शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यात आपले मुख्यालय थाटले. या कार्यालयाला बाळासाहेब भवन असे नाव देण्यात आले. कार्यालय अगदी चकाचक. काचेची तावदाने, चकचकीत खूच्र्या, आर्कषक पेंटींग, शुभ्रधवल रंग, चमकणारे दिवे असा या मुख्यालयाचा थाट आहे. अलिशान अशा मुख्यालयाची स्वच्छता कायम राहावी यासाठी पादत्राणे घालून कार्यालयात जाता येत नाही. पादत्राणे बाहेर काढण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्यासाठी एक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. इथपर्यंत सारे ठिक. पण कार्यालयात येणारे नेते व कार्यकर्त्यांना वेगळाच अनुभव येऊ लागला आहे. कारण आत जाताना बाहेर काढलेली पादत्राणे बाहेर आल्यावर गायब झाल्याचे प्रकार वाढले आहेत. पादत्राणे गायब होत असल्याने तेथे येणाऱ्या कार्यकर्त्यांचे अर्धे लक्ष पादत्राणांवर असते. पादत्राणे बाहेर काढण्याची सक्ती कशाला? हे काय मंदिर आहे का? अशी कार्यकर्त्यांची संतप्त भावना आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा