामाजिक व राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वापासून अध्यक्षपद, विधान परिषद सदस्य आणि आता खासदार अशी मजल त्यांनी मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाने एकदा दुखावूनही वाघ या पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. त्याचे फळ त्यांना मिळाले. भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वाघ यांना उमेदवारी जाहीर करून नंतर अचानक रद्द केली होती. वेळात वेळ काढून दिवसभरात दोन तास तरी वाचनासाठी देणाऱ्या स्मिता वाघ यांचे माहेर नाशिकचे तर सासर जळगामधील. त्या कला शाखेत (मानसशास्त्र) पदवीधर आहेत. माहेर आणि सासर दोन्हींकडून त्यांना राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा मिळाला आहे.

हेही वाचा >>>एनटीआर ते चिरंजीवी! चित्रपट, राजकारण, घराणेशाही आणि आंध्र प्रदेशवरील निर्विवाद वर्चस्व

भाजपचे जिल्हाध्यक्ष ते केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असा त्यांचा प्रवास राहिला. त्यांचे पती उदय वाघ हेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते.

स्मिता वाघ यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या त्या सदस्यही राहिल्या आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष केला. १९९२ पासून भाजपच्या कार्यात सक्रिय असून २००३ मध्ये भाजप महिला मोर्चाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. २०१२ ते २०१५ या कालावधीत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha zilla parishad chairman to mp smita wagh amy
Show comments