या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ‘चारशेपार’ जाणार असल्याची घोषणा केलेली आहे; तर दुसरीकडे भाजपा ‘चारशेपार’ नव्हे सत्तेतून पायउतार होईल, असा दावा विरोधी पक्षांकडून केला जातो आहे. पाकव्याप्त काश्मीरवर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी आणि संपूर्ण देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजपाला चारशेपार जाण्याची गरज आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी बुधवारी (१५ मे) झारखंडमधील रामगढच्या प्रचारसभेत केले आहे. भारतीय जनता पार्टीला चारशेपार जागा कशासाठी हव्या आहेत? यासंदर्भात पक्षाने याआधी अनेक प्रकारचे दावे केलेले आहेत. आपण आता याच दाव्यांवर एक नजर टाकणार आहोत.

संविधानाचे संरक्षण करण्यासाठी…

देशाची राज्यघटना बदलवण्यासाठीच भारतीय जनता पार्टीला ‘चारशेपार’ जागा हव्या असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे, तर दुसरीकडे आम्ही देशाच्या घटनेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीकडून केला जातो आहे. भारतीय जनता पार्टीचे उत्तर कन्नड मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी १० मार्च रोजी याबाबत विधान करताना म्हटले आहे की, “आजवर काँग्रेसने घटनेतील मूलभूत गोष्टींमध्ये नको ते बदल केल्यामुळे घटना दुरुस्ती होणे गरजेची आहे. विशेषत: हिंदू समाजाबाबतचे कायदे बदलण्याची गरज आहे. हे बदल करायचे असतील तर आम्हाला दोन-तृतीयांश बहुमताची गरज आहे.” घटनेच्या प्रास्ताविकेत हे बदल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सदस्यांची आकडेवारीही त्यांनी सभेमध्ये उपस्थितांसमोर मांडली. ते म्हणाले की, “अब की बार चारशेपार असा नारा मोदींनी दिला आहे. मात्र, चारशेपार कशासाठी हवेत? आमच्याकडे लोकसभेमध्ये दोन-तृतीयांश जागा आहेत; मात्र राज्यसभेमध्ये आमच्याकडे बहुमत नाही. तसेच अनेक राज्य सरकारांमध्येही आम्ही बहुमतामध्ये नाही. जर या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला चारशेपार जागा मिळवता आल्या तर त्यामुळे राज्यसभेतही बहुमत मिळवायला मदत होईल. तसेच देशातील दोन-तृतीयांश राज्यांमध्येही सत्तेत येता येईल.”

Increase in rent in the name of survey to houses in Vasai Allegation of MLA Rajesh Patil in Assembly
वसईतील घरांना सर्वेक्षणाच्या नावाखाली वाढीव घरपट्टी; आमदार राजेश पाटील यांचा विधानसभेत आरोप
Wardha, police, first case,
वर्धा : पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत दाखल केला पहिला गुन्हा; वकिलाने २८ लाखाने लुबाडले
Amit Shah statement Rajiv Gandhi took pride in the Emergency reality
राजीव गांधींना आणीबाणीचा अभिमान असल्याच्या अमित शाहांच्या दाव्यामध्ये ऐतिहासिक तथ्य आहे का?
Why is the BJP talking of Emergency again
‘संविधान संरक्षणा’च्या मुद्द्याला ‘आणीबाणी’च्या मुद्द्यावरुन शह देणे भाजपाला फायद्याचे ठरेल का?
State government assurance of not pushing OBC reservation
‘ओबीसी’ आरक्षणास धक्का न लावण्याचे आश्वासन
Is it sign that Gardabh Jamaat is growing vigorously in India too
गर्दभ आख्यान…
maharashtra government soon to take decision on historical thane central Jail shifting to another place
ठाणे कारागृहाच्या जागेवर उद्यान उभारणीच्या प्रस्तावाला वेग; भाजपाचा मात्र विरोध
RSS Leader Indresh Kumar (1)
भाजपाला अहंकारी म्हटल्यानंतर संघाच्या नेत्याचे घुमजाव; आता म्हणतात, “ज्यांनी रामाचा…”

हेही वाचा : भाजपा हरियाणात एका मध्ययुगीन मुस्लीम राजाचा उदो-उदो का करत आहे?

मात्र, हेगडे यांच्या या विधानांपासून भाजपाने फारकत घेतली आहे. अनंतकुमार हेगडे यांची मते वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा कर्नाटक भाजपाने केला. “देशाच्या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असून हेगडे यांनी केलेल्या विधानांबाबत त्यांना खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे”, असे भाजपाने म्हटले.

कलम ३७० आणि राम मंदिर

मध्य प्रदेशमधील खरगोन आणि धर जिल्ह्यामध्ये ७ मे रोजी बोलताना पंतप्रधान मोदींनी चारशेपार जागा कशासाठी हव्या आहेत, याची मांडणी केली. ते म्हणाले की, “भाजपाला देशाची घटना बदलण्यासाठी चारशेपार जागा हव्या आहेत, असा खोटा प्रचार काँग्रेस करत आहे. मात्र, २०१९ ते २०२४ या कार्यकाळात एनडीएकडे चारशेपार जागा आधीपासूनच होत्या. मात्र, आता एकट्या भाजपाला चारशेपार जागा हव्या आहेत; जेणेकरून काँग्रेस काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणणार नाही. काँग्रेस राम मंदिराला ‘बाबरी लॉक’ लावू नये, यासाठी आम्हाला चारशेपार जागा हव्या आहेत”, असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “भारत सध्या ऐतिहासिक टप्प्यावर आहे. देशात ‘व्होट जिहाद’ असायला हवा की ‘रामराज्य’ याचा निर्णय आता तुम्हालाच घ्यायचा आहे.”

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी…

महाराष्ट्रातील पालघरमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘चारशेपार’ जागा हव्या असल्याचे विधान केले आहे. या सभेत बोलताना ते म्हणाले की, “भारताला आर्थिक महासत्ता करण्यासाठी भाजपा आणि मोदींच्या गॅरेंटीचीच निवड करा. भारताला खऱ्या अर्थाने सुरक्षित, विकसित आणि समृद्ध करण्याचे काम फक्त मोदी सरकारच करू शकते. आपले हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी चारशेपार जागांची गरज आहे.”

वारसा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी…

केंद्रीय पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. बुधवारी (१५ मे) एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, “पंडित जवाहरलाल नेहरुंनी हिंदूंचा विश्वासघात केला. आम्हाला चारशेपार जागा मिळतील, तेव्हा आम्ही काशी, मथुरा आणि अयोध्येचा अभूतपूर्व असा विकास करू.”

हेही वाचा : मायावतींवर भाजपाचे मौन, भाच्याला अचानक पदावरून दूर केल्यानंतर ‘बी टीम’च्या चर्चेला उधाण

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी…

बुधवारी (१५ मे) झारखंडमध्ये बोलताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले की, “या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला चारशेपार जागा मिळाल्या तरच पाकव्याप्त काश्मीर भारतात आणता येईल.” ते पुढे म्हणाले की, “२०१९ मध्ये भाजपाला तीनशेपार जागा मिळाल्या म्हणूनच CAA कायदा, राम मंदिराची उभारणी आणि कलम ३७० रद्द करता आले. अगदी तसेच ‘श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर’ आणि ‘ज्ञानव्यापी मंदिरा’च्या उभारणीसाठीही चारशेपार जागांची गरज आहे.”