Rahul Gandhi Files Nomination From Rae bareli: रायबरेली आणि अमेठी हे उत्तर प्रदेशमधील दोन मतदारसंघ गांधी घराण्याचे बालेकिल्ले मानले जातात. मात्र, यातील अमेठी हा मतदारसंघ आता भाजपाच्या ताब्यात गेला आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी पुन्हा अमेठीतून; तर प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवतील, अशा स्वरूपाच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

२०१९ मध्ये अमेठीतूनही लढवली होती निवडणूक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (३ एप्रिल) रायबरेली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा आणि केरळमधील डाव्या पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड अशा दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. या वेळीही ते रायबरेली आणि वायनाड अशा दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवीत आहेत. स्मृती इराणींकडून अमेठीमध्ये पराभव झाल्यानंतर राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचे खासदार म्हणून लोकसभेत गेले होते. यावेळी राहुल गांधी दोन्ही मतदारसंघात जरी विजयी झाले तरीही ते वायनाड मतदारसंघ सोडणार नाहीत, अशी आशा वायनाडमधील मतदारांना वाटते. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये २६ एप्रिल रोजी वायनाड मतदारसंघासाठीचे मतदान पार पडले आहे.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…

हेही वाचा : १९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास

अमेठी आणि रायबरेलीबाबत अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चा सुरू होत्या. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे हक्काचे मतदारसंघ असूनही नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर केल्यामुळे या मतदारसंघांबाबतची उत्सुकता बरीच ताणली गेली होती. मात्र, राहुल गांधी आणि काँग्रेसने वायनाडमधील मतदारांचा विश्वासघात केला असल्याची जोरदार टीका भाजपा आणि केरळमधील डाव्या पक्षांनी केली आहे.

आपण उत्तर प्रदेशमधूनही आणखी एका मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार आहोत, याबाबतची कोणतीही पूर्वसूचना राहुल गांधींनी वायनाडमध्ये प्रचार करताना दिलेली नव्हती. राहुल गांधी हिंदी भाषक पट्ट्यामधून पळ काढत असल्याची टीका केरळमधील डाव्या पक्षांनी केली होती. या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंट (LDF) सत्तेत आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट (UDF) आणि LDF यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे.

वायनाड की रायबरेली?

राहुल गांधी रायबरेलीतून जिंकले तरीही ते वायनाड मतदारसंघ राखतील आणि रायबरेली मतदारसंघ सोडून देतील, अशी एक सर्वसामान्य भावना वायनाडच्या मतदारांमध्ये दिसून येते आहे. वायनाडमधील पुल्पल्ली गावातील शेतकरी एम. व्ही. पाउलोस यांनी म्हटले आहे, “२०१९ च्या निवडणुकीमध्ये वायनाडनेच राहुल गांधींना वाचवले होते. त्यांनी रायबरेलीतून निवडणूक जिंकली तरी ते हाच मतदारसंघ राखतील. ते वायनाडमधून जिंकतीलच, अशी आम्हाला खात्री आहे. काँग्रेससाठी ही अत्यंत सुरक्षित जागा आहे. राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढविण्याच्या विरोधात वायनाडमधील लोक नाहीत. गेल्या वेळीही त्यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामुळे वायनाडमधील निकालावर त्याचा काहीही परिणाम झालेला नव्हता.”

यावेळी वायनाडमध्ये प्रचार करताना राहुल गांधींनी तिथल्या लोकांना भावनिक साद घातल्याचे दिसून आले. “मी तुमचा भाऊ आणि वायनाडचा सुपुत्र आहे,” असे त्यांनी म्हटले होते. युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटमध्ये काँग्रेसबरोबरच इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML) हा पक्षदेखील आहे. मात्र, या ठिकाणी प्रचार करताना त्यांच्या रोड शोमध्ये अथवा सभेमध्ये कोणत्याही पक्षाचे झेंडे लावलेले नव्हते.

IUML चे कार्यकर्ते एम. के. अली यांनी रायबरेलीतूनही निवडणूक लढविण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयाचे स्वागतच केले आहे. ते म्हणाले, “अनेक लोक राहुल गांधींच्या निर्णयावर चर्चा करीत आहेत. हे भाजपाच्या प्रचाराला दिलेले चोख प्रत्युत्तर असल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे.”

पुढे ते म्हणाले, “राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक जिंकल्याने जर इंडिया आघाडीला आणखी जागा जिंकता येणार असतील, तर त्यावर हरकत घेण्याचे कारणच काय? जेव्हा ते वायनाडमध्ये निवडणूक लढविण्यासाठी आले तेव्हापासूनच ते दुसऱ्या एखाद्या मतदारसंघातूनही निवडणूक लढवतील, अशीच चर्चा होती. राहुल गांधी वायनाडमधून जिंकणारच आहेत. रायबरेलीचे काय होईल ते आम्हाला माहीत नाही; पण ते वायनाडला सोडणार नाहीत, एवढं नक्की.”

हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?

“वायनाड माझे दुसरे घर”

वायनाडमधील मुल्लनकोल्ली पंचायतीचे अपक्ष सदस्य जोस नेलेडॉम म्हणाले, “वायनाड हे आपले दुसरे घरच असल्याचा दावा राहुल गांधींनी नेहमी केला आहे. त्यामुळे राहुल गांधींना ही जागा राखावीच लागेल.”

पुढे ते म्हणाले, “अमेठी मतदारसंघाबरोबर त्यांच्या घराण्याचे इतके जुने संबंध असूनही त्यांना तिथून पाठिंबा मिळालेला नव्हता. अशा वेळी वायनाडच्या लोकांनी त्यांना भरघोस मतांनी वियजी केले होते. ते राष्ट्रीय नेते आहेत आणि इथल्या लोकांना देश पातळीवरचे राजकारण समजते. त्यामुळे वायनाडचे लोक त्यांना नक्की पाठिंबा देतील.”

मेपाडी गावचे रहिवासी हुसेन म्हणाले, “राहुल गांधी वायनाड मतदारसंघच राखतील, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. या मतदारसंघातील गरिबांसाठी त्यांनी बरेच काही केले आहे.”

वायनाड मतदारसंघामध्ये २०१९ च्या निवडणुकीत ७९.७७ टक्के मतदान झाले होते; तर या निवडणुकीमध्ये ७३.५७ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का घसरल्यामुळे थोडी निराशा वाटली, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. “उच्च शिक्षण वा नोकरीसाठी अनेक तरुण परदेशी गेले आहेत. मतदानाची टक्केवारी घसरण्यामागे हेच एक मुख्य कारण आहे,” असे त्यांनी सांगितले.