लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण केरळ राज्याचे मतदान पार पडणार आहे. केरळमध्ये २० मतदारसंघांसाठी आज (२६ एप्रिल) मतदान होत असून या ठिकाणी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये (UDF) प्रमुख लढत होत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीतील सहकारी पक्ष आहेत. मात्र, केरळमध्ये हे दोन्हीही पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. केरळमध्ये भाजपाही जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काही जागांवर तिहेरी लढतही पाहायला मिळते आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये, UDF ने २० पैकी १९ जागा जिंकल्या होत्या. राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच केरळमधील वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. यावेळीही राहुल गांधी याच मतदारसंघातून निवडणूक लढवत असून UDF ला भरघोस यश मिळेल, अशी अपेक्षा करत आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून रणकंदन

माकप गेली दहा वर्षे राज्यामध्ये सत्तेत आहे. २०१९ च्या निकालाची पुनरावृत्ती न होता पक्षाला चांगले यश मिळावे म्हणून ते प्रयत्न करत आहेत. यावेळी माकपने नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. या कायद्याच्या माध्यमातून भाजपाने अल्पसंख्याकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला असून काँग्रेस त्यावर सोयीस्कर मौन बाळगून असल्याचा आरोप माकपकडून केला जातो आहे.

Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
ashok Chavan and congress leader d p sawant
अशोक चव्हाण- डी. पी. सावंत प्रथमच ‘आमने-सामने’
bjp MLA Tarvinder Singh marva give death threat to rahul gandhi
राहुल गांधींना भाजप घाबरते का ? कॉंग्रेसचा सवाल, नागपुरात आंदोलन
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?

इंडिया आघाडी सत्तेत आली तर संसदेच्या पहिल्या अधिवेशनातच CAA कायदा रद्दबातल ठरवला जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिले आहे. त्यानंतर केरळमध्ये हा मुद्दा आणखीनच चर्चेत आला आहे. एकीकडे संघ परिवाराशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस तितकी सक्षम नसल्याचा आरोप माकप करते आहे, तर दुसरीकडे UDF ला हरवण्यासाठी माकप भाजपाला मदत करत असल्याचा आरोप काँग्रेस करते आहे.

हेही वाचा : गोव्यावर भारताचं संविधान लादण्यात आलं? काँग्रेस उमेदवाराच्या वक्तव्यावरून वादाला फुटलं तोंड

“माकप आणि भाजपा एकमेकांबरोबर”

स्वत: राहुल गांधी यांनीही माकप आणि भाजपा एकमेकांच्या बरोबर असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलत नाहीत. एकीकडे अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन या मुख्यमंत्र्यांना अटक झालेली असताना पिनाराई विजयन यांच्यावर आरोप होऊनही त्यांना अटक का केली गेली नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना विजयन यांनी राहुल गांधी यांना आठवण करून देत म्हटले आहे की, “आणीबाणीच्या काळात दीड वर्षांसाठी त्यांच्या आजीनेच (इंदिरा गांधी) आम्हाला तुरुंगात डांबून ठेवले होते.”

केरळमध्ये भाजपाने आतापर्यंत एकही लोकसभेची जागा जिंकली नाही. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांना राज्यातील १५ टक्के मते मिळवण्यात यश आले होते. या निवडणुकीमध्ये राज्यातील आणखी मते मिळवण्याचा प्रयत्न भाजपाचा राहील. भाजपाप्रणीत एनडीएने आपल्या प्रचारामध्ये गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये केलेल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे.

‘द केरला स्टोरी’वरून राजकीय आखाड्यात घमासान

भाजपाने ‘केरळसाठी मोदींची गॅरंटी’ या घोषणेखाली आपला प्रचार चालवला आहे. मुस्लीम दहशतवादाची भीती दाखवून केरळमधील ख्रिश्चन मतदारांनाही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. मात्र, मणिपूरमधील हिंसाचाराबाबत मौन बाळगलेल्या भाजपाला केरळमधील ख्रिश्चनांची मते मिळणे अवघड जाईल, असे सांगितले जात आहे.

केरळच्या या निवडणुकीमध्ये ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपटही प्रचाराच्या केंद्रस्थानी आला होता. दूरदर्शनवरून हा चित्रपट दाखवला गेल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. केरळमधील मुस्लिमेतर महिलांना फूस लावून आयसीसमध्ये नेले जात असल्याची कथा या चित्रपटात आहे. या चित्रपटाचा वापर करून भाजपाने धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस आणि माकपने याविरोधात भूमिका घेतली. त्यांनी निवडणूक आयोगाकडे या चित्रपटाच्या प्रसारणाविरोधात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या; तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचे भाजपाने म्हटले. भाजपा ख्रिश्चन लोकसंख्येला आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी ते ‘वाढत्या इस्लामिक कट्टरतेचा’ बागुलबुवा उभा करीत आहेत.

हेही वाचा : भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?

अल्पसंख्याकांचे प्रमाण अधिक

केरळमधील एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास तिथे २७ टक्के मुस्लीम, तर १८ टक्के ख्रिश्चन आहेत. हा एकूण ४५ टक्के अल्पसंख्यांक समाज UDF चा पारंपरिक मतदार आहे. तिरुवनंतपूरम, अटिंगल, आल्लपुळा, पठानमथिट्टा, त्रिशूर आणि कासारगोड या ठिकाणी भाजपाचे मतदार संख्येने अधिक आहेत, त्यामुळे पक्षाने त्या ठिकाणी अधिक जोर लावला आहे.

केरळमधील हायप्रोफाइल लढतींमध्ये वायनाडचा समावेश आहे. या ठिकाणी राहुल गांधींच्या विरोधात भाकपच्या ॲनी राजा आणि भाजपाचे के. सुरेंद्रन लढत आहेत. तिरुअनंतपूरममधून शशी थरुर तीनवेळा खासदार राहिले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजीव चंद्रशेखर आणि भाकपचे पन्नियन रवींद्रन उभे आहेत. त्रिशूरमध्ये भाजपाकडून अभिनेता सुरेश गोपी उभे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे के. मुरलीधरन आणि एलडीएफचे व्ही. एस. सुनील कुमार यांचे आव्हान आहे. वडकारामध्ये काँग्रेसचे तरुण आमदार शफी पारंबिल हे माकपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांच्याशी लढत आहेत.