सांगली : दिवेलागणीचा वकुत झाला तर गावच्या पारावरच्या गप्पा संपता संपना झाल्त्या. तशातच नानातात्याची चुळबुळ सुरू हुती. कधी एकदा निवडणुकीच मैदान रंगात येतया अन् सांजच्या ढाब्यावरच्या दोन रोटय़ा अन् चिकनच्या वासाच खळगुट पुढय़ात येतया अस झालं होतं. कमळ मैदानात असल तर जोडीदार ठरना झालाय यातूनच राच्च ढाब्यावरच जेवान आणि मिळणारी अर्धीमुर्धी देशी कुठं दिसना झाली हुती. घरात रोजच भाकरी कोरडय़ास खाउन कटाळलेल्या नाना तात्याची चुळबुळ त्यामुळच चाल्ली हुती. रिंगणात कमळ आणि मशाल उतरली होती. मात्र काटाजोड व्हायला आणि मैदानात रंगत आणाया पंजा आणि कमळच हवंच असा सूर हुता. अशातच धाकटा बाळय़ा पारावर आला. अगा नाना, आई कवापासनं बोलावत्या, जेवायचं हाय का न्हाय इंचारलं? काय सांगू? नाना तात्या भानावर आला. घरचं सोडून कस चालायचं? चला आजचा दिस तर घरच कोरडय़ास गोड मानून घ्या, नाही तर गावात बोर्ड लागायचा उमेदवारीसाठी ‘नाना तात्याचं पारावर उपोषण’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा