राष्ट्रवादीत बंटी आव्हाड जेवढे आक्रमक तेवढेच काँग्रेसमधील बंटी पाटील एकदमच नेमस्त. कधी कोणावर चिडणार नाहीत व संयमी, पण अशा या बंटी पाटील यांचा रुद्रावतार दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळाला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने बंटी पाटील असे काही संतप्त झाले, की त्यांचा चेहरा लालेलाल झाला होता. खासदार शाहू महाराज व त्यांच्या कुटुंबीयांना उद्देशून बंटी पाटील यांनी चांगलेच सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापूरमधून लोकसभेत शाहू महाराजांना निवडून आणण्यात बंटी पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. शाहू महाराज यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवावी यासाठी त्यांची मनधरणी करण्यापासून निवडणुकीचे सारे नियोजन बंटी पाटील यांनी केले होते. यामुळे खासदार शाहू महाराज यांच्या कुटुंबीयांकडून ऐनवेळी दगाफटका होईल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

हेही वाचा >>>‘आम्ही काहीही करू शकतो’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मिथुन चक्रवर्तींची मुस्लिमांना धमकी

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आधीच उमेदवारीवरून वाद झाला होता. त्यातच शाहू महाराजांनी तोंडघशी पाडल्याने बंटी पाटील यांची चांगलीच कोंडी झाली. कधी नव्हे ते पाटील एवढे चिडले की त्यांचा आवेश बघून कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर बंटी पाटील यांना अश्रू अनावर झाले. आता ज्याची उमेदवारी पक्षाने बदलली त्यालाच अपक्ष म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी पाटील यांच्या खांद्यावर येऊन पडली.

तुतारी आणि थांबलेली पंढरीची वारी!

सार्वत्रिक निवडणुका म्हटले की मतदारांची मर्जी सांभाळणे आलेच. त्यासाठी उमेदवारही वेगवेगळे मार्ग चोखाळत असतात. याचा संदर्भ देत कागलमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मासलेवाईक उदाहरण दिले. या मतदारसंघातील ‘वजनदार’ प्रतिस्पर्धी उमेदवार हे निवडणुकीत उमेदवारांना पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घडवून आणणाऱ्या यात्रा जोमाने काढत असतात. आता मात्र त्यांची अडचण झाली आहे. मतदारांना पंढरीला नेले आणि शपथ घ्यायला लावताना जयघोष केला ‘राम कृष्ण हरी’ आणि मतदारांनी लगोलग म्हटले ‘वाजवा तुतारी!’. अशी भलतीच अडचण व्हायला नको म्हणून त्यांनी आता पंढरीची वारीच थांबवली आहे.

(संकलन : संतोष प्रधान, दयानंद लिपारे)