२०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपाने आपले बहुमत गमावले असून, त्यांना २४० जागा प्राप्त झाल्या आहेत. तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला आपल्या मित्रपक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. २०१९ च्या तुलनेत भाजपाने एकूण ६३ जागा गमावल्या असून, त्यांचा या निवडणुकीतील स्ट्राईक रेट ५४.४२ टक्के राहिला आहे. दुसरीकडे काँग्रेसला ९९ जागा प्राप्त झाल्या असून, २०१९ च्या तुलनेत तब्बल ४७ जागांची वाढ झाली आहे. काँग्रेसचा या निवडणुकीतील स्ट्राईक रेट ३०. १८ टक्के इतका आहे. या निवडणुकीतील सर्वाधिक स्ट्राईक रेट हा लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांचा असून, त्यांनी लढवलेल्या सर्व पाच जागा जिंकल्या आहेत. हा बिहारमधील प्रादेशिक पक्ष असून, एनडीए आघाडीचा घटक पक्ष आहे. २०१९ मध्ये फक्त एक जागा जिंकणाऱ्या इंडिया आघाडीला बिहारमध्ये यावेळी नऊ जागा जिंकता आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा