Karnataka Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला आहे. एकूण सात टप्प्यांमध्ये होत असलेल्या या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी एप्रिल २०२३ मध्ये भाजपा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा हा निर्णय सर्वांसाठीच धक्कादायक तर होताच; त्याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी पक्ष बदलल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र, हुबळी-धारवाड या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्येच त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठविण्यात आले. आता त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलला असून, मागील जानेवारीत ते पुन्हा भाजपामध्ये आले आहेत. ते लिंगायत समाजाचे प्रमुख नेते मानले जातात. त्यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले आहे. याआधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांचेच जवळचे नातेवाईक व माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी करायचे. त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी वार्तालाप केला आहे.

बेळगावऐवजी धारवाडमधून उमेदवारी मिळाली असती, तर तुम्हाला अधिक आनंद झाला असता?

nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”

धारवाड, हावेरी व बेळगावमध्ये माझ्या अनेक ओळखी असल्यामुळे मी मतदारसंघातील जागांमध्ये कोणताही फरक करत नाही. तिन्हीपैकी कोणत्याही जागेवर मी उभा राहिलो तरी लोकांचा मला पाठिंबा मिळेलच.

हेही वाचा :काँग्रेसविरोधात भाजपाचा खोटा प्रचार केवळ भीतीपोटी; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

प्रत्यक्षातील परिस्थितीबाबत तुमचे आकलन काय?

बेळगाव शहराचा विकास करण्यासाठी मी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत आणि इथल्या पक्षसंघटनेशीही माझा चांगला परिचय आहे. मी नियमितपणे शहराला भेटी देत राहिलो आहे. तसेही अंगडी हे माझे निकटवर्तीय आहेत. मी विरोधी पक्षनेता असताना ते जिल्हाध्यक्ष होते. आम्ही दोघांनी मिळून प्रत्येक तालुक्यात पक्षसंघटन मजबूत केले होते. या शहराच्या आणि जिल्ह्याच्या समस्या मला माहीत आहेत आणि इथल्या लोकांशीही चांगले संबंध आहेत.

पण, तुम्ही ‘उपरे’ असल्याचा ठपका तुमच्यावर ठेवला जातोय… त्याबद्दल काय सांगाल?

हा काही चर्चेचा मुद्दा आहे, असे मला वाटत नाही. एकीकडे मुख्यमंत्री सिद्धरामैया मूळचे म्हैसूरचे असूनही ते बदामीमधून निवडणूक लढवितात. दुसरीकडे राहुल गांधी अमेठीमधून लढायचे सोडून वायनाडमधून लढतात. तेव्हा काँग्रेस यावर का बोलत नाही? १९९९ मध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील बरेलीमधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये मंत्री शिवानंद पाटील यांची कन्या संयुक्ता विजापूरची असूनही बागलकोटमधून लढत आहे. काँग्रेसचे नेते अशा प्रकारचे मुद्दे का उपस्थित करीत आहेत ते मला कळत नाही.

गतवर्षी विधानसभा निवडणुकीत तुम्ही काँग्रेसबरोबर होता आणि आता भाजपाबरोबर… हे कसे?

काही घटनांमुळे मी भाजपा पक्ष सोडला होता. मात्र, त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांकडून पुन्हा बोलावणे आले आणि मी काही काळातच पुन्हा पक्षात परतलो. कर्नाटकमध्ये बी. एस. येडीयुरप्पा (माजी मुख्यमंत्री) व अनंतकुमार (माजी केंद्रीय मंत्री) यांच्यासमवेत मीदेखील शून्यातून पक्ष उभा करण्यात योगदान दिले आहे. जनसंघाच्या काळापासून माझे कुटुंब भाजपाबरोबर आहे. हा आमचा ‘मातृपक्ष’ आहे.

या निवडणुकीसाठी तुमची आश्वासने काय?
बंगळुरू आणि मंगलुरुनंतर बेळगाव हेच कर्नाटकमधील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराची एअर कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी इथल्या विमानतळावर नवे टर्मिनल उभे करायचे आहे.

इथे मोठ्या इंडस्ट्री आणण्याचेही नियोजन आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. मानवी संसाधनांच्या उपलब्धतेमुळे बेळगाव हे आयटी कंपन्यांसाठी चांगले ठिकाण ठरले आहे. मला इथे रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांसाठीचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत.

बेरोजगारी आणि महागाई हे या निवडणुकीसाठीचे मुद्दे आहेत, असे तुम्हाला वाटते का?

बेरोजगारी ही सार्वत्रिक समस्या आहे आणि ती काँग्रेसच्या काळातही होतीच. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगारासाठी अनेक प्रयत्न केले असून, अनेकांना सरकारी आणि खासगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत.

हेही वाचा : प्रमोद महाजन हत्या ते २६/११ चा खटला, उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले?

बेळगाव आणि चिक्कोडी तसेच बागलकोट मतदारसंघामध्ये राज्यातील मंत्र्यांच्या मुलांना तिकिटे दिली गेली आहेत. त्याबद्दल काय सांगाल?

काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याला काहीही किंमत नाही. पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये बरीच अस्वस्थता आहे. मंत्र्यांचे नातेवाईक आणि महत्त्वाच्याच राजकीय नेत्यांना तिकिटे दिली गेली आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार सांगतात की, कार्यकर्त्यांसाठी इथे संधी नाही. ताकद आणि पैसा पाठीशी असलेल्या उमेदवारांनाच निवडले जाते. पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकदेखील काँग्रेसवर नाराज आहेत.