क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस सावित्रीबाई फुले यांचेच कार्य पुढे नेत आहेत. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी आल्यापासून परत जाईपर्यंत भुजबळ मुख्यमंत्र्यांबरोबर होते. भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत एकूण पन्नास मिनिटे एकाच गाडीतून प्रवास केला. याबाबत मुख्यमंत्री रवाना झाल्यानंतर छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार कार्यक्रमाला का आले नाहीत. भुजबळ म्हणाले ते कुठे आहेत हे मलाच माहीत नाही. मग मुख्यमंत्र्यांबरोबर एवढा वेळ होतात तेव्हा काय चर्चा झाली. भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमासाठी आलेले होते. गाडीमध्ये कार्यक्रमाच्या व स्मारकाच्या अनुषंगाने विषय झाला. इतर कोणताही राजकीय विषय झाला नाही. अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय विषय कसे करू शकतो, असा उलटा प्रश्न केला. फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि भुजबळांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट लागले. ईडीच्या कारवाईत दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. तेव्हा फडणवीसांच्या नावे ठणाठणा करणारे भुजबळ आता मात्र फडणवीसांचे तोंडभरून कौतुक करीत आहेत. शेवटी काळाचा माहिमा महत्त्वाचा असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा