२०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपाने आपले बहुमत गमावले असून, त्यांना २४० जागा प्राप्त झाल्या आहेत. तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला आपल्या मित्रपक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. २०१९ च्या तुलनेत भाजपाने एकूण ६३ जागा गमावल्या असून, त्यांचा या निवडणुकीतील स्ट्राईक रेट ५४.४२ टक्के राहिला आहे. दुसरीकडे काँग्रेसला ९९ जागा प्राप्त झाल्या असून, २०१९ च्या तुलनेत तब्बल ४७ जागांची वाढ झाली आहे. काँग्रेसचा या निवडणुकीतील स्ट्राईक रेट ३०. १८ टक्के इतका आहे. या निवडणुकीतील सर्वाधिक स्ट्राईक रेट हा लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांचा असून, त्यांनी लढवलेल्या सर्व पाच जागा जिंकल्या आहेत. हा बिहारमधील प्रादेशिक पक्ष असून, एनडीए आघाडीचा घटक पक्ष आहे. २०१९ मध्ये फक्त एक जागा जिंकणाऱ्या इंडिया आघाडीला बिहारमध्ये यावेळी नऊ जागा जिंकता आल्या आहेत.

हेही वाचा : कसे असेल मोदी कॅबिनेट 3.0 चे स्वरूप? नितीश-नायडूंच्या वाट्याला किती मंत्रिपद?

maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात

राजकीय पक्षांचा स्ट्राईक रेट म्हणजे काय?

एखाद्या पक्षाने निवडणुकीमध्ये लढविलेल्या एकूण जागांपैकी किती जागांवर विजय प्राप्त केला याच्या प्रमाणाची टक्केवारी म्हणजे ‘स्ट्राईक रेट’ होय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला संपूर्ण देशभरात फक्त ३१ टक्के मते मिळाली असली तरीही त्यांचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता. भाजपाने उत्तर आणि पश्चिम भारतातील मतदारसंघांमध्ये दर्जेदार कामगिरी केली होती. या हिंदी भाषक पट्ट्यातील १० राज्यांमध्ये लढविलेल्या एकूण २२५ जागांपैकी १९० जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट तब्बल ८५ टक्के होता. या २०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांत खराब स्ट्राईक रेट हा बहुजन समाज पार्टीचा आहे. या राष्ट्रीय पक्षाने संपूर्ण देशभरात ५०३ जागा लढविल्या; मात्र, त्यांना एकाही जागी विजय प्राप्त करता आला नाही. मात्र, त्यांनी या निवडणुकीमध्ये २.०४ टक्के मते मिळवली आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाने लोकसभेतील एकूण ५४३ जागांपैकी ४७३ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ३०३ जागांवर भाजपाला विजय प्राप्त झाला होता. त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये भाजपाचा स्ट्राईक रेट ६९.३८ टक्के इतका होता. तर काँग्रेसने लढविलेल्या ४२१ जागांपैकी फक्त ५२ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट फक्त १२.३५ टक्के होता.

एनडीएच्या घटक पक्षांनी कशी केली आहे कामगिरी?

तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) : चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपीने आंध्र प्रदेशमधील एकूण २५ लोकसभा मतदारसंघांपैकी १६ मतदारसंघांत विजयी पताका फडकवली आहे. इथे भाजपाला तीन, तर जनसेना पार्टीला दोन जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये टीडीपीचा स्ट्राईक रेट ९४.१२ टक्के; तर जनसेना पार्टीचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे.

लोक जनशक्ती पार्टी (लोजपा) : बिहारमध्ये चिराग पासवान याच्या नेतृत्वाखालील लोजपा (रामविलास) पक्षाने लढविलेल्या पाचही जागा विजयी ठरल्या असून, त्यांचा स्ट्राईक रेटही १०० टक्के आहे. २०१९ च्या निवडणुकीतही सहापैकी सहा जागा जिंकल्यामुळे त्यांचा स्ट्राईक १०० टक्केच राहिला होता. बिहारमध्ये आपणच दलितांचे नायक आहोत, हे सिद्ध करण्यात चिराग पासवान यशस्वी ठरले आहेत.

जनता दल युनायटेड (जेडीयू) : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने १६ जागा लढविल्या होत्या; त्यापैकी १२ जागांवर त्यांना विजय मिळाला. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट ७५ टक्के इतका राहिला आहे. भाजपाने बिहारमध्ये १२ जागा जिंकल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेडीयूने लढविलेल्या सर्व १६ जागांवर विजय झाला असल्याने त्यांचा स्ट्राईक १०० टक्के होता.

इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांची कामगिरी

तृणमूल काँग्रेस : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २९ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट ६०.४२ टक्के इतका राहिला आहे. भाजपाने २०१९ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये १८ जागा जिंकल्या होत्या; तर या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला १२ जागा प्राप्त झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारी ४३.३ टक्क्यांवरून ४५.७६ टक्क्यांवर गेली आहे; तर भाजपाच्या मतांची टक्केवारी ४०.२५ टक्क्यांवरून ३८.७३ टक्क्यांवर गेली आहे.

समाजवादी पार्टी : समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमधील एकूण ८० पैकी ३८ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीने अत्यंत दर्जेदार कामगिरी केली असून, त्यांचा स्ट्राईक रेट ५२.११ टक्के राहिला आहे. हा पक्ष उत्तर प्रदेशमधील सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, त्याने देशातही तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. याआधी समाजवादी पार्टीने २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशी दर्जेदार कामगिरी केली होती. तेव्हा मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला ३५ जागा मिळाल्या होत्या. २०१९ मध्ये समाजवादी पार्टीच्या मतांची टक्केवारी १८.११ होती; तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सपाच्या मतांची टक्केवारी ३३.३८ टक्क्यांपर्यंत वधारली आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडीने संसदेत विरोधी बाकावर बसणे का निवडले? विरोधकांचं पुढचं पाऊल काय असेल?

शिवसेना विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २१ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला. त्यांचा स्ट्राईक रेट ४२.८ टक्के आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लढविलेल्या १५ पैकी सात जागांवर विजय मिळवला. त्यांचा स्ट्राईक रेट ४६.६ टक्के आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने लढविलेल्या १० जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवला. त्यांचा स्ट्राईक रेट ८० टक्के आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने लढविलेल्या चार जागांपैकी एकाच जागेवर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट २५ टक्के आहे.

द्रविड मुन्नेत्र कळघम : एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्षाने तमिळनाडूतील एकूण ३९ पैकी २२ लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. त्यांचा स्ट्राईक रेट ५६.४ टक्के आहे. तमिळनाडूमध्ये काँग्रेसने नऊ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित आठ जागा इतर पक्षांनी जिंकल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने ३८ जागा जिंकल्या होत्या.