शरद पवार रविवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यात शरद पवारांनी ०००७ क्रमांकाच्या गाडीतून सातारा ते कराड असा प्रवास केला. शासकीय विश्रामगृहावर साताऱ्यातील इच्छुकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या सर्वांमध्ये चर्चा मात्र गाडीतून आलेल्या पवारांच्या गाडीच्या क्रमांकाची रंगली. समाज माध्यमावर तर पवारांचा उदयनराजे यांच्या गाडीतून प्रवास अशी जोरदार चर्चा जिल्हाभर होऊ लागली. साताऱ्यात ००७ क्रमांकाचे मोठे आकर्षण आहे आणि खासदार उदयनराजेंच्या सर्व गाड्यांचे क्रमांक असेच आहेत. हा क्रमांक पहिला की सातारकरांना उदयनराजेंची आठवण येते. यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंची यांच्या वाहनाच्या क्रमांकाशी साधर्म्य असलेल्या वाहनातून कार्यक्रम स्थळी व विश्रामगृहावर प्रवेश करताच सातारकरांच्या भुवया उंचावल्या. उदयनराजे गाडीतून शरद पवार कसे आले, याचीच खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तर ही शरद पवारांचीच गुगली होती का, अशीही कुजबुज सुरू झाली.

हेही वाचा >>>धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘आघाडी’

गणपती पावणार का?

नुकताच गणेशोत्सव<strong> थाटा-माटात साजरा झाला. विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने राजकीय नेत्यांकडून सढळ हाताने वर्गणी तर मिळालीच, पण यानंतर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याने भावी नगरसेवकांनीही हात ढिला सोडला. अगदी राजकारण, समाजकारण याचा ओ का ठो ज्ञात नसलेल्या आणि मिसरुडही ओठावर नसलेल्यांची छबी ‘आमचं काळीज’ म्हणून दिमाखात दिसली. आता आशीर्वादही फुकट मिळत नाहीच, यासाठी बिदागी द्यायला लागत. अशाच एका प्रस्थापितांनी लाल दिव्यासाठी यंदा जरा जास्तच हात मोकळा सोडल्याची चर्चा आहे

(संकलन : विश्वास पवार, दिगंबर शिंदे)

Story img Loader