निवडणूक जसजशी जवळ येते, तसतसा प्रचारालाही वेग येतो. एरव्ही मतदारसंघामध्ये सहज म्हणूनदेखील फेरफटका न मारणारे उमेदवारही मतदारांच्या पायांवर आपले डोके टेकवताना दिसतात. ही सगळी किमया निवडणुकीची आहे. हेच उमेदवार कधी मतदारांच्या घरी जाऊन काम करतील; तर कधी त्यांच्या शेतावर जाऊन त्यांचा नांगरही धरतील. आपण किती सामान्य आहोत आणि जनतेशी जोडले गेलेले आहोत, हे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न हे उमेदवार निवडणुकीपूर्वी करताना दिसून येतात.

निवडणुकीपूर्वी येतो ‘फोटोबाजी’ला ऊत

Ramdas Athawale, RPI pune, office bearers of RPI,
महायुतीची डोकेदुखी रिपाइं वाढणार ! खासदार रामदास आठवले यांच्याकडून रिपाइं पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
Rajasthan By-Election Independent candidate assault SDM
Rajasthan By-Election : अपक्ष उमेदवाराची अधिकाऱ्याला मारहाण; कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक, वाहनं पेटवली, जिल्ह्यात तणाव
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीतही असे उमेदवार काही कमी नाहीत. पाच वर्षांमध्ये मतदारसंघात कधीही न फिरकलेले उमेदवार जेव्हा अशी सामान्यांची कामे करून ‘फोटोबाजी’ करताना दिसतात, तेव्हा ते नक्कीच टीकेचे धनी होतात. काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले नेते व उद्योगपती नवीन जिंदाल यांनी आपल्याकडे ३०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. ते कुरुक्षेत्र मतदारसंघातून लढत आहेत. गेल्या गुरुवारीच ते एका फोटोत चक्क ट्रकमध्ये धान्याच्या गोणी भरताना दिसून आले.

हेही वाचा : प्रकाश आंबेडकर, भाजप, काँग्रेसमधील तिरंगी लढतीचा फायदा कोणाला ?

असेच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी यांचे! १२ एप्रिल रोजी गव्हाच्या शेतात काम करीत असल्याचे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. मथुरा मतदारसंघातून त्या भाजपाच्या उमेदवार आहेत. संसदेमध्ये नेहमी अनुपस्थित राहणाऱ्या खासदार, अशी त्यांची ख्याती आहे. २०१९ मध्ये, त्या २.९३ लाख मताधिक्याने निवडून आल्या होत्या. हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. खासदारकीच्या तिसऱ्या निवडणुकीत हेमा मालिनी यांच्यासमोर काँग्रेसच्या मुकेश धनगर यांचे आव्हान आहे. हेमा मालिनी यांनी त्यांचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ पोस्ट करण्याच्या आदल्या दिवशी मुकेश धनगर यांनीही अशाच प्रकारे शेतात काम करीत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओसोबत त्यांनी लिहिले होते, “जो नेता मातीशी जोडलेला असतो, तोच शेतकऱ्यांचे दु:ख समजू शकतो. एसीमध्ये बसणाऱ्याला शेतकऱ्यांचे दु:ख काय माहीत?” ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना धनगर यांनी म्हटले आहे, “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांच्या वेदना मला माहीत आहेत. मी ब्रजभूमीच्या मातीचा सुपुत्र आहे. हेमाजी प्रवासी (उपऱ्या) आहेत; तर मी ब्रजवासी आहे.” त्यांनी असे इतर अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. मांट प्रदेशातील गावांमध्ये प्रचार करताना त्यांनी म्हशीला आंघोळ घालतानाचा आणि एका शेतकऱ्यासोबत जेवण करतानाचाही व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेमा मालिनी यांनी शेतात काम करत असल्याच्या व्हिडीओबाबत खुलासादेखील केला आहे. शेतकऱ्यांसोबत बोलण्यासाठी त्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या, तेव्हा त्या शेतकऱ्यांनीच त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह केला, असे त्या म्हणाल्या. मथुरेच्या खासदार झाल्यापासून गेल्या १० वर्षांमध्ये त्या सातत्याने अशा प्रकारे शेतकऱ्यांना भेटतात, असा दावाही त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे उमेदवारदेखील यामध्ये मागे नाहीत. गाझियाबाद मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉली शर्मा या ११ एप्रिल रोजी मातीच्या चुलीवर रोटी तयार करताना व्हिडीओमध्ये दिसल्या. त्यांनी असे म्हटले आहे, “मला सर्व कामं येतात. तुमच्या खासदाराला चूल आणि कलम कशी चालवायची याची व्यवस्थित माहिती आहे.”

माजी मुख्यमंत्रीही काम करताना दिसले…

दुसरीकडे उत्तराखंडमधील हरिद्वार मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र रावत यांचे वडील हरीश रावतदेखील आपल्या मुलाच्या प्रचारासाठी अशाच क्लृप्त्या वापरताना दिसून आले. या जागेसाठी १९ एप्रिलला मतदान पार पडले आहे. हरीश रावत हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाला उत्तराखंडमधील पाचही जागांवर निर्विवाद विजय मिळाला होता. रावत यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या प्रचारासाठी हरीश रावत एका भाजीविक्रेत्याच्या गाडीवर जाऊन भाजी विकताना दिसले. त्याच दिवशी ते एका फळांच्या रसाच्या दुकानावर जाऊन काम करतानाही दिसले. त्यांचे हे व्हिडीओ खूपच व्हायरल झाले.

हेही वाचा : काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप

चहा तयार करणारे खासदार अगणित

असाच किस्सा अभिनेता रवी किशन यांचाही! रवी किशन हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मानले जातात. भाजपाचे उमेदवार असलेले रवी किशन एका चहावाल्याच्या टपरीवर जाऊन चहा तयार करताना दिसले. गोरखपूरमधून ते उमेदवार आहेत. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदीजी ४०० जागा जिंकणार असल्याने मी आज चहा तयार करतो आहे. ज्याने गरिबी पाहिली आहे, तोच भारतासारख्या देशाला चालवू शकतो. भारतात ८० टक्के लोक ग्रामीण आहेत. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आणि इटली-ऑस्ट्रेलियामध्ये शिकलेले लोक भारताचे दु:ख समजून घेऊ शकणार नाहीत.” त्यांनी आपल्या वक्तव्यात केलेला इटली आणि ऑस्ट्रेलियाचा उल्लेख हा थेट काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याकडे इशारा करणारा आहे.

रवी किशन यांच्याप्रमाणेच झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार व विद्यमान खासदार निशिकांत दुबेदेखील चहाच्या टपरीवरच काम करताना फोटोमध्ये दिसून आले. २ एप्रिलला ते आपल्या कार्यकर्त्यांसह लोकांना चहा तयार करून देत होते. ते म्हणाले, “भाजपासाठी चहाचे महत्त्व विशेष आहे. एक चहावाला आपला पंतप्रधान आहे. त्यामुळे पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्हीदेखील चहा कसा तयार करायचा ते शिकत आहोत; जेणेकरून किती मेहनत केल्यावर देशाचा पंतप्रधान होता येते हे आम्हाला कळेल.”